MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

गूगलच्या क्लाऊड सेवा पडल्या बंद : काही काळानंतर झाल्या पूर्वरत!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 3, 2019
in News

काल गूगलच्या क्लाऊड सेवांचा वापर करणार्‍या जवळपास सर्वच प्रमुख वेबसाइट्स काही काळासाठी काम करत नव्हत्या. गूगल क्लाऊड सेवांमध्ये काही अडचणी निर्माण झाल्यामुळे यूट्यूब, जीमेलसारख्या गूगलच्या सेवांसोबत डिस्कॉर्ड, स्नॅपचॅट या गूगलच्या क्लाऊड सेवा वापरणार्‍या अॅप्स व वेबसाइट्ससुद्धा बंद झाल्या होत्या. प्रामुख्याने अमेरिका व युरोप भागामध्ये अनेकांना या वेबसाइट्स पाहण्यामध्ये अडचणी येत होत्या. गूगलची स्मार्ट होम सेवा पुरवणारी नेस्टसुद्धा यामध्ये सापडली आणि अनेकांना त्यांच्या घरातील नेस्ट आधारित स्मार्ट उपकरणे वापरता येत नव्हती!

गूगलच्या अधिकृत माहितीनुसार मोठ्या नेटवर्क अडचणीमुळे हा प्रकार घडला असल्याच तूर्तास सांगण्यात आलं आहे. मोठ्या कंपन्याच्या सेवांना अशा अडचणी फार काळ राहत नसल्या तरी अलीकडे यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे हे नक्की. गेल्या काही महिन्यात गूगलच्याच बाबतीत अनेक वेळा झाली आहे. कधी यूट्यूब तर कधी सर्वच सेवा बंद पडण्याचे प्रकार पाहायला मिळाले आहेत.

ADVERTISEMENT

Update: YouTube is back and working again for the large majority of people! If you're still seeing an issue, it should be fixed soon. https://t.co/SEJPWyaeVO

— TeamYouTube (@TeamYouTube) June 2, 2019

आता हा लेख लिहीत असताना या सर्व सेवा पूर्वरत झाल्याचं गूगलतर्फे जाहीर करण्यात आलं आहे. याबद्दल अधिक माहिती अभ्यास करून जाहीर करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे.

मात्र अशा वारंवार घडणार्‍या घटनांमुळे क्लाऊड सेवांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून गूगलसारख्या क्लाऊड सेवा पुरवणार्‍या एकाच कंपनीवर एकाच वेळी अनेक जन अवलंबून असतील आणि त्यांचीच सेवा अशी बंद पडत असेल तर मोठं नुकसान होऊ शकतं.

Tags: Cloud StorageDiscordGoogleGoogle CloudSnapchat
Share6TweetSend
Previous Post

अॅपल आयपॉड टच नव्याने सादर : आता A10 चीपसह उपलब्ध!

Next Post

सारेगामा कारवा गो सादर : खिशात मावणारा म्युझिक प्लेयर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Pixel 6a India

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

July 21, 2022
Google Pixel 6a

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध होणार : Google I/O मध्ये जाहीर!

May 14, 2022
Google Cloud Pune

पुण्यात होणार गूगल क्लाऊडचं नवं ऑफिस!

January 25, 2022
TikTok Most Popular Domain

गूगलला मागे टाकत टिकटॉक बनली सर्वात लोकप्रिय वेबसाइट!

December 23, 2021
Next Post
Saregama Carvaan Go

सारेगामा कारवा गो सादर : खिशात मावणारा म्युझिक प्लेयर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!