MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home सॉफ्टवेअर्स

मायक्रोसॉफ्ट ऑफिससाठी ५ मोफत पर्याय : वर्ड, पॉवरपॉइंट, एक्सेल सर्वकाही!

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
June 19, 2019
in सॉफ्टवेअर्स
WPS Office

मायक्रोसॉफ्ट ऑफिस अनेक गोष्टींसाठी उत्तम प्रोडक्टिव्हिटी टूल आहे परंतु मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या किंमतींमुळे ते अनेकांना परवडण्यासारखे नाही शिवाय अनेकांना तितकी गरजही भासत नाही. त्याचबरोबर अनेकदा मायक्रोसॉफ्ट ऑफिससारख्या सॉफ्टवेअरमुळे परफॉर्मन्समध्ये होणारा बदल आलाच, यासाठीच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मायक्रोसॉफ्ट ऑफिसला उपलब्ध असणारे काही मोफत पर्याय ज्याद्वारे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटमधील सुविधा आपण सहज वापरू शकता.

मायक्रोसॉफ्ट ऑफिसला ५ मोफत पर्याय!

WPS Office – WPS Office हे मायक्रोसॉफ्ट ऑफिससाठी एक उत्तम पर्याय आहे. किंगसॉफ्ट तर्फे विंडोज, लिनक्स, अँड्रॉइड या प्लॅटफॉर्म्सवर WPS Office मोफत उपलब्ध आहे. हे सॉफ्टवेअर रिसोर्स हेवी नसून यामुळे ओव्हरऑल सिस्टिम कामगिरीसुद्धा चांगली राहण्यास मदत होते. मायक्रोसॉफ्ट ऑफिससारखाच याचा UI असून वापरण्यास सोपा आहे. खालील लिंकवरून आपण ते  डाउनलोड करू शकता. मोफत ऑफीस सॉफ्टवेअर्समध्ये WPS सर्वात लोकप्रिय आहे!
डाउनलोड लिंक – WPS Office

ADVERTISEMENT

Google Docs, Sheets, Slides – गूगलतर्फे हे पर्याय आपणास उपलब्ध आहेत. हे सर्व क्लाऊड आधारीत मोफत टूल असून यासाठी आपणास फक्त गूगल अकाउंटची गरज भासते. कोणत्याही ब्राउझरद्वारे आपण गूगलच्या ड्राइव्ह सेवेद्वारे सहजरित्या वापरू शकता. याबरोबरच गूगल क्रोमवरील एक्सटेंन्शन द्वारे ते ऑफलाईन सुद्धा वापरता येईल. गूगलतर्फे उपलब्ध असणाऱ्या अँड्रॉइड अॅप्सद्वारे ऑटो सिंक सुद्धा उपलब्ध असल्यामुळे आपण मोबाईलवरूनही ते वापरू शकता.
लिंक – Google Docs, Google Sheets, Google Slides

Polaris Office – पोलॅरिस ऑफिससुद्धा मोफत उपलब्ध असून यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट सोबतच पीडीफ व्हयुवरचा समावेश आहे. पीडीफ डॉक्युमेंट एडिट तसेच कन्व्हर्ट करण्याची सुविधा यामध्ये आहे. सोबतच क्लाऊड कनेक्टिव्हिटी सारखे फिचर्स उपलब्ध आहेत. हे सुद्धा लाइट वेट टूल असून यामुळे परफॉर्मन्सवर तितकासा परिणाम होणार नाही. विंडोज, लिनक्स, अँड्रॉइड सोबतच मॅकवर सुद्धा हे टूल वापरता येईल.
डाउनलोड लिंक – Polaris Office

Libre Office : हे सॉफ्टवेअर बऱ्याच लिनक्स आधारित डिस्ट्रोवर आधीच दिलेलं पाहायला मिळतं. यामध्येही वर्ड डॉक्युमेंट्स, स्प्रेडशिट्स व प्रेझेंटेशन स्लाईड्स तयार करता येतात!
डाउनलोड लिंक : LibreOffice

Apache Open Office – ओपन ऑफिस हे एक ओपन सोर्स प्रोडक्टिव्हिटी टूल असून सर्वच प्लॅटफॉर्म्सवर मोफत उपलब्ध आहे. हे पूर्णतः ऑफलाईन उपलब्ध असून मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये असणारे बहुतेक फिचर्स यामध्ये उपलब्ध आहेत. यासाठी मागील वर्षी शेवटचा उपडेट उपलब्ध झाला होता.
डाउनलोड लिंक – Apache Open Office

वरील पर्यायांव्यतिरिक्त आणखी अनेक टूल्स उपलब्ध आहेत जसे की SoftMaker FreeOffice, OnlyOffice, Zoho Office इत्यादी.

Search Terms : Top 5 free alternatives to Microsoft office

Tags: AlternativesGoogle DocsOfficeWPS Office
Share4TweetSend
Previous Post

फेसबुकने सादर केली आहे स्वतःची क्रिप्टोकरन्सी : लिब्रा (Libra)

Next Post

विवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान!

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

मायक्रोसॉफ्ट ऑफिस आता अॅपल मॅक अॅप स्टोअरवर उपलब्ध!

मायक्रोसॉफ्ट ऑफिस आता अॅपल मॅक अॅप स्टोअरवर उपलब्ध!

January 25, 2019
विंडोज १० मध्ये लवकरच नव्या आयकॉन्स : ऑफिसमधील वर्ड,  पॉवरपॉईंटलासुद्धा नवं रूप!

विंडोज १० मध्ये लवकरच नव्या आयकॉन्स : ऑफिसमधील वर्ड, पॉवरपॉईंटलासुद्धा नवं रूप!

December 9, 2018
मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१९ आता विंडोज व मॅकवर उपलब्ध!

मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१९ आता विंडोज व मॅकवर उपलब्ध!

September 25, 2018

स्मार्टफोनसाठी बेस्ट अॅप

September 20, 2013
Next Post
Vivo Super Flash Charge

विवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech