MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

मायक्रोसॉफ्टचा अँड्रॉइड स्मार्टफोन सादर! : Surface Duo मध्ये आहेत दोन डिस्प्ले!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 3, 2019
in स्मार्टफोन्स
Microsoft Surface Duo

मायक्रोसॉफ्टने काल पार पडलेल्या मायक्रोसॉफ्ट इव्हेंटमध्ये त्यांच्या सर्फेस उत्पादनांची मालिका सादर केली असून यामध्ये Windows 10X ही ऑपरेटिंग सिस्टम, Surface Pro X, Surface Pro 7 हे टॅब्लेट, Surface Laptop 3 हा लॅपटॉप, Surface Neo हा ड्युयल डिस्प्ले असलेला टॅब्लेट, Surface Earbuds आणि Surface Duo हा ड्युयल डिस्प्ले अँड्रॉइड फोन यांचा समावेश आहे!
यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे मायक्रोसॉफ्ट सर्फेस ड्युओ हा अँड्रॉइड फोन! होय चक्क मायक्रोसॉफ्टने स्वतः ड्युयल डिस्प्ले असलेला अँड्रॉइड फोन सादर केला आहे!

नव्या प्रकारचं फोन डिझाईन असणारं हे डिव्हाईस गूगलच्या अँड्रॉइड टीमसोबत भागीदारी करून बनवण्यात येत असून एकाच फोनमध्ये दोन डिस्प्ले जोडून त्यांच्या अॅप्ससाठी योग्य वापर करता यावा या दृष्टीने बदल करण्यात आले आहेत! हा फोन २०२० मध्ये उपलब्ध होणार असून अद्याप याच्या चाचण्या सुरू आहेत. सध्याच्या डिझाईननुसार तर इंटरनेटवर अनेकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. गॅलक्सी फोल्ड या घडी घालता येणारा डिस्प्ले असलेल्या फोन ऐवजी लोकांची या सर्फेस ड्युओला अधिक पसंती दिसून येत आहे!

ADVERTISEMENT

या फोनमध्ये दोन 5.6 इंची डिस्प्ले असतील जे ३६० अंशात घडी घालून फिरवता येतील. घडी उलगडल्यास 8.3 इंची डिस्प्ले असलेला टॅब्लेट स्क्रीन वापरण्यास मिळेल. यामध्ये ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉइडची असून इतर सुविधा मायक्रोसॉफ्ट पुरवणार आहे. विंडोज फोनच्या अपयशानंतर मायक्रोसॉफ्टचा स्मार्टफोन मार्केटमध्ये पुनःप्रवेश करण्यासाठी नवा प्रयत्न म्हणता येईल. आता तो किती यशस्वी होऊ शकेल हे पुढच्या वर्षी पाहता येईल!

काल दाखवलेल्या डेमोवेळी असलेल्या फोनमध्ये Snapdragon 855 प्रोसेसर असला तरी प्रत्यक्ष फोन सादर होण्यास वेळ असल्याने त्यावेळी सर्वात वेगवान असलेल्या प्रोसेसरचा समावेश केला जाईल असंही मायक्रोसॉफ्टने सांगितलं आहे! 5G च्या समावेशाबद्दलसुद्धा हेच सांगण्यात आलं आहे. बाकी या फोनबद्दल काहीही माहिती यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

Surface Neo : याला मायक्रोसॉफ्टचं स्वतःचं पहिलं ड्युयल डिस्प्ले टॅब्लेटसदृश डिव्हाईस म्हणता येईल. यामध्ये दोन ९ इंची डिस्प्लेंचा वापर केलेला आहे. हे गॅलक्सी फोल्ड प्रमाणे डिस्प्लेची घडी घातली जात नाही तर त्याऐवजी दोन स्वतंत्र डिस्प्लेच एकत्र जोडण्यात आले आहेत! हे उत्पादन डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असून २०२० मध्ये उपलब्ध करून दिलं जाईल असं मायक्रोसॉफ्टने सांगितलं आहे. यासाठी स्वतंत्र कीबोर्ड तयार केला असून तो एका डिस्प्लवर ठेवून वापरता येतो. असे केल्यास त्या एका डिस्प्लेचा उर्वरित भाग टचबार प्रमाणे वापरता येईल आणि मायक्रोसॉफ्टने त्याला वंडरबार नाव दिलं आहे! व्हिडिओ : https://youtu.be/fssZICsV4Rg

Tags: AndroidMicrosoftSmartphonesSurfaceSurface Duo
Share11TweetSend
Previous Post

मायक्रोसॉफ्ट Windows 10X, Surface Pro X, Pro 7, Surface Laptop 3 सादर!

Next Post

Threads : इंस्टाग्रामचं खास जवळच्या मित्रांसाठी नवं अॅप

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
Threads App by Instagram

Threads : इंस्टाग्रामचं खास जवळच्या मित्रांसाठी नवं अॅप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech