MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

आयपीएलचं मराठी समालोचन (कॉमेंट्री) हॉटस्टारवर! #IPL2021

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 9, 2021
in News

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असलेलं आयपीएल आजपासून सुरू होत आहे. या निमित्ताने हॉटस्टारवर लाईव्ह क्रिकेट कॉमेंट्री आपल्या मराठी भाषेत ऐकायला मिळणार आहे! डिज्नी प्लस हॉटस्टारवर ऑडिओ फीडमध्ये मराठी भाषा निवडा आणि आजचा आयपीएलचा पहिला सामन्यात मराठी समालोचनाचा आनंद घेत पहा.

आयपीएल २०२१ चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यामध्ये होणार आहे. आज ९ एप्रिल संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना सुरू होईल.

ADVERTISEMENT

सामना पाहत असताना स्क्रीनवर Language बटन्स दिसतील त्यामधून मराठी भाषा निवडा

या मराठी कॉमेंट्रीसाठी क्रिकेटपटू विनोद कांबळी, संदीप पाटील, अमोल मुजुमदार, स्नेहल प्रधान, कुणाल दाते, प्रसन्न संत आणि चैतन्य संत यांचा समावेश करण्यात आला आहे. यामधील बरेच जण स्वतः आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असल्याने त्यांचा अनुभव प्रेक्षकांना सामना पाहत असताना विविध अंगी विश्लेषण रूपात ऐकायला नक्कीच आवडणार आहे.

स्टार स्पोर्ट्सने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार Star Sports Marathi नावाच्या वाहिनीवरून टीव्हीवर मराठी समालोचन पाहू शकता. मात्र ही वाहिनी जवळपास कोणत्याही प्रमुख डीटीएच ऑपरेटरकडे उपलब्ध झालेली दिसत नाही. त्यामुळे सध्यातरी मराठी समालोचन टीव्हीवर उपलब्ध नसेल. त्यासाठी इंटरनेट आधारित टीव्ही/फायर टीव्ही सारखे स्ट्रीमिंग उपकरण असेल तर त्याद्वारे हॉटस्टारवर हे समालोचन मराठीत ऐकता येईल.

हे उपलब्ध होत आहे तर मराठी प्रेक्षकांनी सुद्धा त्याला प्रतिसाद द्यायला हवा. तरच हे पुढे सुरू राहू शकेल. इतर भाषांऐवजी मराठी भाषेत सेवा वापरण्यास प्राधान्य दिल्यास साहजिकच तिथे मराठी लोकांना संधी द्यावी लागेल पर्यायाने आपणा सर्वांचा त्यामध्ये फायदा होत जाईल.

इतर वेळी आपल्याला मराठी समालोचन ऐकायला मिळत नाही मात्र सुनंदन लेले त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून विविध क्रिकेटपटूंच्या मराठीत मुलाखती सामन्यानंतर शेयर करत असतात.

#IPL2021 starts tomorrow and I'm thrilled to share that I'm going to be part of a very talented commentary team calling the action in Marathi!

Watch the game with us on @DisneyPlusHS, change the language in settings! Nakki ya! pic.twitter.com/jupt8klQby

— Snehal Pradhan (@SnehalPradhan) April 8, 2021

Search Terms : How to watch IPL 2021 online in Marathi, Disney Plus Hotstar IPL Commentary in Marathi Live MI vs RCB

Tags: IPLMarathiSports
ShareTweetSend
Previous Post

शेयरचॅट कंपनीचं व्हॅल्यूएशन आता 14905 कोटींहून अधिक!

Next Post

Clubhouse ॲप नेमकं काय आहे ? : जगभरात चर्चेत असलेल्या ॲपबद्दल…

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
iPhone Marathi Typing

आयफोनवर मराठी टायपिंग करणं आता सोपं झालंय!

November 10, 2022
Amazon Marathi

ॲमेझॉन आता मराठी भाषेत उपलब्ध : ऑनलाईन वस्तू खरेदी आता आणखी सोपी!

September 24, 2021
मराठीटेकची दशकपूर्ती : नवा लोगो, नवं रूप आणि नवी ओळख!

मराठीटेकची दशकपूर्ती : नवा लोगो, नवं रूप आणि नवी ओळख!

August 12, 2021
Next Post
Clubhouse ॲप नेमकं काय आहे ? : जगभरात चर्चेत असलेल्या ॲपबद्दल…

Clubhouse ॲप नेमकं काय आहे ? : जगभरात चर्चेत असलेल्या ॲपबद्दल...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!