MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

MrBeast आता सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेला यूट्यूबर : PewDiePie ला मागे टाकलं!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 16, 2022
in Social Media
MrBeast Most Subscribed

सध्या सर्वात प्रसिद्ध यूट्यूबरपैकी एक म्हणजे MrBeast ज्याचं खरं नाव जिमी डोनाल्डसन असं आहे याने आज जवळपास गेली दहा वर्षं सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेल्या प्युडीपाय (PewDiePie) या यूट्यूबरला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे! आत्ता हा लेख लिहीत असताना MrBeast चे तब्बल ११.२ कोटी सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत!

प्युडीपाय PewDiePie (फिलिक्स शेलबर्ज) हा स्वीडिश यूट्यूबरचे आत्ता ११.१ कोटी सबस्क्रायबर्स आहेत. गेली जवळपास १० वर्षं यूट्यूबचा अनभिषिक्त राजा असलेल्या प्युडीपायला (ऑगस्ट २०१३ पासून) सरतेशेवटी MrBeast ने मागं टाकलं आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी भारतीय म्युझिक कंपनी T Series १० कोटी सबस्क्रायबर्स पूर्ण करण्यासाठी स्पर्धा लागली होती ज्यामध्ये टी सिरिजचा विजय झाला होता. मात्र टी सिरीज ही एक कंपनी असल्यामुळे एक क्रिएटर/यूट्यूबर म्हणून अजूनही प्युडीपाय सर्वाधिक सबस्क्रायबर्सच्या यादीत सर्वात वर होता. गेली अनेक वर्षं गेमिंग, कॉमेडी व रिॲक्शन व्हिडिओ टाकून तो लोकप्रिय होत गेला. मात्र आता त्याच्या सबस्क्रायबर्सच्या संख्येच्या तुलनेत त्याच्या व्हिडिओना व्ह्यूज खूपच कमी म्हणजे काही लाखांमध्येच आहेत.

ADVERTISEMENT
MrBeast चे सर्वात लोकप्रिय व्हिडिओ

दुसऱ्या बाजूला मिस्टर बीस्ट (MrBeast) मात्र प्रचंड वेगाने त्याचे सबस्क्रायबर्स वाढवत गेला. याचे व्हिडिओ म्हणजे काही तरी अचाट प्रकार असतात. १० कोटीव्या सबस्क्रायबरला बेट घेऊन दे, कधी विमान किंवा Lamborghini ला सलग हात लावायला बसवून त्या पाच सहा व्यक्तींपैकी जो शेवटी हात त्याला ते विमान/कार घेऊन देणे, काही व्यक्तींना एका गोलात उभं करून जो शेवटी बाहेर पडेल त्याला ५ लाख डॉलर्स देणे, एका घरावर दहा लाख ख्रिसमस लाइट्स लावणे, विली वोंकाची चॉकलेट फॅक्टरी बनवणे, Squid Game प्रत्यक्षात खेळून त्याची बक्षिसे देणे असे काहीही विषय असलेले व्हिडिओ बनवतो.

वाचताना विचित्र वाटत असेल पण तुम्ही स्वतः हे व्हिडिओ त्याच्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. https://www.youtube.com/user/MrBeast6000

या सर्व व्हिडिओना किमान ५ ते १० कोटी व्ह्यूज असतातच! यामुळेच पुढे याचे सबस्क्रायबर्स मोठ्या प्रमाणात वाढत गेले. २०१९ मध्ये याचे २ कोटी सबस्क्रायबर्स होते आणि आता तीन वर्षात ते थेट ११ कोटींवर पोहोचले आहेत. Netflix च्या मध्यंतरी चर्चेत असलेल्या Squid Games वर आधारित व्हिडिओला तर तब्बल ३० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत! त्याचे व्हिडिओ करण्यासाठी सुरुवातीपासून त्याचे ४-५ मित्र सोबतीला असतात शिवाय मोठे व्हिडिओ शूट करण्यासाठीही तो आता मोठी टीम कामाला ठेवतोय! याच्या मुख्य चॅनलची सुरुवात २० फेब्रुवारी २०१२ मध्ये झाली होती.

आणि तो या सर्व व्हिडिओवर खरेच तेव्हढे लाखो रुपये खर्च करतो. अर्थात त्यानुसार त्याला व्ह्यूज मोठ्या प्रमाणात मिळतात आणि तेच पैसे तो पुढच्या व्हिडिओमध्ये गुंतवतो (असं त्याचं म्हणणं आहे)

विशेष म्हणजे याच MrBeast ने PewDiePie चे T Series च्या आधी १० कोटी सबस्क्रायबर्स पूर्ण व्हावेत म्हणून पैसे खर्चून जाहिराती करत ऑनलाइन मोहीम राबवली होती! बिलबोर्डस, एफएम, टीव्ही अशा सर्व ठिकाणी जात प्युडीपायच्या चॅनलला सबस्क्राइब करण्याचं आवाहन केलं होतं!

Mr Beast चे सर्व चॅनल्स आणि त्यांची सबस्क्रायबर्स संख्या!

Mr Beast ने आता MrBeast Burger म्हणून स्वतःच्या ब्रॅंड अंतर्गत ऑनलाइन बर्गर विकायला सुरवात केली आणि काही दिवसांपूर्वीच त्यांचं पहिलं रेस्टोरंट सुरू केलं ज्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल १०००० लोकांनी हे बर्गर घेण्यासाठी रांग लावली होती!

एका बाजूला यूट्यूब व्हिडिओवर वारेमाप पैसे खर्च करत असताना तो अधूनमधून सामाजिक कार्यासाठीही त्याच्या प्रसिद्धीचा वापर करतोय. २०१९ मध्येच त्याच्या यूट्यूब चॅनलचे २० मिलियन सबस्क्रायबर्स होत असताना ट्विटरवर प्रश्न विचारला की माझ्या २० मिलियन (२ कोटीव्या) सबस्क्रायबरला काय देऊ? तर त्यावर रेडिट या दुसऱ्या प्रसिद्ध वेबसाईटवर अनेकांनी त्याने २० मिलियन म्हणजे २ कोटी झाडे लावावीत असं सुचवलं. मग त्याने लगेच TeamTrees मोहीम सुरू केली आणि २ कोटी झाडे लावली सुद्धा…! यासाठी त्याने सोशल मीडिया मार्फत दान करण्याचं आवाहन केलं होतं त्याला इलॉन मस्क, Tobi Lutke (Shopify CEO), Marc Benioff (Salesforce CEO), Susan Wojcicki (YouTube CEO), Jack Dorsey (तेव्हाचे Twitter CEO) यांनीही मोठी मदत केली होती.

पुढे यासाठी त्यानं Beast Philanthropy नावाचं स्वतंत्र चॅनल सुरू केलं आणि समुद्र किनारा स्वच्छ करणे, आफ्रिकेत विहिरी बांधणे, बेघरांना घरे बांधून देणे, कपडे, जेवण उपलब्ध करून देणे अशीही कामे करण्यास सुरुवात केली. अशा कामांसाठी त्याच्या ऑनलाइन फॅन्सना आमंत्रित करून त्यांनाही सहभागी करून देतो. अर्थात त्याच्यावर नेहमीच पैसे उडवण्यावरून टीका होत असली तरी दुसऱ्या बाजूला त्याचे असेही प्रयत्न सुरू आहेत.

Tags: MrBeastSocial MediaStatsYouTubeYouTubers
ShareTweetSend
Previous Post

व्हॉट्सॲप कम्युनिटी उपलब्ध : कम्युनिटी आणि ग्रुपमध्ये फरक काय ?

Next Post

इंस्टाग्रामवर आता फोटो पोस्टलासुद्धा गाणी/संगीत जोडता येईल!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Ronaldo YouTube Channel

फुटबॉलपटू रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल : २४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

August 22, 2024
MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

June 2, 2024
Community Notes India

X (ट्विटर) वरील Community Notes आता भारतात उपलब्ध!

April 4, 2024
YouTube Adblockers

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

November 1, 2023
Next Post
इंस्टाग्रामवर आता फोटो पोस्टलासुद्धा गाणी/संगीत जोडता येईल!

इंस्टाग्रामवर आता फोटो पोस्टलासुद्धा गाणी/संगीत जोडता येईल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech