MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : Starfield सोबत अनेक नव्या गेम्स जाहीर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 13, 2023
in गेमिंग

काल झालेल्या Xbox Games Showcase 2023 कार्यक्रमात बऱ्याच नव्या गेम्स जाहीर करण्यात आल्या असून लवकरच उपलब्ध होणाऱ्या गेम्सचा गेमप्लेसुद्धा दाखवण्यात आला. एक्सबॉक्स आता कॉन्सोल, पीसी, एक्सक्लाऊड अशा माध्यमांद्वारे जवळपास प्रत्येक डिव्हाईसवर उपलब्ध झालेलं आहे. शिवाय एक्सबॉक्स गेम पास ही लोकप्रिय गेम सबस्क्रिप्शन सेवा गेल्यावर्षीच्या तुलनेत आता आणखी गेमर्सना एक्सबॉक्स गेम्सकडे घेऊन येत आहे.

या कार्यक्रमात २७ गेम्स दाखवण्यात आल्या त्यापैकी २१ एक्सबॉक्स गेमपास वर उपलब्ध होणार आहेत! यानंतर स्टारफील्डसाठी खास स्टारफील्ड डायरेक्ट द्वारे गेमबद्दल सर्व माहिती देण्यात आली. अनेक वर्षांनी Bethesda कंपनीने एव्हढया मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण अशी गेम बनवली आहे.

ADVERTISEMENT

सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेली बहुप्रतीक्षित स्टारफील्ड (Starfield) या गेमचा गेमप्ले यावेळी दाखवण्यात आला. यासोबत खालील गेम्स जाहीर झाल्या किंवा त्यांचा गेमप्ले या कार्यक्रमात दाखवण्यात आला. यापैकी बऱ्याच गेम्स या वर्षी तर काही पुढच्या वर्षी उपलब्ध होतील.

South of Midnight, Clockwork Revolution, Fable, Microsoft Flight Simulator 2024, Sea of Thieves: The Legend of Monkey Island, Star Wars Outlaws, Kunitsu-Gami: Path of the Goddess, Cyberpunk 2077: Phantom Liberty, Dungeons of Hinterberg, 33 Immortals, Metaphor: ReFantazio, Persona 3 Reload, Persona 5 Tactica, Cities: Skylines II, Jusant, Like a Dragon: Infinite Wealth, Kunitsu-Gami: Path of the Goddess, Payday 3, Still Wakes the Deep, The Elder Scrolls Online: Necrom, Fallout 76 – Road to Atlantic City, Avowed, Forza Motorsport, Senua’s Saga: Hellblade II, Towerborne

स्टारफील्डबद्दल या जाहीर झालेल्या नव्या गोष्टीमुळे ही गेम नक्कीच सर्वात प्रसिद्ध गेम्सपैकी एक असू शकेल असं मत आता गेमर्स व्यक्त करत असून व्हिडिओमध्ये सध्या काही त्रुटी दिसत असल्या तरी एकंदरीत खूप मोठं जग त्यामध्ये करता येणाऱ्या गोष्टी पाहता ही गेम गेमर्सना आवडेल असं दिसत आहे. एक्सबॉक्सवर तूर्तास ही 30fps वर लॉक केलेली असेल असं सांगितल्यवर मात्र अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पीसीवर मात्र fps unlocked आहे त्यामुळे पीसीवरचा गेमप्ले जास्त चांगला असेल.

Starfield च्या Steam पेजवर System Requirements मध्ये OS: Windows 10 version 22H2 (10.0.19045), Processor: AMD Ryzen 5 2600X, Intel Core i7-6800K, Memory: 16 GB RAM, Graphics: AMD Radeon RX 5700, NVIDIA GeForce 1070 Ti, DirectX: Version 12, Storage: 125 GB available space, Additional Notes: SSD Required किमान अशा हार्डवेअरची गरज असल्याचं सांगितलं आहे.

याच कार्यक्रमात एक्सबॉक्सने त्यांचं नवं मॉडेल Xbox Series S in Carbon Black 1TB SSD सुद्धा जाहीर केलं आहे.

या कार्यक्रमात जाहीर झालेल्या सर्व गेम्सबद्दल थोडक्यात माहिती देणारा हा ट्रेलर

Tags: BethesdaGamingStarfieldXboxXbox Game Studios
ShareTweetSend
Previous Post

ॲपलचा Vision Pro व्हर्च्युअल रियालिटी (VR) हेडसेट जाहीर!

Next Post

Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

January 25, 2024
Baldur’s Gate 3 ठरली गेम ऑफ द इयर : द गेम अवॉर्ड्स २०२३

Baldur’s Gate 3 ठरली गेम ऑफ द इयर : द गेम अवॉर्ड्स २०२३

December 8, 2023
Next Post
Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech