भारतीय अंतराळ स्टार्टअप अग्निकुल कॉसमॉसने गुरुवारी जगातील पहिले सिंगल पीस 3D प्रिंटेड रॉकेट इंजिनद्वारे असलेलं त्यांचं पहिलं सब-ऑर्बिटल चाचणी वाहनाचं यशस्वी उड्डाण पूर्ण केलं!
अग्निबाण SOrTeD (सब-ऑर्बिटल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर) गुरुवारी सकाळी ७.१५ वाजता अवकशात झेपावले. भारतातील खाजगी स्टार्टअपचे हे दुसरे प्रक्षेपण असले तरी, कंपनीने श्रीहरिकोटा येथे देशातील पहिल्या खासगी स्पेसपोर्टवर स्थापित केलेल्या खासगी लॉन्चपॅड वापरणारे हे पहिले प्रक्षेपण होते. याआधी अग्निबाणचं प्रक्षेपण किमान चार वेळा रद्द झालं होतं.
या मोहिमेची रचना हे रॉकेट ८ किलोमीटरची उंची गाठण्यासाठी करण्यात आली होती. या मोहिमेसाठी IIT Madras आणि भारत सरकारच्या IN-SPACe या सरकारी संस्थेच्या मदतीने त्यांनी हे यश मिळवलं आहे!