MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home AI

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 11, 2025
in AI

अडोबीने आपल्या प्रमुख क्रिएटिव्ह आणि प्रोडक्टिव्हिटी टूल्स Adobe Photoshop, Adobe Express आणि Adobe Acrobat यांचा ChatGPT मध्ये थेट समावेश केला आहे. या मोठ्या अपडेटमुळे ChatGPT वापरकर्त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरच फोटोशॉपमधील काही सोयी वापरता येणार आहेत तेसुद्धा मोफत!

या नव्या इंटिग्रेशनमुळे बेसिक फोटो एडिटिंग, डिझाईन्स आणि डॉक्युमेंट एडिटिंग ChatGPT मध्येच करता येईल.

ADVERTISEMENT

ChatGPT मध्ये फोटोशॉप कसं वापरायचं ?

  1. ChatGPT वर जा त्यानंतर डाव्या कोपऱ्यात खाली तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करून Settings मध्ये जा
  2. आता आलेल्या स्क्रीनवर Apps & Connectors निवडा
  3. आता Browse Apps मधून Adobe Photoshop सिलेक्ट करा
  4. त्यानंतर आलेल्या स्क्रीनवरील मेसेज वाचून Connect वर क्लिक करा.
  5. आता तुम्ही जिथे ChatGPT सोबत चॅट करता तिथे खाली असलेल्या + वर क्लिक करून More > Adobe Photoshop सिलेक्ट करा
  6. आता तुम्हाला एडिट करायची असेल ती फाइल अपलोड करा आणि तुम्हाला हवा असलेला बदल ChatGPT ला सांगा.

Photoshop आता ChatGPT मध्ये फोटोशॉपच्या मदतीने आता तुम्ही:

  • विशिष्ट फोटो भाग सुधारू शकता
  • ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट, एक्सपोजर बदलू शकता
  • इफेक्ट्स लावू शकता
  • बॅकग्राऊंड काढून टाकू शकता.
  • याचं सर्व नियंत्रण स्लायडर्ससहित ChatGPT मध्ये मिळते, ज्यामुळे एडिटिंग सोपं होईल.

ChatGPT मध्ये फोटोशॉपसाठी उपलब्ध prompts

  • Blur background.
  • Make my image look creative with effects
  • Remove background
  • Make colors more vibrant
  • Pop subject
  • Apply an effect or adjustment to the background
  • Apply an effect or adjustment to a specific part of the image

या नवीन Adobe टूल्स सर्व ChatGPT वापरकर्त्यांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. Photoshop, Adobe Express आणि Acrobat ChatGPT च्या: डेस्कटॉप, वेब, iOS वर उपलब्ध आहेत. Android साठी तूर्तास फक्त Adobe Express चाच सपोर्ट आहे. Photoshop व Acrobat लवकरच Android च्या ChatGPT ॲपवर येत आहेत.

अर्थात हे पूर्ण फोटोशॉप सॉफ्टवेअर नाही. अगदी मर्यादित सोयी याद्वारे देण्यात आल्या आहेत. शिवाय आपल्याला आणखी पर्याय हवे असतील तर Adobe Photoshop Web कडे जा असा मेसेजसुद्धा दिसतो. थोडक्यात छोटं एडिटिंग व इफेक्टस् असतील तर ते याद्वारे करता येईल. त्यापेक्षा आणखी पर्याय हवे असतील तर फॉटोशॉप वेब वर जा आणि त्यापेक्षाही आणखी सोयी हव्या असतील तर नेहमीचं फोटोशॉप सॉफ्टवेअर वापरा.

अधिक माहितीसाठी संदर्भ : https://blog.adobe.com/en/publish/2025/12/10/edit-photoshop-chatgpt

Tags: AcrobatAdobeAdobe ExpressChatGPTEditingPhotoshop
ShareTweetSend
Previous Post

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

Next Post

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025
ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
Next Post
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech