MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

आता यूट्यूबवर जाणारा वेळ नियंत्रित करण्याची सोय : रोज किती वेळ जातो हे पहा!

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
August 29, 2018
in इंटरनेट, ॲप्स

यूट्यूब अनेकांसाठी व्हिडिओ पाहण्याचे प्रमुख माध्यम, अनेकांचा बऱ्यापैकी वेळ यावर जातोच. गाणी, विनोदी कार्यक्रम, मदतीसाठी, एखादी गोष्ट कशी करायची असे किमान ४-५ व्हिडिओज सहज पाहिले जातातच.
मे मध्ये झालेल्या गूगल I/O मध्ये गूगलने काही टूल्स सादर केले होते जेणेकरून लोकांना तंत्रज्ञान वापराबद्दल माहिती मिळावी व यामुळे महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता यावं. त्याचाच एक भाग म्हणून गूगलने आता यूट्यूब अॅप वापराबाबत सर्व टूल्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. ज्याद्वारे आपण किती वेळ व्हिडिओ पाहिले आहेत? याबद्दल माहिती मिळवता येईल तसेच वेळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिमाइंडर लावण्याची सोय, नोटिफिकेशन्सचा आवाज बंद करणे, अनेक ऐवजी एकच नोटिफिकेशन यांचा समावेश आहे.

तुम्ही प्रत्यक्षात किती वेळ व्हिडिओ पाहिले?
तुमचा किती वेळ यूट्यूबवर व्हिडिओ पाहण्यात गेला हे प्रोफाइल मध्ये पाहता येणार आहे. दररोजच्या वेळेसोबतच मागील सात दिवसांमध्ये किती वेळ व्हिडिओ पाहण्यात घालवला हे सुद्धा याद्वारे समजणार आहे. खालीलप्रमाणे तुमची  प्रोफाइल पाहण्यासाठी प्रथम अकाउंटवर जावे लागेल (उजव्या कोपऱ्यामध्ये आयकॉनवर क्लिक करून)  यानंतर Time Watched वर क्लिक करून आपण प्रोफाइल पाहू शकता .
Account icon > Time Watched


ADVERTISEMENT

ब्रेक घेण्यासाठी स्वतःला आठवण करून द्या
यूट्यूबवर जाणारा वेळ आपणास समजल्यानंतर वेळ कमी करण्यासाठी लिमिट_सुद्धा लावता येणार आहे. यासाठी Remind me to take a break वर क्लिक करून वेळ नोंदवता येईल. यानंतर आपण सेट केलेल्या वेळेवर यूट्यूब आपणास आठवण करून देईल.

याव्यतिरिक्त यूट्यूबकडून येणाऱ्या अनेक नोटिफिकेशन्स ऐवजी आपण दिवसातून एकदाच सर्व नोटिफिकेशन्स मिळविण्याचा पर्याय निवडू शकता. यानंतर यू ट्यूब सर्व नोटिफिकेशन्स एकत्र करून दाखवेल.
नोटिफिकेशन साऊंड बंद करण्यासाठी पर्याय_सुद्धा यामध्ये आहे जेणेकरून नोटिफिकेशन्समुळे आपले कामावरून लक्ष विचलित होणार नाही.

यावर्षी आलेल्या अँड्रॉइड ९ पायमध्ये Digital Wellbeing For Android चा समावेश असून आपण कोणत्या अॅपमध्ये किती वेळ घालवत आहोत हे पाहता येणार आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुक, इंस्टाग्रामवर  जाणार्‍या वेळेचं नियोजन करण्यासाठी सुद्धा त्यांच्यातर्फे टूल्स उपलब्ध करून देण्यात आले असून याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Tags: AppsDigital WellbeingHow ToYouTube
Share27TweetSend
Previous Post

बर्कशायर हॅथवेची पेटीएममध्ये गुंतवणूक!

Next Post

शायोमी वापरकर्त्यांचा डेटा आता भारतातल्या सर्व्हरवरच साठवणार!

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

ॲपल ॲप स्टोअरवरील २०२४ चे सर्वोत्तम ॲप्स व गेम्स अवार्ड्स जाहीर!

December 12, 2024
Best of 2024 Play Store

गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

December 12, 2024
Next Post
शायोमी वापरकर्त्यांचा डेटा आता भारतातल्या सर्व्हरवरच साठवणार!

शायोमी वापरकर्त्यांचा डेटा आता भारतातल्या सर्व्हरवरच साठवणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech