डीजेआय हे कॅमेरा ड्रोन्सच्या विश्वातल सर्वात मोठ नाव. फॅन्टम सिरीजच्या ड्रोन्सच्या यशानंतर त्यांनी आणलेल्या गुंडाळून कुठेही सहज नेता येणार्या मॅव्हीक प्रोला मोठ यश मिळालं. गोप्रोने याला उत्तर म्हणून त्यांचासुद्धा पोर्टेबल ड्रोन कर्मा सादर केला होता मात्र त्यामधील सुरूवातीचे बिघाड आणि नंतर कमी झालेली विक्री अशाने त्यांना ड्रोन बाजारातून काढता पाय घ्यावा लागला. आता गोप्रो केवळ अॅक्शन कॅमेरावर लक्ष केंद्रीत करून आहे.

मॅव्हीक प्रो काही महिन्यांपूर्वी डीजेआयचा नवा स्पार्क नावाचा आणखी लहान ड्रोन सादर झाला. जो कधीही ड्रोनशी संबंध न आलेल्या प्राथमिक अवस्थेत फोटोग्राफी करणाऱ्या फोटोग्राफर्सना समोर ठेऊन बनवला गेला होता. याविषयी काही बाबतीत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही दिवसांपूर्वी सीईएसमध्ये DSLR कॅमेरासाठी वापरता येणारा स्टॅबिलायझर गिम्बल रॉनीन एस व ओस्मो 2 सादर झाले होते. भारतामध्ये काही महिन्यापासून ड्रोन्सचा वापर वाढलेला दिसून येत आहे.
आता मॅव्हीक प्रो आणि स्पार्क यांचा मध्य साधत या दोन्हीच्या मधल्या आकाराचा मॅव्हीक एअर हा ड्रोन सादर केला आहे! यामध्ये अधिक उत्तम गिम्बल व डिझाईन आहे. हा बऱ्यापैकी खिशात मावणारा 4K रेकॉर्डिंग असलेला चांगला ड्रोन आहे.
DJI Mavic Air ड्रोनची खास वैशिष्ट्ये :
32MP स्फीयर पॅनारोमा
दुमडता येतो आणि कुठंही घेऊन जाण्या सारखं डिझाईन
एव्हढ्या लहान आकाराच्या ड्रोनमध्ये प्रथमच 3-Axis गिंबल (Gimbal)
1/2.3″ 12MP कॅमेरा, f2.8, 4K 30fps रेकॉर्डिंग
स्मार्ट कॅप्चर
२१ मिनिट फ्लाईट टाइम (एका चार्जवर २१ मिनिटे उडवता येईल!)
किंमत : $799 (~₹५१,०००)
अधिकृत माहितीसाठी डीजेआय वेबसाइट : DJI Mavic Air












Hey keep posting such good and meaningful articles.