MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

सर्वांत मोठा वायफाय झोन बिहारमध्ये

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 2, 2014
in News
patnaबिमारू राज्य अशी बिहारची ओळख पुसून टाकण्यात दिवसेंदिवस यश येत असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून बिहारने विकासाच्या बाबतीत कात टाकली आहे. सर्वच क्षेत्रात बिहार आघाडी घेत असताना तंत्रज्ञानाच्या बाबतही या राज्याने गुजरातपासून थेट बीजिंगपर्यंत आपले आव्हान निर्माण केले आहे. जगातील सर्वांत मोठा ‘वायफाय झोन’ निर्माण करण्याचा मान चीनने मिळवला होता. बीजिंग शहरात उभारण्यात आलेला ‘वायफाय झोन’ साडेतीन किलोमीटरचा आहे. मात्र, नितीश सरकारने चीनची या क्षेत्रातील मक्तेदारी मोडण्याचा निर्णय घेतला आहे. राजधानी पाटणानजीक जगातील सर्वांत मोठा ‘वायफाय झोन’ निर्माण करण्याचे शिवधनुष्य बिहार सरकारने उचलले आहे. पाटणा ते धनपूर या मार्गावर एनआयटी पाटणा ते अशोक राजपथ ते धनपूर या दरम्यान जगातील सर्वांत मोठा म्हणजे २० किमी अंतराचा वायफाय झोन निर्मिला जाणार आहे. सध्या देशात सर्वत्र ‘वायफाय झोन’ निर्मितीची लाट पसरली आहे.


देशातील पहिले वायफाय झोन असणाऱ्या शहराचा मान नुकताच बेंगळुरूने मिळविला. ‘नम्म वायफाय’ या नावाने ही अगदी चकटफू सेवा एम. जी. रोड, ब्रिगेड रोड, सीएमएच रोड या व्यतिरिक्त यशवंतपूर, कोरमंगला आणि शांतीनगर बसस्टँडच्या परिसरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांनीही अहमदाबाद शहरामध्ये मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. दिल्ली सरकारचीही अशीच योजना प्रस्तावित आहे.


नुकत्याच बिहारमध्ये पार पडलेल्या ‘ई-बिहार’ परिषदेत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘डायल १००’ आणि ‘सिटी सर्व्हेलन्स’ या महत्त्वाकांक्षी योजना सादर केल्या. ‘सिटी सर्व्हेलन्स’ अंतर्गत रस्त्यांवर हजारो सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून प्रवाशांची विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष पुरविण्यात येणार आहे. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मिळणारा डेटा साठवून ठेवण्यासाठी अत्याधुनिक डेटा सेंटरही उभारण्यात येणार आहे. या दोन्ही योजनांद्वारे राजधानी पाटणा गुन्हेमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे वाहनांच्या नंबरप्लेट आणि प्रत्येक व्यक्तीचा चेहरा तपासू शकतील, या दर्जाचे आहेत. या योजनेतून संपूर्ण पाटणा शहरावर २४ तास सीसीटीव्हीची करडी नजर ठेवण्यात येणार आहे. 

ADVERTISEMENT
Tags: BiharIndiaInternetWiFi
ShareTweetSend
Previous Post

सॅमसंग GALAXY S5 लॉन्च : फिंगरप्रिंट स्कॅनर हार्ट रेट स्कॅनर

Next Post

‘गुगल ट्रेकर’ कसे काम करते..

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
अग्निकुल कॉसमॉस या खासगी स्पेस कंपनीच्या अग्निबाण रॉकेटचं यशस्वी उड्डाण!

अग्निकुल कॉसमॉस या खासगी स्पेस कंपनीच्या अग्निबाण रॉकेटचं यशस्वी उड्डाण!

June 1, 2024
Data Protection Bill

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक संसदेत मंजूर

August 10, 2023
भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

December 29, 2022
Next Post
‘गुगल ट्रेकर’ कसे काम करते..

'गुगल ट्रेकर' कसे काम करते..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech