MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Security

फुकट अॅप्सची किंमत भारी

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 30, 2013
in Security, ॲप्स
कुठलीही गोष्ट मोफत मिळत असेल , तर सर्वांचा पहिला ओढा त्याकडे असतो . पण या मोफत गोष्टींसाठी आपल्याला केवढी मोठी किंमत मोजायला लागते हे बहुतांश लोकांच्या लक्षात येत नाही . गुगल , याहू मोफत इमेल सेवा पुरवतात .पण त्याबदल्यात ते यूजर्सवर जाहिरातींचा मारा करतात .आता तर या कंपन्यांनी यूजर्सचे मेल , सर्फिंग केलेल्या साइट्सच्या आधारे त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन जाहिराती देणे सुरू केले आहे . अशाच पद्धतीने फ्री अॅप्सही यूजर्सकडून काही छुपी किंमत वसूल करत आहेत . 



अॅप्स तयार करणाऱ्या प्रत्येक कंपनीला मोफत अॅप पुरविणे शक्य नसते. काही कंपन्या यूजर बेस वाढविण्यासाठी ,
अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी मोफत अॅप पुरवतात. छोट्या कंपन्यांना मात्र त्यातून उत्पन्न मिळणे गरजेचे असते . या कंपन्या त्यासाठी जाहिरातींची मदत घेतात . या जाहिराती सुरुवातीला त्रासदायक वाटत नसल्यातरी त्या तुमच्या इंटरनेटचे पॅकेज घटवत असतात. यामाध्यमातून तुमच्यावर मालवेअरचा हल्ला होऊ शकतो . गुगल प्लेवरील ७४ टक्के अॅप्सच्या माध्यमातून मालवेअरचा हल्ला होतो , असे मकॅफीचा अहवाल सांगतो .

मालवेअरच्या हल्ल्याचा धोका 
बहुतांश अॅप्स इन्स्टॉल करताना अनेक परमिशन्स विचारल्या जातात . कोणत्या परमिशन्स विचारल्या जात आहेत याकडे न पाहता आपण डोळे मिटून ओके करतो . त्यात अनेकवेळा पर्सनल माहिती , कॉल रेकॉर्ड , डिव्हाइसमधील डेटा अॅक्सेस करण्याची परवानगी विचारली जाते . अगदी गेम किंवा बातम्यांचे अॅप्सही तुमच्याकडे पर्सनल इन्फॉर्मेशन 
अॅक्सेस करण्याची परवानगी विचारतात . यामुळे संबंधित अॅप तयार करणाऱ्या कंपन्या हा डेटा जाहिरातदारांना 
पुरवतात . मग तुमच्या आवडीनिवडींचा विचार करून तुमच्या मोबाइलवर जाहिराती पाठविल्या जातात किंवा 
तुमच्या मोबाइलवर विविध ऑफर्स , लॉटरीचे एसएमएस पाठवले जातात . त्यानंतर तुमच्या नावे तुमच्या 
फ्रेंडलिस्टमधल्यांना किंवा कॉन्टक्टलिस्टमध्ये असलेल्या व्यक्तींना काही चुकीचे मेल , मेसेज पाठविले जातात . यासाठी काहीवेळा तुमच्या मोबाइलमधील बॅलन्सचाही उपयोग केला जाऊ शकतो . 


‘ गुगल प्ले ‘ चा वापर सुरक्षित 
त्यातल्या त्यात सुरक्षेची बाब म्हणजे , गुगल प्लेसारख्या प्लॅटफॉर्मवरून मिळणारे अॅप तुलनेने सुरक्षित असतात .कारण या कंपन्यांकडून अॅप्स उपलब्ध करून देण्याआधी काही सुरक्षा चाचण्या केल्या जातात . या चाचण्यांवर ते पात्र ठरले नाहीत , तर गुगल ते नाकारते . मग हे अॅप्स इतर वेबसाइटवर उपलब्ध होतात . त्यामुळे अनेक अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये गुगल प्ले व्यतिरिक्त इतर प्लॅटफॉर्मवरून अॅप्स इन्स्टॉल करायचे किंवा नाही यासाठी विशेष सेटिंग्ज करावी लागते . 
शक्यतो गुगल प्ले व्यतिरिक्त इतर पर्यायांमधून अॅप्स इन्स्टॉल न करणे हा खबरदारीचा पहिलामार्ग आहे . 

ADVERTISEMENT
Tags: AndroidAppsFreewareGooglePlay StoreSecurity
ShareTweetSend
Previous Post

व्हॉट्स अ मिसहॅप! व्हॉट्सअॅपवर ‘तिरंगा’ नाही!

Next Post

‘टॅब्लेट’ची मुसंडी, विक्री ४०० टक्क्यांनी वाढली

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Next Post

'टॅब्लेट'ची मुसंडी, विक्री ४०० टक्क्यांनी वाढली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech