MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Security

धोका ‘फेक मेसेजिंग अॅप्स’चा

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 4, 2012
in Security, ॲप्स
APPs.jpgमोबाइल व ई – मेल हे संवादाचे उत्तम माध्यम बनले असले ,तरी त्यातही आपणच आपल्याला कुणाच्याही नावे बनावटमेसेजेस करण्याची नवी अॅप्स बाजारात आली आहेत .संशयाने पोखरलेले कौटुंबिक नातेसंबंध किंवा व्यावसायिकअसूया यांच्यात मोबाइल – ईमेलवरील अशा माध्यमांचावापर वाढला असल्याने फेक मेसेजेसच्या अॅप्लिकेशनची त्यातनवी भर पडेल , अशी भीती तज्ज्ञांना वाटते . 

आपणच स्वतःला तिऱ्हाईतांच्या नावे ई – मेल करायचे आणित्यांचा भांडणतंटे किंवा व्यावसायिक काटाकाटीत पुरावाम्हणून वापर करायचा , असे प्रकार काही प्रकरणात उघडझाले आहेत . अशा प्रकारांमध्ये इंटरनेटवरील प्रॉक्सीसर्व्हरचा वापर केला जातो . हे सर्व्हर नायजेरिया , इंग्लंडआदी देशांमध्ये असल्याने भारतातील सायबर पोलिसांनागुन्हेगारापर्यंत पोहोचणे अशक्य बनते . आश्चर्य म्हणजे ,प्रत्यक्षात हा गुन्हेगार भारतातूनच फेक संदेशांचे व्यवहारकरीत असतो . काही पेड किंवा अनपेड वेबसाइट्सवरूनहीस्वतःच स्वतःला तिऱ्हाईत व्यक्तींच्या नावे ई – मेल करण्याचीसुविधा उपलब्ध होते . त्याचाही गैरवापर होत असतो , असेगुप्तवार्ता अधिकाऱ्यांना तपासात आढळले आहे . काहीदिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाने तपास केलेल्या एका प्रकरणात एक बडी खासगी बँक बंदहोत असल्याच्या अफवा फेक संदेशाद्वारे पसरविण्यात आल्या होत्या . ठेवीदार खात्यातील पैसे काढू लागल्यावरत्यावर प्रकाश पडला होता . 

या माध्यमांमध्ये स्मार्टफोनसाठी उपलब्ध झालेल्या फेक मेसेजेस या अॅपची भर पडली आहे . यात इनकमिंग आणिआऊटगोइंग असे दोन्ही मेसेजेस कुणाच्याही नावे बनावट स्वरुपात तयार करण्याची सोय आहे . केवळ हे मेसेजेसतिऱ्हाइत व्यक्तीपर्यंत पाठविले जात नाहीत , इतकेच . केवळ मेसेजेस नव्हे तर कॉलच्या वेळा , आदी तपशीलांचेबनावट रेकॉर्ड तयार करण्याचे तंत्रही या अॅपमध्ये असते . 

अलीकडे पती – पत्नींमधील बिघडलेले संबंध आणि संशयाचे गढूळ वातावरण यांच्यात मोबाइलवरील मेसेजेसचावेगवेगळे दावे – प्रतिदावे करण्यासाठी उपयोग केला जातो . हे प्रमाण आता वाढल्याचे सायबर डिटेक्टिव्ह तज्ज्ञसांगतात . त्याचप्रमाणे दोन व्यवसाय भागीदारांमध्येही मोबाइल संभाषणांचा , कॉल रेकॉर्ड्सचा वापर केला जातो. एकमेकांमधले फेक मेसेजेस क्लायंटना दाखविल्यास त्यांचा त्यावर विश्वास बसू शकतो . 

पोलिस किंवा कोर्टाकडून या प्रकरणांच्या चौकशीचे आदेश आल्यास मोबाइल कंपन्यांमार्फत कॉलरेकॉर्ड्सचीखातरजमा होऊ शकते . पण प्रकरणे पोलिसांपर्यंत जाण्यापूर्वीच मेसेजेस , कॉल्सचे लॉग यांच्यावरून बिघडलेल्यानातेसंबंधांना तणावाचे नवे कारण मिळालेले असते . फेक मेसेजेस हे अशा प्रकारे दिशाभूल करू शकतात . त्यांचागैरवापर होऊ शकतो किंवा त्यातून नाहक गोंधळही उडू शकतो .
ADVERTISEMENT
Tags: AppsMessagingSafetySecurity
ShareTweetSend
Previous Post

टॅबलेटसाठी भारत मोठी बाजारपेठ || — स्‍वस्‍त टॅबलेटची विक्री सर्वात जास्‍त

Next Post

पोर्टेबल ड्राइव्ह :: पेन ड्राइव्ह

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Next Post
पोर्टेबल ड्राइव्ह ::  पेन ड्राइव्ह

पोर्टेबल ड्राइव्ह :: पेन ड्राइव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech