MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Windows

आठवी खिडकी उघडली!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 30, 2012
in Windows, ऑपरेटिंग सिस्टिम्स

PICS: अवघ्या 699 रुपयांत बदलेल तुमच्या कॉम्प्युटरचे जग!

कम्प्युटर , स्टायलसवर आधारित स्मार्टफोन , टचस्क्रीन फोन, टॅब्लेट पीसी , लॅपटॉप आदी सर्व आधुनिक युगातील संदेशवहन आणि माहितीसाठा करणाऱ्या गॅजेट्सना पूरक ठरणारी बहुचर्चित ‘ विंडोज ८ ‘ ही नवी ऑपेरेटिंग सिस्टिम गुरुवारी मायक्रोसॉफ्ट कंपनीने बाजारात आणली . 

ADVERTISEMENT

विंडोज यूजरना ‘ विंडोज ८ ‘ साठी अपग्रेड करणे शक्य होणार असून, तशी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . 


या नव्या सिस्टिममुळे संधीची नवी खिडकी उघडण्याबरोबरच तंत्रज्ञान क्षेत्रात कंपनी पुन्हा एकदा झेपावेल , अशी अपेक्षा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) स्टीव्ह बालमेर यांनी व्यक्त केली . विंडोज अपग्रेडची सुविधा ३९ . ९९डॉलरपासून उपलब्ध असेल , असे कंपनीच्या विंडोज विभागाचे अध्यक्ष स्टीव्हन स्निफेस्की यांनी जाहीर केले
 . गॅजेटप्रेमींसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे जगातील अग्रेसर आयटी कंपनी ‘मायक्रोसॉफ्ट’ने भारतात ‘विंडोज- 8’ लॉन्च केले आहे. गेल्या 17 वर्षांमध्ये लॉन्च केलेल्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ‘विंडोज- 8’ हे नवे आणि  अद्ययावत आहे. जगभरातील रिटेल आणि कॉर्पोरेट ग्राहकांना शुक्रवारपासून ‘विडोंज- 8’ उपयोगात आणता येईल.
मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष भास्कर यांनी सांगितले की, ऑफरनुसार ग्राहकांना विंडोज- 8 सोबत अनेक अ‍ॅप्लीकेशन मिळणार आहेत. तसेच कॉम्प्युटर, स्मार्टफोन आणि टॅबलेट्‌सला डोळ्यांसमोर ठेवून ‘विंडोज-8’ विकसित करण्यात आले आहे.

PICS: अवघ्या 699 रुपयांत बदलेल तुमच्या कॉम्प्युटरचे जग!****विंडोज-8′ दिसायला अतिशय आकर्षक आहे. याच्या इंटरफेसमध्ये उपयोगात आणल्या गेलेल्या अ‍ॅप्लीकेशन्स ‘क्लस्टर’च्या रुपात युजर्सला स्क्रीनवर दिसतात. प्रत्येक क्लस्टरमध्ये विविध टाईल्स आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक एका टाइल्सला मूव्ह करता येऊ शकते. सर्व दिसणार्‍या टाइल्स लाइव्ह होत असतात. उपयोगात नसलेल्या अ‍ॅप्लीकेशन्स स्वत: अपडेट होत असतात. त्यामुळे अ‍ॅप्लिकेशन क्षणात उघडतात.
PICS: अवघ्या 699 रुपयांत बदलेल तुमच्या कॉम्प्युटरचे जग!विंडोज-8′ मध्ये आपल्याला ‘स्टार्ट’ बटन दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या बोटांचा उपयोग करावा लागेल. विंडोज-8 हे बहुतेक टच स्क्रीन मोबाईल, टॅबसाठी फायदेशीर ठरेल. लॉग इन करताच आपल्याला ‘स्टार्ट’ मेन्यूवर टिचकी द्यावी लागेल
भारतीय बाजारात ‘विंडोज-8’ हे  ‘विंडोज-8’ आणि ‘विंडोज प्रो’ या दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध असेल. मात्र ‘विंडोज- 8′ व्हॅनेला व्हर्जनमध्ये एनक्रिप्शन आणि विंडोज–टू-गो नामक फीचर्स देण्यात आलेले नाही.’
PICS: अवघ्या 699 रुपयांत बदलेल तुमच्या कॉम्प्युटरचे जग!विंडोज-8′ चे दुसरे खास फीचर पिक्चर पासवर्ड असेल. तुम्हाला पाहून हे ऑपरेटिंग सिस्टिम तुम्हला एक्सेस करण्याची परवानगी मागेल. त्यासाठी तुम्हाला एक खास टच करावा लागेल.    

इझी टू यूज-  स्मार्टफोन आणि टॅब्लेटवर काम करणार्‍यांसाठी इझी टू यूज हे फीचर फायदेशीर आहे. अप इन क्लाउड-  ‘विंडोज 8’मध्ये आपल्याला अनेक इंटरनेट सुविधा मिळतील. त्या माध्यमातून तुम्ही स्काय ड्राइव्ह सारखे क्लाउड स्टोरेजचा उपयोग करू शकता.

PICS: अवघ्या 699 रुपयांत बदलेल तुमच्या कॉम्प्युटरचे जग!

विंडोज-8 डिव्हाइस विंडोज अ‍ॅप स्टोअर्ससोबत येतील. या स्टोअर्समध्ये प्रत्येक दिवशी 700 नवे अ‍ॅप्लीकेशन्स येतात. यात काही भारतीय कंपन्यांच्या अ‍ॅप्स देखील उपलब्ध असतात. त्यात ‘मेक माय ट्रिप’, ‘ब्रप्प’, ‘बुक माय शो’ यांचा समावेश असतो.


जर तुम्ही XP, विस्टा आणि विंडोज-7 ला कंटाळले असाल तर तुम्ही विंडोज-8चा पर्याय निवडू शकतात. ते ही अवघ्या 699 रूपयांत. ‘विंडोज-8’ हा पर्याय निवडण्यासाठी कंपनीने एक अट ठेवली आहे. ती म्हणजे, तुमचे कॉम्प्युटर 2 जून 11 ते 31 जानेवारी 12 या कालावधीत खरेदी केलेले असावे. याशिवाय अन्य ग्राहकांना विंडोज- 8 ने आपले डिव्हाइस अपग्रेड करण्यासाठी  1,999 रुपये मोजावे 

लागतील.PICS: अवघ्या 699 रुपयांत बदलेल तुमच्या कॉम्प्युटरचे जग!मायक्रोसॉफ्ट विंडोज-8 हे विंडोज-7, xp अथवा विस्टा सारख्या ऑपरेटिंग सिस्टिमने अपग्रेड करू शकता. परंतु, यासाठी हार्डवेअरची आवश्यकता आहे. 1 GHz का प्रोसेसर,  किमान 1 GB RAM (32-bit) अथवा 2 GB RAM (64-bit), हार्डडिस्क- 16 GB अथवा 20 GB,   DirectX 9 ग्राफिक डिव्हाइस, WDDM 1.0 अथवा या पेक्षा मोठा ड्रायव्हर आणि 1024×768 रिझोल्यूशनचे स्क्रीन.


दीर्घकाळ चालणारी बॅटरी , वेगवान बूटिंग , लहान मेमरी याबरोबर ‘ विंडोज ७ ‘ च्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरना ‘ विंडोज ८ ‘ पूरक असणार आहे . माउस , की – बोर्ड आणि टचबरोबर काम करता येऊ शकेल , असेयाचे डिझाइन आहे आणि हेच या ऑपरेटिंग सिस्टिमचे वैशिष्ट्य आहे . ‘ विंडोज ८ ‘ आणि ‘ सरफेस टॅब्लेट ‘ ची विक्री शुकव्रारपासून सुरू होणार आहे . 


सध्याच्या स्टार्ट मेनू आणि आयकन्सच्या पलीकडचा विचार करून ‘ विंडोज ८ ‘ चा डिस्प्ले तयार करण्यात आला आहे . अॅप्लिकेशनच्या अपडेट्सची माहिती यावरून मिळू शकणार आहे . टचस्क्रीनचा लक्षात घेऊन यावरील टाइल मोठ्या करण्यात आल्या आहेत . त्यामुळे ‘ टच ‘ करणे सोपे जाणार आहे . स्पीकरचा आवाज नियंत्रित करण्यासाठी ऑयकॉन आपोआप झाकला जातो .यापूर्वी लाँच झालेल्या काहीऑपरेटिंग सिस्टिमची चर्चा आणि त्यांना मिळालेला प्रतिसादही चांगला होता .  विंडोज ८ या ऑपरेटिंग सिस्टिमचाही गाजावाजा होण्यासाठी कंपनीने प्री – लाँचसाठी प्रयत्न केले आहेत . मात्र ,कंपनीकडून पूर्वी लाँच झालेल्या ऑपरेटिंग सिस्टिमला मिळालेला प्रतिसाद विंडोज ८ ला मिळणार का यावर तज्ज्ञांकडून शंका व्यक्त केली जात आहे . 

Tags: MicrosoftOperating SystemsWindows 8
ShareTweetSend
Previous Post

इंटरनेटची साथ प्रगतीला

Next Post

स्मार्ट ‘विन्डोज ८’

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

February 20, 2025
Crowdstrike BSOD Windows

जगभरातील विंडोज वर्क पीसीज् बंद : बँका, विमानतळे, रेल्वे अशा सेवा विस्कळीत!

July 19, 2024
Apple WWDC 2024

ॲपल WWDC24 कार्यक्रम : iOS 18, macOS Sequoia, Apple Intelligence जाहीर!

June 11, 2024
Next Post
स्मार्ट ‘विन्डोज ८’

स्मार्ट ‘विन्डोज ८’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech