Sooraj Bagal

Sooraj Bagal

बदलणारं तंत्रज्ञान जग : ट्रेंड्स

तंत्रज्ञानामुळे आतापर्यंत दररोजच्या आयुष्यात खूप बदल झालेत . बदलांची ही प्रक्रीया अशीच सातत्याने सुरू राहणार आहे . जगणं अधिकाधिक सोपं करण्याच्या दृष्टीने सध्या तज्ज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत . आयबीएमने नुकतेच आगामी पाच - दहा वर्षात लोकांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवू शकणाऱ्या काही संशोधनांची यादी जाहीर केली आहेत . सध्या सुरू असलेले संशोधन , नवनवीन तंत्रज्ञान आणि समाजातील ट्रेंड्सवरुन ही यादी तयार करण्यात आली आहे .  दृष्टी सध्या गुगलचे गॉगल्स अॅप फोटोतील गोष्टी ओळखून त्यांची माहिती देते . पण येत्या दशकाअखेर कम्प्युटर केवळ छायाचित्रांवरून ओळख पटवणार नाही तर मानवाप्रमाणे पिक्सेलनुसार समोरची गोष्ट ओळखू शकेल .उदाहरणार्थ भविष्यात लाल सिग्नल पाहून थांबायचे आहे , हे कम्प्युटरला कळेल . किंवा एखाद्या व्यक्तीला कोणते कपडे योग्य दिसतात , हे सांगू शकेल . वस्त्रोद्योगात सध्या अधिकाधिक ऑनलाइन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या तंत्राचा उपयोग सुरू आहे . हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रासाठी खूप फायदेशीर ठरेल . त्यामुळे निरोगीपेशी आणि दूषित पेशींमधील फरकही ओळखता येऊ शकेल .  स्पर्श गेल्या कित्येक दशकांपासून यंत्रांना स्पर्श आणि संवेदनांची जाणीव व्हावी यासाठी तज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत .त्यांना लवकरच यश मिळेल अशी चिन्हे आहेत . टचस्क्रीन मोबाइल , टॅबलेट ही त्याचीच सुरुवात आहे . सध्या इन्फ्रारेड , प्रेशर सेन्सिटिव्ह तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्श ओळखणे यासारख्या गोष्टींवर संशोधन सुरू आहे . त्यामुळे भविष्यात कम्प्युटरला कापडाला स्पर्शकरुन त्याचा प्रकार किंवा त्वचेला स्पर्श करून निदान करता येईल .  गंध एखादा वास घेऊन तो फुलाचा आहे की कृत्रिम हे ओळखणे लवकरच कम्प्युटरला शक्य होणार आहे . त्यामुळे स्क्रीनवर पाहून चमचमीत खाद्यपदार्थाचा गंध सामावून घेणे शक्य होईल . एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून येणारा गंध , श्वासातील विविध घटक आणि शारीरिक हालचालींवर यंत्राच्या सहाय्याने डॉक्टर दमा , डायबिटीस ,फिट्स येणे , किडनीतील बिघाड वगैरे आजारांचे निदान करू शकतील . सध्या डिजीसेंट आणि ट्रायसेनएक्स या कंपन्या कम्प्युटरच्या मदतीने गंध तयार करणारे उपकरण तयार करत आहेत . डिजीसेंटने केमिकल स्ट्रक्चरच्या आधारे हजारो गंध एकत्र केले असून सेंट स्पेक्ट्रमच्या आधारे त्याच्या डिजिटायझेशनचे काम सुरू आहे . जेणेकरून कम्प्युटर गंध ओळखू शकेल . आयबीएमही सेन्सर्सच्या आधारे परिसरातील केमिकल्स गोळा करण्याचे तंत्र विकसित करत आहे . त्यावरून साफसफाई झाली आहे का , प्रदूषण किती आहे याचा अंदाज येऊ शकेल . सध्या पर्यावरणातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी किंवा दुर्मिळ कलाकृती जतन करण्यासाठी आयबीएम यातंत्राचा वापर करत आहे .  चव विविध पदार्थातील मूळ घटकांच्या मॉलेक्युल्सची चाचणी करून , मानवी मनाला आवडणारी चव आणि गंधयांचा संयोग साधून चव ओळखण्याचे तंत्र तयार करत आहे . लक्षावधी रेसिपींची तुलना करुन आयबीएम हे तंत्र विकसित करते आहे . जपानमध्येही त्सुकुबा विद्यापीठात खाद्यपदार्थाची चव आणि त्यानंतर तोंडात तयार होणा -या विविध क्रियांचे विश्लेषण करण्यासाठी फूड सिम्युलेटर विकसित करण्यात गुंतले आहे . विविध केमिकल्स एकमेकांबरोबर कशी वागतात , त्यातील बाँडिंग स्ट्रक्चर यांच्या अल्गोरिदमचे विश्लेषण करुन चव ओळखण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत .  ध्वनी कम्प्युटरने ध्वनीचे विश्लेषण सुरू केल्यानंतर आवाज , त्यामागील प्रेशर , ध्वनी तरंग ओळखणे सोपे होणार आहे .त्यामुळे परिसरात घडणा - या बारीकसारिक बदलांवरुन भविष्यातील हालचालींचे अंदाज वर्तवता येतील .उदाहरणार्थ , वा - याच्या आवाजात झालेला बदल यावरुन वादळ , भूकंप यांचा अंदाज वर्तवता येईल . 

काश्मिरी युवतीने बनवलं ‘अँड्रॉइड अॅप’

गरजेच्या सुविधांसाठी ' डायल काश्मीर ' ठरणार वरदान  प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने पुढे जाण्याचा काश्मिरी मातीचा गुणधर्म आहे. काश्मीरसाठी विशेष अँड्रॉइड अप्लिकेशन तयार करणाऱ्या २३वर्षीय...

‘विंडोज’मध्ये पुन्हा दिसेल ‘स्टार्ट बटन’

विंडोजच्या वेगवेगळ्या व्हर्जन्सशी सगळेच परिचित आहेत .बहुतेक सगळेच जण ' विंडोज ' ची ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात . ' विंडोज व्हिस्टा ', ' विंडोज ७ ', ' विंडोज ८ 'नंतर आता ' विंडोज ब्लू ' किंवा ' विंडोज ८ . १ ' येऊ घातलेआहे . विंडोजच्या आधीच्या व्हर्जनमध्ये असलेल्या उणीवा दूर करून नवीन व्हर्जन अधिक आकर्षक आणि यूझर फ्रेंडली करण्याची ' मायक्रोसॉफ्ट ' ची हातोटी आहे .  पण , ' विंडोज८ ' च्या बाबतीत ही ' हातोटी ' तितकीशी यशस्वी झाली नाही . टच स्क्रीनची सुविधा नसलेल्या कम्प्युटरवर ही सिस्टीम तितकी समर्थपणे ऑपरेट झाली नाही आणि थेट डेस्कटॉपला बूट न होणे या बाबी अनेकांना पटल्या नाहीत . त्यामुळे किमान या दोन बाबींचे समाधान ' विंडोज 'ने द्यावे , अशी मागणी यूझरकडून बराच काळ होत होती .  ग्राहकांचा हा तक्रारींचा सूर ' मायक्रोसॉफ्ट ' पर्यंत पोहोचला असावा . येऊ घातलेल्या ' विंडोज ब्लू ' मध्ये ' स्टार्टबटन ' पुन्हा दिसणार असल्याची चर्चा कम्प्युटर जगतात आहे . थेट डेस्कटॉपलाही बूट करता येणार आहे . या नव्या व्हर्जनमध्ये हे बदल होण्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे . खात्रीशीर वृत्त मात्र नाही . त्यामुळे हे नक्की काय गौडबंगाल आहे , हे जाणून घेण्याचे कुतूहल ग्राहकांमध्ये आहे . मात्र , असा बदल झाला , तर तो ग्राहकांसाठी इष्टच आहे . असे झाले , तर कंपनीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असे होईल , की मायक्रोसॉफ्ट ' बॅक फूट' वर गेली आहे आणि पुन्हा एकदा यूझरच्या मागणीला अनुसरून आपल्या सिस्टीममध्ये ती पूर्वीप्रमाणे बदल करेल.  नव्या व्हर्जनमध्ये पहिल्यांदा हे बदल प्रस्तावित नव्हते . पण , ते होण्याची दाट शक्यता आहे . वेगवेगळ्या माध्यमांतून गेल्या आठवड्यांपासून ही वृत्ते येत आहेत . ' मेट्रो स्टाइल ' मध्ये होणाऱ्या बूटिंगला फाटा देऊन थेट डेस्कटॉप बूटिंग यूझरना करता येईल , अशी सुविधा पुरवण्याकडे मायक्रोसॉफ्टची वाटचाल सुरू आहे . ' विंडोज 'वर ' स्टार्ट बटन ' ही पुन्हा येण्याची शक्यता असल्याचे विविध सूत्रांनी सांगितले आहे .  ' विंडोज ब्लू ' चे उत्पादन या वर्षी कदाचित सुरुवात होईल . त्यावेळी हे दोन्ही बदल होतील , की नाही हे सर्वांना कळेलच . तत्पूर्वी काही अधिकृत घोषणा झाली , तर ग्राहकांसाठी उत्तमच ! ' विंडोज ८ ' चा यूझर इंटरफेस हा चांगला आहे . मात्र , टच स्क्रीन नाही , त्यांच्यासाठी ' विंडोज ' चे जुनेच व्हर्जन चांगले , असे सध्या म्हणावे लागत आहे . बरेचसे यूझर त्यामुळे जुन्याच व्हर्जन्सना पसंती देत आहेत . ' विंडोज ब्लू ' मधील नव्या बदलाने हा त्रास टळून विंडोज अधिक यूझर फ्रेंडली सिस्टीमचा वापर सर्वांना करता येईल , याची आशा बाळगूया . 

ई-मेलचे मॅनेजमेंट

दोन तास १४ मिनिटे ... आपण दिवसातील एवढा वेळ ई -मेल तपासण्यासाठी घालवत असतो . याचाच अर्थ असा की आपण आपले ई - मेल्स तपासणे आणि त्याला उत्तरे देण्यासाठी आपल्या कामाच्या वेळेतील २५ टक्के वेळ खर्च करत असतो . मॅकेन्सीने नुकतेच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार सन २०१२मध्ये ' ई - मेल ' हे दैनंदिन कामातील सर्वात मोठे काम असल्याचे समोर आले आहे .  इनबॉक्समध्ये येणाऱ्या ई - कॉमर्स किंवा डिस्काउंटच्या जाहिराती त्रासदायक ठरतात . बड्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या एका माणसाला दिवसाला किमान १०० ई - मेल्स वाचायचे असतात . ही माहिती टेक्नॉलॉजी मार्केटिंग फर्म रडेकटी ग्रुपने केलेल्या पाहणीत समोर आली आहे . यातील बहुतांश मेल्स डीलीट करण्यात वेळ वाया जातो . कामाच्या गडबडीत वेळ वाचवायचा असेल तर काही सुविधांचा वापर करता येऊ शकेल .  अनरोल डॉट मी (Unroll.me) - यामध्ये सर्व ई - मेल्सच्या इनबॉक्समधील जाहिरातींचे मेल्स आपण एकाच वेळी जमा करू शकतो . याला ' डेली डायजेस्ट ' म्हणतात . तुमच्या मेल्समधील मसेजेस इथं आले की , तुम्ही ते सर्व ई -मेल्स डिलिट करू शकतात . ही सेवा जीमेल आणि याहू मेल यांच्यासाठी उपलब्ध आहे .  फॅन मिक्स (FanMix) - जे सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करतात अशा युजर्ससाठी ही सेवा उपयुक्त ठरूशकते . यामध्ये आपल्या ई - मेलवर येणारे सर्व नोटिफिकेशन्स एकत्र केली जातात . याचा फायदा असा की ,आपल्याला ट्विटर , फेसबुक , लिंक्डइन आणि ब्लॉग कन्व्हरसेशन एका ठिकाणी दिसू शकतात . यात आपल्याला फेसबुक नोटिफिकेशनबरोबरच फेसबुक मेसेजेसही पहावयास मिळतात .  सेनबॉक्स (SaneBox) - या सेवेमध्ये महत्त्वाचे नसलेले ई - मेल्स एकत्रित केले जातात . जेणेकरून इनबॉक्समध्ये आपल्याला केवळ महत्त्वाचे मेल्स उपलब्ध राहतील . ही सुविधा आपण जीमेल , याहू , एओएल , अॅपल मेल ,आऊटलूक , आयफोन , अँड्रॉइड या सर्वांसाठी उपलब्ध आहे .  द ई - मेल गेम (The Email Game) - आपला इनबॉक्समध्ये एकही बिनकामाचा मेल न ठेवण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे ' द ई - मेल गेम ' यामध्ये आपल्या इनबॉक्समधील मेल्सचे व्यवस्थित बायफरकेशन केले जाते .यामुळे आपला इनबॉक्स अधिक स्वच्छ दिसू शकतो .  झीरो बॉक्सर (0Boxer) - ही एक जीमेलची प्लगइन टूल आहे . या माध्यमातून आपण आपले मेल्स अर्काइव्हमध्ये ठेऊ शकतो तसेच आपल्या ई - मेल्सला रिप्लायही देऊ शकतो . ही सुविधा सध्या बीटा मोडमध्ये उपलब्ध आहे .पण या सुविधेमध्येही आपण आपला इनबॉक्समध्ये एकही मेल राहणार नाही याची काळजी घेऊ शकतो .

Page 283 of 325 1 … 282 283 284 … 325
ADVERTISEMENT
error: Content is protected!