Sooraj Bagal

Sooraj Bagal

इंटरॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड ‘ मायक्रोसॉफ्ट ‘

टेक्नॉलॉजी हा बदलता आणि सतत संधोधनाचा विषय आहे .टेक्नॉलॉजीमघील काही घडामोडी आणि संशोधन पाहिले , की हा ' जादूचाच कारखाना ' वाटावा , इतक्याघडामोडी अत्यंत वेगाने घडताना दिसत आहेत . स्मार्टफोन क्षेत्रात सध्या जी तीव्र स्पर्धा चालू आहे , त्यातून थोडेसेबाहेर डोकावून पाहिले , की सॉफ्टवेअर क्षेत्रातही नवनवे संशोधन चालू आहे आणि त्यासाठी अब्जावधी रुपयांचानिधी खर्च केला जात आहे , हे लक्षात येते . ' मायक्रोसॉफ्ट ' लवकरच ' इंटरॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड ' लाँच करणारआहे . या प्रॉडक्टची तयारी कंपनीत सध्या जोरात चालू आहे . ' लार्ज स्क्रीन टेक्नॉलॉजी ' प्रकारात हे संशोधन येत असून अशा प्रकारची विविध संशोधने कंपनीमध्ये चालू आहेत . ' मायक्रोसॉफ्ट ' कंपनी तयार करत असलेल्या या संवादात्मक बोर्डमुळे लोकांशी ' संवाद ' साधणे सोपे होणार आहे. हा संवाद म्हणजे संभाषण नव्हे , तर तो असेल प्रेझेंटेशनरूपी संवाद आणि त्यासाठी मदत होणार आहे स्केचेसची. युझरने काही स्केचेस काढले , तर त्यावरून पूर्ण ग्राफिक , चार्ट पूर्ण करता येईल . घरी , ऑफिसमध्ये ; तसेचजवळपास सगळ्याच ठिकाणी या ' इंटरअॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड ' चा वापर करता येईल . यूझरना त्यांना हव्याअसलेल्या डायग्राम्स तयार करता येतील . प्रेझेंटेशन अधिकाधिक ' इंटरअॅक्टिव्ह ' करण्यासाठी याचा उपयोगहोईल . सध्या ' मायक्रोसॉफ्ट ' चेच पॉवरपॉइंट हे सॉफ्टवेअर प्रेझेंटेशनसाठी अनेक ठिकाणी वापरले जाते . ' टेकफेस्ट ' या कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या मेळ्यामध्ये हे संशोधन सादर होईल . या ठिकाणी अनेक देशांतील शास्त्रज्ञत्यांचे संशोधन सादर करतात . ' मायक्रोसॉफ्ट ' ही आपले नवीन संशोधन सादर करणार आहे . वर्षातून एकदाहोणाऱ्या या ' टेकफेस्ट ' मध्ये व्हाइटबोर्डचे प्रोटोटाइप सादर केले जाणार आहे . या संशोधनासाठी कंपनीने इतरकंपन्यांच्या तुलनेत मोठा निधी खर्च केला आहे . अब्जावधी डॉलरची गुंतवणूक या संशोधनामागे आहे .  ' टेकफेस्ट ' मध्ये या बोर्डाचे प्रत्यक्ष काम कंपनीच्या वॉशिंग्टनमधील रेडमंड येथील हेडक्वार्टरच्या बोंगशिन लीसादर करतील . एका मोठ्या टचस्क्रीनवर एक इमेज काढली जाईल . ही इमेज आणि प्री - लोडेड डेटा यांचावापर करून ग्राफिक , चार्ट , डायग्राम , नकाशे तयार करता येतील . यासाठी ' डिजिटल कॅनव्हास ' तयार केलाआहे . हा बोर्ड बनवण्याचे काम मायक्रोसॉफ्ट करत असून ' लार्ज स्क्रीन टेक्नॉलॉजी ' मध्ये कंपनी करत असलेल्याअनेक प्रयोगांपैकी हा एक आहे . मायक्रोसॉफ्टच्या या प्रयत्नाला यश आले , तर तंत्रज्ञानामधील ती एक मोठीअचिव्हमेंट ठरणार आहे . 

एचपीचा ‘अ‍ॅलिएट पॅड’ देणार अ‍ॅपल आणि सॅमसंगला टक्कर!

स्मार्टफोन आणि टॅब्लेट कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. गॅझेट जगतात दिवसागणिक स्मार्टफोन आणि टॅब्लेट बाजारात दाखल होत आहे. 'एचपी' (हॅवलेट...

बार्सोलिनात मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्‍ये जगातील सर्वात वेगवान मोबाइल बाजारात!

हवावेच्या जगातील सर्वात वेगवान मोबाइलच्या सादरीकरणाने बार्सोलिना येथील मोबाइल वर्ल्ड काँग्रेसला प्रारंभ झाला. या वार्षिक प्रदर्शनामध्ये जगभरातील 1500 कंपन्या सहभागी...

भारतात लॉंच झाला ब्‍लॅकबेरी Z10 स्‍मार्टफोन, नोकियाचे चार नवे हॅन्डसेट

ब्‍लॅकबेरीने अतिशय महत्त्वाकांक्षी स्‍मार्टफोन BB Z10 भारतात लॉंच केला आहे. पूर्णपणे टचस्‍क्रीन यंत्रणेवर आधारीत असलेला हा फोन अमेरिकेपूर्वी भारतात लॉंच...

सोनीचा जगातील सर्वात पातळ आणि वॉटरप्रूफ टॅब्लेट बाजारात

जपानी इलेक्ट्रॉनिक कंपनी सोनीने जगातील सर्वात पातळ व वॉटरप्रूफ-डस्टप्रूफ टॅब्लेट ‘सोनी एक्सपीरिया झेड’ लाँच केला. स्पेन येथील बार्सिलोना शहरात सुरू...

Page 284 of 317 1 283 284 285 317
ADVERTISEMENT
error: Content is protected!