Tag: Facebook

फेसबुकवरून मोफत कॉल?

एसएमएसपाठोपाठ फेसबुकने आता मोफत व्हॉइल कॉलिंगचीसुविधाही देण्याची तयारी सुरू केली आहे . सध्या कॅनडातीलस्मार्टफोन युझर्सना ही सुविधा देण्यात येत आहे . फेसबुक मेसेंजर अॅप अपडेट केलेल्यांना या माध्यमातून व्हॉइसओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल ( व्हीओआयपी ) सुविधा देण्यात येत आहे .  फेसबुकने तीन जानेवारीपासून अपडेट केलेल्या मेसेंजर अॅपच्या माध्यमातून जगभरातील युझर्सना व्हॉइस मेसेजपाठविण्याची सुविधा देऊ केली आहे . या माध्यमातून व्हाइस मेसेज पाठविण्यासाठी + बटन प्रेस केल्यानंतरव्हॉइस मेसेज पाठविण्याची सुविधा सुरू होते . यात रेकॉर्ड बटन प्रेस ठेवल्यापासून रेकॉर्डिंग सुरू होते व त्याबटनावरून हात बाजूला केल्यास रेकॉर्डिंग बंद होते आणि मेसेज पाठवला जातो . बोट स्लाइड केल्यानंतर मेसेजरद्द करता येतो . याचबरोबर कंपनीने इंटरनेटवरून मोफत व्हॉइस कॉल देण्याचीही सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीनेपावले टाकायला सुरुवात केली आहे . सध्या कॅनडातील आयफोन युझर्सवर या सुविधेची चाचणी घेण्यात येत आहे. त्यात अॅपवरील ' आय ' प्रेस केल्यावर फ्री कॉलचा पर्याय निवडता येतो . फेसबुक या कॉलसाठी कुठलेही शुल्कघेत नसले , तरी यासाठी युझरच्या डेटा प्लॅनमधील डेटा वापरला जातो . त्यामुळे रूढार्थाने यासाठी कुठलेही शुल्कद्यावे लागत नसले , तरी डेटा मात्र वापरला जातो आहे .  सध्या सुमारे एक अब्ज ७ लाख फेसबुक युझर्स असून त्यापैकी ६० कोटी यूझर्स मोबाइलवरून फेसबुक वापरतात .त्यातील सुमारे ४७ कोटी लोक अॅपच्या माध्यमातून फेसबुक वापरतात आणि उर्वरित फेसबुकची मोबाइल व्हर्जनवापरतात . सुमारे १४ कोटी आयफोन युझर्स तर साडेचार कोटी आयपॅड युझर्स आयपॅडवरून फेसबुक वापरतात .त्यामुळेच सुरुवातीला कंपनीने त्यांच्यासाठी हे व्हर्जन चाचणीसाठी उपलब्ध करून दिले असावे , असा अंदाज आहे.  आगामी काळात फेसबुक व्हिडिओ मेसेजिंगची सुविधाही देईल , अशी अपेक्षा आता या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करूलागले आहेत . पण पारंपारिक नंबरवरून कॉल करण्याच्या पद्धतीकडे दुर्लक्ष करून फेसबुकच्या माध्यमातून कॉलकरण्याच्या नव्या प्रयत्नांसाठी ग्राहकांचे मन वळविणे मात्र कंपनीला कठीण जाईल , अशी शक्यता वर्तवली जातआहे . पण मोफत मिळणारी सुविधा पाहून ग्राहक याकडे आकर्षित होतील . त्यामुळे भविष्यात कुणाचाहीमोबाइलनंबर सेव्ह करण्याची गरज राहणार नाही . थेट फेसबुक फ्रेण्ड्समधून संबंधित व्यक्ती शोधायचा आणि थेटकॉल करायचा . 

अनोळखी ‘फेसबुकर’ला मेसेजसाठी १ डॉलर!

आपण फेसबुकवर भ्रमंती करत असतो... अचानक आपल्यालाएखादा चेहरा, एखादं प्रोफाइल आवडतं... त्याच्याशी / तिच्याशी मैत्री करावीशी वाटते आणि आपण लगेचच त्याला' फ्रेण्ड रिक्वेस्ट ' पाठवतो... कधीकधी या रिक्वेस्टसोबतमेसेजही पाठवतो . मात्र आता अशा अनोळखी (नॉन-फ्रेण्ड) 'फेसबुकर ' ला मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला एक डॉलर, अर्थात ...

फेसबुक सुरक्षित पण स्लो होणार

वेगाच्या नव्या तंत्रज्ञानाच्या जगात रोज नवनवीन सर्व्हर , प्रोसेसर , तंत्रज्ञान यामुळे कम्प्युटर वेबसाइटचा वेग दिवसेंदिवस वाढतो आहे . सोबतच सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आहे . ऑनलाइन अॅक्टिव्हिटी अधिकाधिक सुरक्षित होण्यासाठी कंपन्या नवनवीन प्रणालीचा उपयोग करत आहेत . ही सुरक्षा वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या फेसबुकचा वेग मात्र नव्या प्रणालीमुळे कमी होणार आहे .  युजर्सचे अकाऊंट अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी फेसबुक सुरुवातीला उत्तर अमेरिकेतील युजर्सला स्थलांतरितकरणार असून नंतर जगभरातील इतर ठिकाणच्या युजर्सला ही सुविधा दिला जाणार आहे . त्याठिकाणाहून फेसबुक https या http पेक्षा अधिक सुरक्षित कनेक्शनवर काम करणार आहे . त्यामुळे फेसबुकच्या वेब अॅड्रेसच्या अगदी सुरुवातीला http ऐवजी https दिसणार आहे . यातील s म्हणजे सिक्युअर . प्रामुख्याने बँकींग , ऑनलाइन शॉपिंग कंपन्या क्रेडीट कार्ड किंवा पासवर्डची माहिती मागताना अशाप्रकारच्या कनेक्शनचा वापर करतात .  फेसबुकच्या सर्व १ अब्जाहून अधिक युजर्ससाठी हेच कनेक्शन वापरले जाणार आहे . जानेवारी २०११ मध्ये फेसबुकने या स्थलांतरणाची सुरुवात केली . आतापर्यंत काही ठिकाणी ही सुविधा पर्यायी उपलब्ध होती .भारतातही इंटरनेट एक्सप्लोअरर सारख्या ब्राऊझरवर http तर मोझिलावर https कनेक्शन उपलब्ध होते . मात्र लवकरच सर्वांना ती बंधनकारक केली जाणार आहे . त्यामुळे अधिक सुरक्षित होण्याबरोबरच फेसबुक सुरक्षितहोणार आहे . वेग कमी होण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी फेसबुककडून प्रयत्न केले जात असले तरी https वर ट्रान्सफर होण्यासाठीची प्रक्रिया थांबवणार नसल्याचे फेसबुकचे फ्रेडरीक वूलन्स यांनी स्पष्ट केले आहे .  या बदलाचा एक फायदा म्हणजे फेसबुक अकाऊंट अधिक सुरक्षित तर होईलच सोबत हॅकर्सपासूनही त्यांचे संरक्षण होईल . कारण https मध्ये सर्व डेटा एनक्रिप्टेड फॉर्ममध्ये असणार आहे . त्यामुळे वायफाय कनेक्शन वापरताना किंवा फेसबुक लॉग आऊट न करता कम्प्युटर बंद केल्यावरही अकाऊंटची सुरक्षा कायम राहणार आहे . या स्थलांतरणाचा आणखी एक फायदा म्हणजे ओळख नसलेल्या व्यक्तींनाही आता फेसबुक गेम खेळण्यासाठी आमंत्रित करता येईल . त्यामुळे फेसबुकच्या गेमिंगचा महसूल वाढणार आहे .  जानेवारी २०१० मध्ये जीमेलने सर्व युजर्सला https वर स्थलांतरित केले होते . पुढे जुलै २०१० मध्ये वेब ब्राऊझिंगच्या स्पीडमध्ये कुठलाही फरक पडला नसल्याचे जीमेलने म्हटले होते . हॉटमेल आणि ट्विटरवरही पूर्वीपासून https कनेक्शन वापरले जात आहे . 

Page 17 of 18 1 16 17 18
ADVERTISEMENT
error: Content is protected!