MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

फेसबुक सुरक्षित पण स्लो होणार

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 28, 2012
in News

वेगाच्या नव्या तंत्रज्ञानाच्या जगात रोज नवनवीन सर्व्हर , प्रोसेसर , तंत्रज्ञान यामुळे कम्प्युटर वेबसाइटचा वेग दिवसेंदिवस वाढतो आहे . सोबतच सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आहे . ऑनलाइन अॅक्टिव्हिटी अधिकाधिक सुरक्षित होण्यासाठी कंपन्या नवनवीन प्रणालीचा उपयोग करत आहेत . ही सुरक्षा वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या फेसबुकचा वेग मात्र नव्या प्रणालीमुळे कमी होणार आहे . 

युजर्सचे अकाऊंट अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी फेसबुक सुरुवातीला उत्तर अमेरिकेतील युजर्सला स्थलांतरितकरणार असून नंतर जगभरातील इतर ठिकाणच्या युजर्सला ही सुविधा दिला जाणार आहे . त्याठिकाणाहून फेसबुक https या http पेक्षा अधिक सुरक्षित कनेक्शनवर काम करणार आहे . त्यामुळे फेसबुकच्या वेब अॅड्रेसच्या अगदी सुरुवातीला http ऐवजी https दिसणार आहे . यातील s म्हणजे सिक्युअर . प्रामुख्याने बँकींग , ऑनलाइन शॉपिंग कंपन्या क्रेडीट कार्ड किंवा पासवर्डची माहिती मागताना अशाप्रकारच्या कनेक्शनचा वापर करतात . 

फेसबुकच्या सर्व १ अब्जाहून अधिक युजर्ससाठी हेच कनेक्शन वापरले जाणार आहे . जानेवारी २०११ मध्ये फेसबुकने या स्थलांतरणाची सुरुवात केली . आतापर्यंत काही ठिकाणी ही सुविधा पर्यायी उपलब्ध होती .भारतातही इंटरनेट एक्सप्लोअरर सारख्या ब्राऊझरवर http तर मोझिलावर https कनेक्शन उपलब्ध होते . मात्र लवकरच सर्वांना ती बंधनकारक केली जाणार आहे . त्यामुळे अधिक सुरक्षित होण्याबरोबरच फेसबुक सुरक्षितहोणार आहे . वेग कमी होण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी फेसबुककडून प्रयत्न केले जात असले तरी https वर ट्रान्सफर होण्यासाठीची प्रक्रिया थांबवणार नसल्याचे फेसबुकचे फ्रेडरीक वूलन्स यांनी स्पष्ट केले आहे . 

या बदलाचा एक फायदा म्हणजे फेसबुक अकाऊंट अधिक सुरक्षित तर होईलच सोबत हॅकर्सपासूनही त्यांचे संरक्षण होईल . कारण https मध्ये सर्व डेटा एनक्रिप्टेड फॉर्ममध्ये असणार आहे . त्यामुळे वायफाय कनेक्शन वापरताना किंवा फेसबुक लॉग आऊट न करता कम्प्युटर बंद केल्यावरही अकाऊंटची सुरक्षा कायम राहणार आहे . या स्थलांतरणाचा आणखी एक फायदा म्हणजे ओळख नसलेल्या व्यक्तींनाही आता फेसबुक गेम खेळण्यासाठी आमंत्रित करता येईल . त्यामुळे फेसबुकच्या गेमिंगचा महसूल वाढणार आहे . 

जानेवारी २०१० मध्ये जीमेलने सर्व युजर्सला https वर स्थलांतरित केले होते . पुढे जुलै २०१० मध्ये वेब ब्राऊझिंगच्या स्पीडमध्ये कुठलाही फरक पडला नसल्याचे जीमेलने म्हटले होते . हॉटमेल आणि ट्विटरवरही पूर्वीपासून https कनेक्शन वापरले जात आहे . 
ADVERTISEMENT
Tags: FacebookSecurity
ShareTweetSend
Previous Post

एसएमएस होणार इतिहासजमा

Next Post

तुलना करा, निवडा

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ट्विटर हॅक : बराक ओबामा, बिल गेट्ससारख्या प्रसिद्ध व्यक्तींची अकाऊंट्स हॅक!

२० कोटी ट्विटर यूजर्सचा डेटा हॅक : डेटा हॅकर्सकडून प्रकाशित!

January 6, 2023
CCH ॲपद्वारे अनेकांची दामदुपटीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक!

CCH ॲपद्वारे अनेकांची दामदुपटीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक!

October 13, 2022
Instagram 90 Second Reel Stickers

इंस्टाग्रामवर आता ९० सेकंदांच्या रील्स बनवता येणार : सोबत अनेक नव्या सोयी!

June 3, 2022
Faceeook Reels Earn Money

Reels आता फेसबुकवरही उपलब्ध : पैसेसुद्धा कमावता येणार!

February 23, 2022
Next Post

तुलना करा, निवडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

March 29, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023
भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

March 27, 2023
इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

March 25, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

March 29, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!