इंटरनेटवरुन रेल्वे रिझर्व्हेशन करणा-यांसाठी मायक्रोसॉफ्टने आणले एक खास अॅप…
रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. रेल्वे आरक्षण सहज होण्याच्या दृष्टीने प्रवाशांना एक नवी सुविधा मिळणार आहे. मोबाईलवरुन तिकीट बूक ...
रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. रेल्वे आरक्षण सहज होण्याच्या दृष्टीने प्रवाशांना एक नवी सुविधा मिळणार आहे. मोबाईलवरुन तिकीट बूक ...
मायक्रोसॉफ्टकडून ' नोकिया ' ची खरेदी सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अग्रणी असलेल्या ' मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ' ने मंगळवारी मोबाइलहँडसेट निर्मितीतील एकेकाळच्या अव्वल ' नोकिया ' ला सुमारे ४७ हजार कोटी रुपयांना ( ७ . ७ अब्ज डॉलरकिंवा ५ . ४४ अब्ज युरो ) खरेदी करीत असल्याची घोषणा केली . या व्यवहारामुळे ' मायक्रोसॉफ्ट ' ला ' नोकिया ' च्या जवळपास सर्वच पेटंटवर दावा सांगता येणार असून ,जगभरातील ३२ हजार कर्मचाऱ्यांची फौज दिमतीला मिळणार आहे . शिवाय ' मायक्रोसॉफ्ट ' ला आगामी दहावर्षांपर्यंत ' नोकिया ' हे ब्रँडनेम वापरण्याचा परवानाही मिळाला आहे . नव्या व्यवस्थापनामुळे ' नोकिया ' चाबाजारहिस्सा वाढल्यास ते कायम ठेवण्याचा अथवा भविष्यात ' मायक्रोसॉफ्ट स्मार्टफोन्स ' या नावाने हँडसेटबाजारात उतरविण्याचा हक्क मात्र बिल गेट्स यांच्या मालकीच्या कंपनीने राखून ठेवला आहे . या व्यवहारामुळे स्मार्टफोन उद्योगात प्रचंड खळबळ माजली नसली तरी बाजारातील आघाडीच्या ' अॅपल ' च्या 'आयओएस ' आणि ' गुगल ' च्या ' अँड्रॉइड ' या ' ऑपरेटिंग सिस्टीम ' ना टक्कर देण्यासाठी ' मायक्रोसॉफ्ट ' ने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे . स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी ' नोकिया ' ने ' विंडोज ' या ऑपरेटिंग सिस्टीमचा आधार घेतला खरा ; पण हे प्रयत्न तोकडे पडले .
तंत्रज्ञानाचे जाळे जसजसे वाढत जाईल , तसे कम्प्युटर , लॅपटॉप , टॅब्लेट , स्मार्टफोन हे सगळे एकाच माळेतले वेगवेगळ्या आकारातील मणी वाटतील, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही . टीव्ही ,कम्प्युटर , इंटरनेट या तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीमधील पायऱ्याच आहेत . स्मार्टफोनवर इंटरनेट पाहता येईल, सर्च करता येईल , असे कुणालाही वाटले नव्हते ; पण तसे झाले . आता आणखी एक वरची पायरी या क्षेत्रात येऊ घातलीय . ती म्हणजे ' अॅपल ' च्या आयफोनवर मायक्रोसॉफ्ट ऑफिसची सॉफ्टवेअर वापरता येणार आहेत . वर्ड , एक्सेल , पॉवरपॉइंट आयफोनवरही वापरता येणार आहे . वेगवेगळी सॉफ्टवेअर स्मार्टफोनवर वापरता येतील , याकडेच तंत्रज्ञानाची वाटचाल सुरू आहे . आयफोनवरील सॉफ्टवेअरच्या वापरासाठी कंपनी कुठलेही नवे व्हर्जन तयार करणार नाही ; तसेच अॅन्ड्रॉइड व्हर्जनसाठी वेगळी ' अॅप ' बनवणार नाही . ' मायक्रोसॉफ्ट ' ची विंडोज सिस्टीम असणाऱ्या टॅब्लेट कम्प्युटरवर ही सॉफ्टवेअर्स वापरता येणार आहेत . मोबाइलसाठी बनवण्यात आलेला ' ऑफिसमोबाइल ' चा सूट अॅपलच्या ' अॅप ' स्टोअरमध्ये ' फ्री ' उपलब्ध आहे ; मात्र त्यासाठी दर वर्षाला 'ऑफिस ३६५ ' विकत घ्यावे लागणार आहे . ' ऑफिस ३६५ ' असेल , तर मॅक असलेल्या कम्प्युटरवर आणि विंडोज कम्प्युटरवर ते वापरता येईल . ' ऑफिस ' चे पॅकेज असेल , तर वेगवेगळ्या कम्प्युटरवर ते चालवता येईल ; तसेच त्याचे अपडेटही मिळतील . कम्प्युटरवरच्या फाइल आयफोनवर ओपन करता येतील . केवळ ' हेवी वर्क ' त्यामध्ये करता येणार नाही . मोठे ग्राफिक , एखादा मोठा प्रबंध आणि त्याचे पूर्ण डिझाइन करायचे असेल , तर कम्प्युटरशिवाय पर्याय नाही ; मात्र छोट्या कामांसाठी ' आयफोन ' वापरता येईल . मेल करणे ,फाइलमध्ये छोटासा बदल करणे , काही शब्द वाढवणे , काढणे , प्रेझेंटेशन सादर करण्यासारख्या गोष्टी आयफोनवरील ' ऑफिस सॉफ्टवेअर ' मध्ये करता येतील . कम्प्युटरवरील फाइल आयफोनवर ऑटोमेटिक रिसाइज होतील . आयफोन अॅपमुळे कम्प्युटरवर तयार करण्यात आलेले चार्ट ,अॅनिमेशन आणि इतर माहितीमध्ये काहीही बदल होणार नाही . अमेरिका सोडून इतर देशांत लवकरच हे प्रॉडक्ट उपलब्ध होणार आहे . एकंदरीतच कम्प्युटरचा आकार स्मार्टफोनपर्यंत लहान होत चाललाय , असे म्हटले , तर ते चुकीचेठरणार नाही . कम्प्युटरवरील सगळी अॅप्लिकेशन आता हळूहळू स्मार्टफोनवरही करता येत आहेत .इंटरनेट , ऑफिस सॉफ्टवेअर , गाणी ऐकणे , व्हिडिओ यांसारख्या फॅसिलिटी स्मार्टफोनवरही आहेत .फरक आहे , तो केवळ काम करण्याच्या क्षमतेचा . हा फरकही आगामी काळात पुसट होत जाऊन 'युनिव्हर्सल पॅकेज ' असलेले एकच डिव्हाइस बाजारात येईल , अशी कल्पना करायला तूर्तास तरी हरकत नाही !
आजकाल नवा डेस्कटॉप पीसी किंवा नोटबुक घेतल्यावर 'विंडोज ८' ही ऑपरेटिंग सिस्टिम त्यावर आधीच लोड असते. 'विंडोज सेव्हन', 'व्हिस्टा', 'एक्स्पी' ...
विंडोजच्या वेगवेगळ्या व्हर्जन्सशी सगळेच परिचित आहेत .बहुतेक सगळेच जण ' विंडोज ' ची ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात . ' विंडोज व्हिस्टा ', ' विंडोज ७ ', ' विंडोज ८ 'नंतर आता ' विंडोज ब्लू ' किंवा ' विंडोज ८ . १ ' येऊ घातलेआहे . विंडोजच्या आधीच्या व्हर्जनमध्ये असलेल्या उणीवा दूर करून नवीन व्हर्जन अधिक आकर्षक आणि यूझर फ्रेंडली करण्याची ' मायक्रोसॉफ्ट ' ची हातोटी आहे . पण , ' विंडोज८ ' च्या बाबतीत ही ' हातोटी ' तितकीशी यशस्वी झाली नाही . टच स्क्रीनची सुविधा नसलेल्या कम्प्युटरवर ही सिस्टीम तितकी समर्थपणे ऑपरेट झाली नाही आणि थेट डेस्कटॉपला बूट न होणे या बाबी अनेकांना पटल्या नाहीत . त्यामुळे किमान या दोन बाबींचे समाधान ' विंडोज 'ने द्यावे , अशी मागणी यूझरकडून बराच काळ होत होती . ग्राहकांचा हा तक्रारींचा सूर ' मायक्रोसॉफ्ट ' पर्यंत पोहोचला असावा . येऊ घातलेल्या ' विंडोज ब्लू ' मध्ये ' स्टार्टबटन ' पुन्हा दिसणार असल्याची चर्चा कम्प्युटर जगतात आहे . थेट डेस्कटॉपलाही बूट करता येणार आहे . या नव्या व्हर्जनमध्ये हे बदल होण्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे . खात्रीशीर वृत्त मात्र नाही . त्यामुळे हे नक्की काय गौडबंगाल आहे , हे जाणून घेण्याचे कुतूहल ग्राहकांमध्ये आहे . मात्र , असा बदल झाला , तर तो ग्राहकांसाठी इष्टच आहे . असे झाले , तर कंपनीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असे होईल , की मायक्रोसॉफ्ट ' बॅक फूट' वर गेली आहे आणि पुन्हा एकदा यूझरच्या मागणीला अनुसरून आपल्या सिस्टीममध्ये ती पूर्वीप्रमाणे बदल करेल. नव्या व्हर्जनमध्ये पहिल्यांदा हे बदल प्रस्तावित नव्हते . पण , ते होण्याची दाट शक्यता आहे . वेगवेगळ्या माध्यमांतून गेल्या आठवड्यांपासून ही वृत्ते येत आहेत . ' मेट्रो स्टाइल ' मध्ये होणाऱ्या बूटिंगला फाटा देऊन थेट डेस्कटॉप बूटिंग यूझरना करता येईल , अशी सुविधा पुरवण्याकडे मायक्रोसॉफ्टची वाटचाल सुरू आहे . ' विंडोज 'वर ' स्टार्ट बटन ' ही पुन्हा येण्याची शक्यता असल्याचे विविध सूत्रांनी सांगितले आहे . ' विंडोज ब्लू ' चे उत्पादन या वर्षी कदाचित सुरुवात होईल . त्यावेळी हे दोन्ही बदल होतील , की नाही हे सर्वांना कळेलच . तत्पूर्वी काही अधिकृत घोषणा झाली , तर ग्राहकांसाठी उत्तमच ! ' विंडोज ८ ' चा यूझर इंटरफेस हा चांगला आहे . मात्र , टच स्क्रीन नाही , त्यांच्यासाठी ' विंडोज ' चे जुनेच व्हर्जन चांगले , असे सध्या म्हणावे लागत आहे . बरेचसे यूझर त्यामुळे जुन्याच व्हर्जन्सना पसंती देत आहेत . ' विंडोज ब्लू ' मधील नव्या बदलाने हा त्रास टळून विंडोज अधिक यूझर फ्रेंडली सिस्टीमचा वापर सर्वांना करता येईल , याची आशा बाळगूया .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech