Tag: SuperComputer

‘परम युवा २’वर प्रगत देशांचे ‘क्लिक’!

आशिया-आफ्रिकेसह विकसनशील देशांच्या कम्प्युटिंग क्षमतेला चालना देणारा 'परम युवा २' हा सुपरकम्प्युटर आता अमेरिका, इंग्लंड-फ्रान्ससह प्रगत देशांमधील संशोधनप्रकल्पांमध्येही 'एंट्री' करीत ...

सुपरकंप्युटर परम युवा २ : भारताचा सर्वात वेगवान

पुण्याच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कंप्युटिंग (C-DAC)_या विभागाने परम युवा २ हा सुपरकंप्युटर तयार केला आहे.  जगातल्या वेगवान कंप्युटरमध्ये ...

चिनी ड्रॅग्रनला भारत देणार ‘सुपर’ झटका

 ' सुपर - सुपरकॉम्प्युटर ' च्या निर्मितीसाठी भारत , चीन , जपान , अमेरिका यांच्यात सुपरकॉम्पिटीशन सुरु झाली आहे . येत्या आठ वर्षात सुपर - सुपर कॉम्प्युटर तयार होईल . निर्मितीत भारत सगळ्यांवर मात करेल . अगदी चीनवर सुध्दा , असा विश्वास सुपर कॉम्पुटरचे जनक डॉ . विजय भटकर यांनी व्यक्त केला आहे .  गेल्या शतकात मानवी जीवनात तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणला तो संगणकानेच . पाश्चात्यांकडून आपण ते तंत्रज्ञान आयात केलं . त्यानंतर झालेले महत्त्वाचे संशोधन म्हणजे महासंगणक ( सुपर कम्प्यूटर ). पाश्चात्यांनी हे तंत्रज्ञान आपल्याला देण्याचे नाकारले . भारताचे प्रसिध्द वैज्ञानिक डॉ . विजय भटकर यांनी हे आव्हान स्विकारले आणि भारतानेच महासंगणक तयार केला. भारताच्या याच सुपुत्राने आता महा - महासंगणक तयार करण्याचा ध्यास घेतलेला आहे .  आजचा सुपर कम्प्यूटर म्हणजे उद्याचा लॅपटॉप  ' तंत्रज्ञानामुळे आज जग झपाट्याने बदलते आहे . प्रत्येक क्षणी एक नवे तंत्रज्ञान जन्माला येत आहे . आजचा सुपरकम्प्यूटर हा उद्याचा लॅपटॉप झालेला असेल . त्यामुळे बदलत्या काळासोबत अपडेट राहणे आवश्यक आहे . हे जरीखरे असले तरीसुध्दा इतरांच्या एक पाऊल पुढे जाण्याचाही विचार करणे अत्यंत गरजेचे आहे . याच गरजेतून२००८ साली महा - महासंगणकाची संकल्पना पुढे आली . २०१० साली याबाबत शासनापुढे प्रस्ताव मांडण्यातआला . हा प्रस्ताव मान्य करीत त्यासाठी ११ हजार कोटीं रूपयांचा निधी देण्याचे शासनाने कबूल केले आहे .बाराव्या पंचवार्षिक योजनेत शासनाने त्यासाठी ५ हजार कोटींचा निधी मान्य केला ,' अशी माहिती डॉ . भटकरयांनी मटाशी बोलताना दिली .  अडचणच असते ' इनोव्हेशनची ' जननी  ' एक अब्ज अब्ज प्रक्रिया ( एक ' एक्झा ') एका सेकंदात करण्याइतकी गती या संगणकाची असेल . परिणामतःत्यासाठी ' ५ हजार मेगा वॅट ' इतकी उर्जा लागणे अपेक्षित आहे . मात्र उर्जेचा तुटवडा असताना एवढी वीज केवळएका प्रकल्पासाठी देणे भारताला अशक्य आहे . त्यामुळे २० मेगा वॅट विजेच्या सहाय्याने हे काम कसे करता येईलयासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत . एखादे मोठे ध्येय साध्य करताना अनेक अडचणी येतात . मात्र याच अडचणी 'इनोव्हेशन्स ' ला जन्म देतात आणि त्यातूनच ध्येय साध्य होते ' असे त्यांनी सांगितले .  एका चिपवर हजारो प्रोसेसर  कमी उर्जेत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एका चिपवर हजारो प्रोसेसर्स लावण्यात येतील . त्यांना ' नेटवर्किंग ' च्यासाहाय्याने कनेक्ट करण्यात येईल , असे त्यांनी सांगितले .  २०२० ला साकारणार महा - महासंगणक  हा प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ आमच्या पुढे आहे . या प्रकल्पात आपण ' मेंटॉर ' म्हणून कार्यरतअसल्याचे डॉ . भटकर यांनी सांगितले .  सामान्य माणूसही वापरेल महा - महासंगणक  हा संगणक तयार झाल्यानंतर ' नॅशनल नॉलेज नेटवर्क ' अंतर्गत देशातील सर्व विद्यापीठांना हा जोडण्यात येईल .त्यामुळे अगदी शेतात बसलेल्या शेतकऱ्यालासुध्दा आपल्या ' ४ जी ' सुविधेद्वारे या संगणकाशी कनेक्ट होता येईल. अर्थातच त्याच्या वापरासाठी काही नियमसुध्दा घालून दिल्या जातील . या संकल्पनेवर आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले . 

ADVERTISEMENT
error: Content is protected!