MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home सॉफ्टवेअर्स

नवीन अॅक्रोबॅट आणखी सुलभ : मॅक आणि विंडोजसाठी अॅक्रोबॅट ११ बाजारात

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 21, 2012
in सॉफ्टवेअर्स

पीडीएफ फाइल्सने कम्प्युटरधारी समाजाचे सर्व आयुष्यव्यापले आहे . फॉन्ट , वर्ड , एक्सेल , पॉवरपॉइंट , फोटोशॉपअसे कुठलेही सॉफ्टवेअर नसले तरी त्यातून तयार केलेल्या पीडीएफ फाइल्स जशाच्या तशा अॅक्रोबॅट रिडरमध्येदिसू शकतात . त्यामुळेच अॅडोबची सॉफ्टवेअर सर्वत्र लोकप्रिय असून त्यात सातत्याने नवनवीन एडिशन्स येतअसतात . आता अॅडोबने मॅक आणि विंडोजसाठी अॅक्रोबॅट ११ बाजारात आणले आहे . मोबाइल आणि टॅबलेटयुझर्स ध्यानात ठेवून यात विविध सुविधा देण्यात आल्या आहेत . नवे अॅक्रोबॅट एमएस ऑफिससोबत अधिक संलग्नकरण्यात आले असून यातून फोटो रिसाइज आणि रोटेट करता येतात , टेबल्स , फॉर्म्स एडिट करता येतात तसेचडॉक्युमेंट एडिटही करता येतात . 


इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर 


सध्या अनेक कागदपत्रांवर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर केल्या जातात . ही प्रक्रीया नव्या अॅक्रोबॅटमध्ये आणखी सुलभकरण्यात आली आहे . इकोसाइन या उपकंपनीच्या सहकार्याने कंपनीने विंडोज ८ टॅबलेटधारकांना ही सुविधा दिलीआहे . त्यामुळे सहीच्या ठिकाणी नाव टाइप करणे किंवा आयपॅडवर बोटाच्या सहाय्याने सही करण्याच्या पलीकडेअनेक सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत . त्यामुळेच येत्या काही वर्षात ऑनलाइन सही केलेल्या कंत्राटांचे प्रमाण १टक्क्यावरून ५० टक्क्यांपर्यंत वाढेल असे कंपनीला वाटते . 


फॉर्म वापरण्यात सुलभता 


एका संशोधनानुसार कर्मचाऱ्यांचे आठवड्यातील ११ तास कागदी अर्ज शोधण्यात आणि विविध फॉरमॅटमधीलडॉक्युमेंट उघडण्यात व फाइल्सचे लोकेशन्स शोधण्यात वाया जातात . या समस्येवर अॅक्रोबॅटने अॅडोब फॉर्म्ससेंट्रलच्या माध्यमातून तोडगा काढला आहे . यामध्ये कुठल्याही प्रकारचा डेटा तुमच्या टॅबवर , पीसीवर अॅटोमॅटीकउपलब्ध होणार असून त्यासाठी कुठल्याही प्रकारचे कन्वर्जन करण्याची गरज पडणार नाही आणि थेट टेबल्स आणितक्त्यांच्या स्वरूपात ही माहिती उपलब्ध होईल . अॅक्रोबॅट रीडरच्या मोबाइलसाठी उपलब्ध असलेल्या मोफतएडिशनमध्ये पीडीएफ फॉर्म भरता येणार असून अॅक्रोबॅट . कॉमवर ते सेव्ह करता येणार आहेत . 


कागदपत्रांची सुरक्षा 


जगभरातील किमान २५ टक्के कंपन्यांना माहितीच्या सुरक्षेची समस्या जाणवते . त्यांच्यासाठी नव्या अॅक्रोबॅटमध्येपीडीएफ फाइल्सचा अॅक्सेस मर्यादित करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे . नव्या रिस्ट्रीक्टएडिटींग पर्यायात फाइल्ससाठी पासवर्ड देण्यात आला असून त्याआधारे डेटा इन्क्रिप्शन आणि छुपी माहिती काढूनटाकणे यासारखे पर्याय उपलब्ध आहेत . आयटी कंपन्यांसाठी यामध्ये अतिरिक्त पर्याय देण्यात आले असून एकापेक्षाअधिक पीसीवर अॅक्रोबॅट फाइल्स एडिट करणे , अॅपलच्या रिमोट डेस्कटॉप टूलचा सपोर्ट यासाररख्या गोष्टी यातदेण्यात आल्या आहेत .

ADVERTISEMENT
Tags: AcrobatAdobeElectronicFile SecurityFormspdfReaderSignature
ShareTweetSend
Previous Post

जगातील पहिला हायडेफिनेशन स्‍मार्टफोन लॉंन्‍च

Next Post

जस्ट गो फॉर ‘गोप्रो एचडी हिरो २’

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

May 29, 2023
Figma Adobe

अडोबी Figma कंपनी विकत घेणार : ~१,६०,००० कोटी रुपयांचं अधिग्रहण!

September 15, 2022
Adobe Creative Cloud Express

अडोबीचं ग्राफिक्स डिझाईनसाठी सोपं फ्री ॲप : Creative Cloud Express

December 18, 2021
Adobe Photoshop Web

अडोबी फॉटोशॉप आता वेबसाइटद्वारे ब्राऊजरमध्येच वापरा!

October 27, 2021
Next Post
जस्ट गो फॉर ‘गोप्रो एचडी हिरो २’

जस्ट गो फॉर ‘गोप्रो एचडी हिरो २’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech