MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

सोबत अॅप्सची

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 24, 2013
in ॲप्स
आपण कुठेही बाहेर पडलो की , सोबत आपला स्मार्टफोन हा असतोच. या फोनमध्ये ढिगाने अॅप्स असतात. पण आपण कुठे अडचणीत सापडलो , तर हीसर्व अॅप्स आपल्याला उपयोगी पडतात का , असा प्रश्न जर विचारला तर अनेकांचे उत्तर नाही असेच येईल. आपल्या फोनमध्ये अशी काही अॅप्स जरूर असावीत , जी आपल्याला खरोखरीच उपयोगी पडतील. अशाच काही अॅप्सविषयी… 


मुंबई एसओएस 
आपल्याला अचानक अॅम्ब्युलस , पोलिस अशा कोणत्याही गोष्टीची गरज पडली की , आपण फोन नंबर शोधण्यात वेळ घालवत असतो. पण यापुढे असेकरण्याची गरज भासणार नाही. कारण जर तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये हे अॅप डाऊनलोड केलेले असेल, तर एका क्लिकवर तुम्ही असलेल्या ठिकाणच्या जवळच्या ठिकाणी फोन करता येऊ शकतो. यामध्ये तुम्हाला पोलिस स्टेशन्स , अग्निशमन दल ,अॅम्ब्युलन्स , रेल्वे , वृत्तपत्रांची कार्यलये आणि काही स्वयंसेवी संस्था यांचे नंबर्स देण्यात आले आहेत. मुंबईत राहणाऱ्या तसेच मुंबईत प्रवास करणाऱ्या मंडळींसाठी हे अॅप खूप उपयुक्त आहे. 

झोमाटो 
एखाद्या संध्याकाळी आपल्याला बाहेर जेवायला जायची हुक्की आली आणि नेहमीच्या हॉटेल्सपेक्षा काहीतरी वेगळे ट्राय करायची आपली इच्छा असेल तर आपल्याला हे अॅप आपल्याला चांगलेच मदत करू शकते. यात आपल्याला आपल्या परिसरातील हॉटेल्स , त्यांची मेन्यू कार्ड त्या हॉटेलचा रीव्ह्यू ,तेथे मिळणारे फेमस पदार्थ या सर्व गोष्टींची माहिती मिळते. या हॉटेलमध्ये येऊन गेलेल्याल्यांच्या प्रतिक्रियाही यामध्ये आपल्याला वाचावयास मिळू शकतात. 

स्मार्ट शेअर मुंबई ट्रेन्स 
हे अॅप्लिकेशन तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणापासून जवळचे रेल्वे स्टेशन दाखवते. त्या स्टेशनवरून अप आणि डाऊन दोन्ही दिशेच्या लोकल ट्रेन्सविषयी माहिती मिळते. त्या लोकलचे सुरुवातीचे तसेच शेवटचे स्टेशन आदी सर्व माहिती आपल्याला या अॅपच्या माध्यमातून मिळू शकते. हे अॅप सातत्याने अपडेट होत असते. नुकत्याच नव्याने सुरू झालेल्या डहाणू लोकल्सचे सविस्तर वेळापत्रकही या अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

स्मार्ट मुंबई पब्लिक ट्रान्सपोर्ट 
मुंबई म्हंटले की , बेस्ट बसचा वापर हा आलाच. या अॅपमध्ये लोकल ट्रेन्ससोबतच बेस्टच्या बसेसचीही माहिती मिळते. कोणत्या क्रमांकाच्या बसने कुठपर्यंत जाता येते , वाटेत किती स्टॉप्स येतात , या सर्वांची माहिती या अॅपमध्ये आपल्याला मिळते. याशिवाय या अॅपमध्ये रिक्षा , टॅक्स ,एसी टॅक्सी यांचे दरपत्रकही उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

एअरलाइन फ्लाइट स्टेटस ट्रॅकिंग 
तुम्ही देशात वा परदेशात विमानाने प्रवास करणार असाल , तर तुम्हाला हे अॅप नक्कीच कामी येईल. या अॅपमध्ये विमानाचा नंबर टाकला की , ते विमान कुठे आहे , त्याचे स्टेट्स काय आहे या सर्वाची माहिती मिळते. यामुळे विमान लेट असेल , तर विमानतळावर जाऊन त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. 

एम-इंडिकेटर 
सर्वात लोकप्रिय आणि अगदी साध्यातल्या सध्या मोबाइलपासून ते अत्याधुनिक स्मार्टफोनपर्यंत प्रत्येक फोनमध्ये वापरता येणारे हे अॅप आहे. बहुतेक जण ट्रेन्सचे टाइमटेबल पाहण्यासाठी या अॅपचा वापर करतात. मात्र यामध्ये रिक्षा टॅक्सी यांचे दरपत्रकही आहे. याचबरोबर कोणत्या नाट्यगृहात/ सिनेमागृहात कोणते नाटक / सिनेमा आहे , अशी सर्व माहितीही यात उपलब्ध आहे. 

मोबाइल ट्रॅकर 
मोबाइलसारखी हरकामी वस्तू हरवली की , हळहळ वाटते. पण जर तुमच्या मोबाइलमध्ये ‘ मोबाइल ट्रॅकर ‘ असेल तर मोबाइल परत मिळणे अधिक सोपे जाईल. हे अॅप वापरताना आपल्याला आपल्या ओळखीच्या किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा नंबर सेव्ह करून ठेवावा लागतो. समजा आपला मोबाइल चोरीला गेला , तर चोरट्याने त्या मोबाइलमध्ये सिम कार्ड घातले की , लगेचच आपल्याला त्या मोबाइलवरून एसएमएस येतो. ज्या आधारे आपण त्या मोबाइलचे लोकेशन शोधू शकतो. तोएसएमएस तुमच्याच मोबाइलवरून आला आहे हे ओळखण्यासाठी त्यात तुमचा ‘ आयएमइआय ‘ नंबर येतो. चोरी करणाऱ्या व्यक्तीला हे अॅप डिलीट करणे शक्यच नसते. कारण डिलीड करण्यासाठी त्याला पासवर्डची गरज भासते. 

पीआरएफ 
रिक्षा किंवा टॅक्सीमधून उतरल्यावर अनेकदा भाड्यावरून वादावादी होते. त्याचे मीटर फास्ट असल्याचे आपण म्हणतो , तर तो ‘ इतनाही होता है ‘ असे म्हणत आपले म्हणणे झुगारून लावतो. या वादावादीतून मार्ग काढण्यासाठी किरण आंबर्डेकर यांनी त्यांचे मित्र मयांक शाह आणि रवी यांच्या मदतीने एक ‘ पे राइट फेअर ‘ ( पीआरएफ) नावाचे अॅप विकसित केले आहे. हे अॅप इतर अॅप्सपेक्षा थोडे वेगळे आणि अत्याधुनिक आहे. हे अॅप वापरताना आपल्या फोनमधील जीपीएस सुरू होते. ते सुरू होण्यासाठी आवश्यक त्या तीन उपग्रहांशी आपल्या मोबाइल कनेक्ट झाला की , आपले अॅप काम करण्यास सुरुवात करते. 
आपण रिक्षात अथवा टॅक्सीमध्ये बसण्यापूर्वी हे अॅप सुरू करून ठेवायचे आणि रिक्षा किंवा टॅक्सी सुरू झाली की , स्टार्ट क्लिक करायचे. मग रिक्षाच्या मीटरप्रमाणे आपल्या मोबाइलमधील 
हे मीटरही काम करण्यास सुरुवात करते. आपल्याला यामध्ये रिक्षाचा स्पीड, पार केलेले अंतर तसेच वेटिंग टाइम इत्यादी माहितीही समजते. हे अॅप जीपीएसशी जोडले गेल्याने ते अधिक प्रभावीपणे काम करते. हे अॅप तयार करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला.सुरुवातीला रिक्षामीटरच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करून मीटर कशाप्रकारे चालते , रिक्षा थांबते तेव्हा किती वेळांनी मीटर पडते , 
या सर्व गोष्टी लक्षात घेण्यात आल्या. 
त्याचप्रमाणे टॅक्सीचाही अभ्यास करण्यात आला. यानंतर तयार झालेल्या या अॅपच्या विविध चाचण्या करण्यात आल्या आणि मग ते अप अँड्रॉइड मार्केटमध्ये उपलब्ध करून देण्यात आले , असे अॅपचे निर्माते किरण सांगतात. यामध्ये केवळ मुंबईच नाही 
तर नवी मुंबई , कोलकाता , दिल्ली , अहमदाबाद , गुरगाव , पुणे , ठाणे या शहरांमधील रिक्षा , टॅक्सी , कुल कॅब यांचे दरही कळू शकतात. केवळ दरपत्रक देण्यापेक्षा जीपीएसच्या मदतीने आशा प्रकारचे लाइव्ह अॅप देणे आम्ही पसंत केले , असे किरण सांगतात. हे अॅप लवकरच इतर मोबाइल ओएसवर वापरता येऊ शकेल , असेही ते म्हणाले. 

ADVERTISEMENT
Tags: AirplanesAppsInnovationRailSmartphonesTimetableTrackerTrainsTransportZomato
ShareTweetSend
Previous Post

गुगलचा नेक्सस फोर आला भारतात

Next Post

किराणामाल खरेदी करा ‘ऑनलाइन’

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
Next Post

किराणामाल खरेदी करा ‘ऑनलाइन’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech