MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Wearables

गुगल ग्‍लासची काही वैशिष्‍टये

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 2, 2013
in Wearables
गुगल ग्‍लासबद्दल लोकांमध्‍ये बरीच उत्‍सुकता दिसत आहे. या चष्‍म्‍याची काही वैशिष्‍टये जाणून घेऊया…


1 एचडी स्क्रीनचा आभास : प्रोजेक्ट ग्लासचा पहिला व्हिडिओ अतिशय प्रभावी होता. तो जवळून पाहिल्यावर त्यातील बारकावे कळतात. हा चष्मा घातल्यानंतर 640 बाय 360 रिझोल्यूशनचा डिस्प्ले मिळतो. त्यामुळे आपल्याला आठ फूट लांबून 25 इंची एचडी स्क्रीन पाहिल्यासारखे वाटते.


2 वाय-फाय, जीपीएस फीचर : गुगल ग्लासमध्ये वाय-फाय आणि जीपीएस फीचर असल्याने यास स्मार्टफोन एक्सटेन्शन म्हणता येईल. मात्र यात सिम कार्डसाठी स्लॉट नाही. चष्मा फोनसोबत सिंक केल्यानंतर फोनमधील विविध डाटाचा उपयोग करता येतो.


3 आवाजाने नियंत्रण : हा चष्मा मानवी आवाजानेही नियंत्रित होतो. चष्म्याचे हे फीचर अँक्टिव्हेट करण्यासाठी फ्रेमच्या साइडवर थोपटावे लागते किंवा डोक्यावर चष्मा खालीवर करावा लागतो. या इशार्‍यांना चष्मा प्रतिसाद देऊ लागतो तेव्हा ‘ओके ग्लास’ असा संदेश मिळतो आणि गुगलवर सर्च, डायरेक्शन, फोटो काढणे किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी कमांड देता येतात. U


4 आपण पाहाल तेच पाहील चष्मा : जे काही दृश्य आपण पाहाल तेच हा चष्मा पाहू शकेल. याद्वारे 720 पी व्हिडिओ आणि 5 एमपी फोटो काढता येतील. याच्या इंटर्नल मेमरीत 12 जीबी डाटा स्टोअर करता येईल. हँगआउटने फोटो किंवा व्हिडिओ ब्रॉडकास्ट करता येईल.


5 समजेल अनेक भाषा, कूल लूक : गुगल ग्लास फोन किंवा ब्राउझरमध्ये उपलब्ध असलेल्या परदेशी भाषांतून भाषांतर करू शकतो. तो आपल्याला शब्दांचे उच्चारण करून ऐकवेल. त्यातून शब्द समजणे सोपे होईल. हाय-फाय गुगल ग्लासचे फ्रेमलेस शेड्समध्ये रूपांतर करता येते. त्यामुळे कूल लूक मिळेल. यातील इलेक्ट्रॉनिक्स सर्किट काढून ठेवता येते.


6 बातम्यांच्या हेडलाइन चष्म्यावर : ई-मेल, मॅप्स आणि व्हिडिओ स्किल्सप्रमाणे गुगलवर अँप्स चालतील. उदाहरणार्थ न्यूयॉर्क टाइम्स अँपने त्या दिवशीच्या ताज्या बातम्यांच्या सर्व हेडलाइन डोळ्यांपुढून सरकतील. फ्रेमवर थोपटल्यास हा चष्मा त्यातील बातमी वाचूनही दाखवेल.


7 डोक्याचा वापर : बोन कंडक्शन ट्रान्सड्यूसरद्वारे गुगल ग्लास ऑडिओ आउटपुट देईल. त्याचा अर्थ असा की, संगीत ऐकण्यासाठी आणि इतर कामे करण्यासाठी हार्डवेअरबरोबरच आपला मेंदूही सहभागी असेल. काही वर्षांपूर्वी असे तंत्रज्ञान असलेले हेडफोन पॅनासॉनिक आणि शॉक्स या कंपन्यांनी तयार केले होते.


Related Keywords ;
Google Glass
new technology
smartglass
google products

ADVERTISEMENT
Tags: GoogleGoogle GlassInnovation
ShareTweetSend
Previous Post

स्मार्ट गुगली मॅप्स प्ले स्टोर हँगआउट्स गुगल+ गेमिंग

Next Post

महिन्याला 1 अब्ज भेट देणा-या युझर्संचा ‘युट्यूब’ झाला आठ वर्षांचा

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Google Willow Quantum Chip

गूगलची Willow Quantum चिप : क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये नवा अध्याय!

December 22, 2024
Next Post

महिन्याला 1 अब्ज भेट देणा-या युझर्संचा 'युट्यूब' झाला आठ वर्षांचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech