MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

अतुल चिटणीस : ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे प्रणेते

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 10, 2013
in News
ADVERTISEMENT

Atul Chitnis       तंत्रज्ञानामुळे पारदर्शक कारभाराची गुरूकिल्ली हाती येते ;तरी कित्येकदा तंत्रज्ञानही मक्तेदारीमध्ये जखडून ठेवण्याची खेळी प्रस्थापितांकडून केली जाते. या जोखडातून कम्प्युटर तंत्रज्ञानाची सुटका करून ते सर्वांना उपलब्ध व्हावे , याचा पाठपुरावा करण्यात ओपन सोर्सचे प्रणेते अतुल चिटणीस यांनी आपली कारकीर्द घडवली. 

फ्री आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे प्रणेते म्हणून १९९४पासून अतुल चिटणीस हे नाव भारताला ठाऊक झाले. साधारण त्याच काळात उद्योगव्यवहारांमध्ये वह्यापेन्सिली आणि कागदी फायलींची जागा कम्प्युटर घेऊ लागला होता. कदाचित त्यावेळी ,सॉफ्टवेअर कुणा कंपन्यांच्या मक्तेदारीत बांधलेले नसावे , या विचाराचे मोल सर्वांना तितकेसे उमजत नसावे. नंतर भारतीय भाषांच्या वापरातील अडचणी , परवान्यासाठी मोजावी लागणारी किंमत तसेच भारतीय डेटाची सुरक्षितता व परावलंबित्वाचे प्रश्न यामुळे ओपन सोर्सची गरज सर्वांना पटू लागली.
अतुल चिटणीस यांनी मात्र १९८०पासूनच कम्प्युटर तंत्रज्ञानावर हुकुमत मिळविली होती. 

           त्यामुळेच लिनक्स सॉफ्टवेअर तसेच फ्री व ओपन सोर्सचा नारा त्यांनी पुकारला. अतुल यांचे वडील भारतीय , तर आई जर्मनीची. त्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षणही बर्लिनमध्ये झाले. त्यानंतर मात्र त्यांचे शिक्षण बेळगाव मिलिटरी स्कूलमध्ये झाले व गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी बीई-मेकॅनिकल केले. वर्षभरातच त्यांचा प्रवास कम्प्युटरनिगडित तंत्रज्ञानाकडे झाला. कम्प्युटरनिगडित अनेक गोष्टींचा प्रथम पुरस्कार त्यांनी केला. मोडेमचा वापर शिकविला. इंटरनेटचा प्रसार होण्यापूर्वीच्या काळात डेटाकम्युनिकेशन , नेटवर्किंग यांची सुरुवात त्यांनी केली. सीआयएक्स- बुलेटिन बोर्ड सिस्टिम ही भारतातील पहिली ऑनलाइन सेवा त्यांनी सुरू केली. ऑनलाइन संपर्क आणि समूहसंवादाचे ते आद्य माध्यम होते. १९९३ ते १९९७ या काळात त्यांनी पीसी-क्वेस्ट या कम्प्युटरआधारित नियतकालिकातून कम्प्युटरजागृतीचा वसा घेतला. भारत सरकारने बुलेटिन बोर्ड सिस्टिमला करांच्या कक्षेत आणण्याचा घाट घातला असताना चिटणीस यांनी इलेक्ट्रॉनिक चळवळीद्वारे त्यावर प्रहार केले. 

          ही पहिलीच ऑनलाइन चळवळ यशस्वी ठरली. विविध व्यासपीठांवर त्यांनी लिनक्स आणि ओपनसोर्सविषयी जनजागरण केले. २१व्या शतकातील नव्या तंत्रज्ञानानुसार त्यांनी मोबाइल कम्प्युटिंग , कन्व्हर्ज्ड कम्युनिकेशन यांतही उडी घेतली. पीसी क्वेस्टचे सल्लागार संपादक म्हणून विपुल लिखाण केले. ते स्वतः हौशी संगीतकारही होते व संगीताची तंत्रज्ञानाशी सांगड घालण्याचे कसबही त्यांच्या अंगी होते. रेडिओव्हर्व हे इंटरनेट रेडिओ स्टेशन त्यांनी सुरू केले होते. त्यांच्या अकाली निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. 

Tags: Atul ChitnisFreewareOpen SourcePeopleTechGuru
ShareTweetSend
Previous Post

‘गुगल ग्लास’ घातक! खासगी जीवनामध्ये हस्तक्षेप होण्याची भीती

Next Post

जीमेल बदलतंय : अपडेटेड व्हर्जनमध्ये आकर्षक फंक्शन्स

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

रेडहॅट कंपनीची आयबीएमकडून खरेदी : ओपन सोर्स कंपनीची अडीच लाख कोटींना विक्री!

रेडहॅट कंपनीची आयबीएमकडून खरेदी : ओपन सोर्स कंपनीची अडीच लाख कोटींना विक्री!

October 29, 2018
अॅलन ट्युरिंग : आधुनिक संगणकाचा जनक : टेक गुरु

अॅलन ट्युरिंग : आधुनिक संगणकाचा जनक : टेक गुरु

December 29, 2015
बिल गेट्स : एक टेक जिनियस : टेक गुरु

बिल गेट्स : एक टेक जिनियस : टेक गुरु

September 7, 2015

सत्या नादेला मायक्रोसॉफ्टचे CEO

February 5, 2014
Next Post

जीमेल बदलतंय : अपडेटेड व्हर्जनमध्ये आकर्षक फंक्शन्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!