MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

यूट्यूब ‘डायरेक्ट टू होम’?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 14, 2013
in इंटरनेट, टीव्ही
YouTubeसर्च म्हणजे गुगल आणि इंटरनेटवर व्हिडीओ पहायचा म्हणजे यू-ट्यूब असे आज समीकरण झाले आहे. पण यू-ट्यूबचे हे व्हिडीओ थेट टीव्हीच्या मोठ्या पडद्यावर पाहता आले तर ? भारतातील युजर्ससाठी लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. गुगल इंडिया यासाठी भारतातील डीटीएच (डायरेक्ट टू होम) केबल कंपन्या ,टीव्ही उत्पादकांशी बोलणी करत आहे. 

यू-ट्यूबवर दर महिन्याला सुमारे ६ अब्ज तासांचे व्हिडीओ पाहिले जातात. तसेच दर मिनिटाला सुमारे १०० तासांचे व्हिडीओ अपलोड केले जातात. आज यू-ट्यूब गुगलचा महत्त्वाचा उत्पन्नस्रोत आहे. २०१२ मध्ये यू-ट्युबमुळे गुगलला तब्बल ३.१ लाख कोटी रुपये उत्पन्न मिळाले. एकट्या भारतातच यू-ट्युबला दर महिन्याला साडेपाच कोटी लोक भेट देतात. २०११च्या तुलनेत हा आकडा दीड कोटींनी अधिक आहे. यात मोबाइलचा वाटा फार मोठा आहे. आता याला टीव्हीचीही जोड मिळाली तर ते यू-ट्युबसाठी आणि इंटरनेट टीव्हीसाठी फार मोठे पाऊल असेल. 

टीव्ही हे आज भारतातील महत्त्वाचे मनोरंजनाचे साधन आहे. देशातील बहुसंख्य घरात टीव्ही पोहचला असून ,ट्रायच्या (टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया) आकडेवारीनुसार त्यातील ५.४ कोटी घरात डीटीएचचे केबल जोडणी आहे. यात डिश टीव्ही , टाटा स्काय , एअरटेल , व्हीडिओकॉन , रिलायन्स आणि सन डायरेक्ट या मुख्य कंपन्या आहेत. यू-ट्यूबने या आधीच सॅमसंग , एलजी , सोनी आधी टीव्ही कंपन्यांशी करार केले असून त्यांच्या स्मार्ट टीव्हीमध्ये साइटवरील व्हिडीओ पाहण्याची सुविधा दिली आहे. 

मार्च २०१३ पर्यंतची आकडेवारी पाहिली तर भारतात सुमारे १६.४ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. तसेच आठपैकी सात युजर्स फोनवर इंटरनेटचा वापर करतात. पण भारतात इंटरनेटचा वेग ही सर्वात मोठी समस्या आहे. यू-ट्युबच्या बफरिंगसाठी लागणारा वेळ कमी करणे हे गुगलसाठी मोठे आव्हान असणार आहे. भारतात थ्रीजी इंटरनेट १० टक्के लोकांपर्यंतही पोहचलेले नाही. त्यामुळे जेवढा हा वेग वाढेल तेवढ्याच लोकांच्या मागण्याही वाढतील. 

या मागण्या पूर्ण करण्यासाठीच गुगलने हे पाऊल उचलले आहे. आगामी भविष्याची ही फक्त चुणूक असून आगामी काळात यू-ट्यूबप्रमाणे अन्य सेवाही थेट टीव्हीवर मिळणे अशक्य नाही. शेवटी कॉम्प्युटर असो की मोबाइल , इंटरनेटसाठी ही सारी माध्यमे आहेत. त्यामुळे तुमचा टीव्ही लवकरच इंटरनेट टीव्ही होणार , हे सांगायला कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. 

Incoming search terms :
youtube soon avalable on television via dish networks with internet also

ADVERTISEMENT
Tags: Cable TVDish TVGoogleInternetYouTube
ShareTweetSend
Previous Post

सात हजारांहून कमी किंमत असलेल्या अँड्रॉइडफोनची झलक

Next Post

याहू आणखी नव्या रूपात

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Google Willow Quantum Chip

गूगलची Willow Quantum चिप : क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये नवा अध्याय!

December 22, 2024
Google Year In Search 2024

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२४ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 16, 2024
Ronaldo YouTube Channel

फुटबॉलपटू रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल : २४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

August 22, 2024
Next Post
याहू आणखी नव्या रूपात

याहू आणखी नव्या रूपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech