Xiaomi RedMi 1S |
Xiaomi Mi3 च्या यशानंतर आता नवीन फोन व accessories सह येत आहे . इतर चायनिज कंपनीसारखी ही कंपनी नाही अशी एक खात्री बहुधा भारतीयांच्या मनात निर्माण झाली असावी. फ्लिपकार्टवर अक्षरशः उड्या पडताना पाहून Xiaomi ला सुद्धा आश्चर्य वाटलं. अवघ्या 2 सेकंडमध्ये २०,००० फोन्सची ऑनलाइन विक्री जी अभूतपूर्व अशीच आहे. Xiaomi ला Asus च्या Zenphone ची स्पर्धा आहे. ज्यासाठीच आता Xiaomi घेऊन आली आहे Redmi 1S ह्या नवीन स्वस्त पण मस्त अशा फोनसोबत.
Redmi 1S ची किंमत अवघी Rs.५९९९ इतकी असून फीचर्स मात्र १५००० हजारच्या फोन्ससारखी आहेत. अगदी भारतीय स्मार्टफोन विक्रेते जसे की Micromax सुद्धा इतक्या कमी किंमतीत इतक्या सुविधा असलेला फोन विकत नाही. मोटोरोलाच्या मोटो ईची किंमतसुद्धा ६००० आहे मात्र आता हा फोन अजिबातच स्पर्धेत नसल्यासारखा होईल. त्यामुळे आता जर Redmi 1S ची विक्री सुरू झाली तर ग्राहकांच्या पुन्हा उड्या पडणार हे निश्चित .
हा फोन फ्लिपकार्टवर 2 सप्टेंबरपासून उपलब्ध होतोय.रजिस्टर करण्यासाठी लिंक : रजिस्टर रेडमी 1 एस
Xiaomi RedMi 1S फीचर्स ::
स्क्रीन : 4.7″ 1280 x 720 IPS display with 312 ppi
Ram : 1जीबी
मेमोरी : 8जीबी
बॅटरी : 2000mAh
कॅमेरा : 8 एमपी ( f/2.2, 1080P video, 28mm Wide-Angle) + 1.6एमपी (front)
सिम : Dual SIM
प्रॉसेसर : Snapdragon 400 Chipset, 1.6 GHz Quad-core