MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

मोटो झेड, पहिला टँगो फोन, गुंडाळता येणारा फोन आणि इतर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 10, 2016
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT
अलीकडे सादर होत असलेल्या फोन्समध्ये जवळपास काहीच नावीन्य नसतं. थोडेफार फीचर्स कमीजास्त करून वेगवेगळ्या कंपन्या सादर करत राहतात. गेल्या काही महिन्यापासून मात्र परिस्थिति बदलत असून आता अधिक सुरक्षित आणि VR सारख्या तंत्रज्ञानाला समोर ठेऊन फोन्सची निर्मिती केली जात आहे. यातच नवा प्रकार जन्माला येत आहे तो म्हणजे मोड्युलर फोन्स ! तर आज पाहूया मोड्यूलर फोन्स म्हणजे काय आणि इतर नव्या घडामोडी …

Project ARA : Modular Phone 

मोड्यूलर फोन म्हणजे काय ? : आपण आपल्या कम्प्युटर पीसी मध्ये एखादी गोष्ट स्लो/खराब झाली तर तो भाग सहज बदलून नवा टाकू शकतो. अर्थात ही गोष्ट लॅपटॉपच्या बाबतीत मात्र कमी आढळते कारण बर्‍यापैकी पार्ट्स हे फिक्स बसवून टाकलेले असतात. त्याचप्रमाणे आपले सध्याचे फोनचे पार्ट्स आपण ताकद वाढवण्यासाठी बदलू शकत नव्हतो. मात्र आता येत असलेल्या मोड्युलर फोन्समध्ये आपण नवे पार्ट्स जोडू शकतो नवं हार्डवेअर जोडून अधिक वेळ चालणारा अधिक ताकद असलेला फोन बनवू शकतो !
समजा तुम्हाला तुमच्या फोनला अधिक बॅटरी हवी आहे. लगेच एक Battery Mod भाग विकत घ्या आणि फोनला जोडा की झाल काम ! गूगलचा प्रोजेक्ट ARA, प्रोजेक्ट टँगो, फोनब्लॉक्स,एलजी जी5 हे प्रकल्प सध्या मोड्युलर फोनच्या स्पर्धेत सहभागी आहेत.  
मोटो झेड हा लेनेवोने सादर केलेला फोन यामध्ये सध्या फोनला प्रॉजेक्टर, जेबीएलचे स्पीकर्स, बॅटरी पॅक जोडता येतो ! तसेच आपण स्वतः बनवलेले पार्ट्स सुद्धा जोडू शकतो !

मोटो झेड : मोटोरोला ही कंपनी आता लेनेवोकडे आहे. त्यांनी हा नवा फोन एका नवी सिरीजमध्ये आणलाय. एकदम पातळ डिजाइन (केवळ 5.19mm)असून ह्यामध्ये नेहमीचा 3.5mm Headphone Jack नसून नव्या प्रकारचा USB Type C जॅक असेल. LeEco नंतर हा फोन आहे ज्याने नेहमीचा हेडफोन जॅक न वापरता नवा टाइप सी पोर्ट वापरला आहे! आता आयफोनसुद्धा हाच जॅक वापरेल असा अंदाज आहे.
मोटो झेड आणि मोटो झेड फोर्स हे दोन नवे फोन या सेरीजमध्ये आले आहेत.      
या फोनला Moto Mods नावाचे भाग बाहेरून जोडता येतात  ज्याद्वारे आपण या फोनला मोठा प्रॉजेक्टर बनवू शकतो, JBL स्पीकर्स बसवू शकतो, बॅटरी वाढवू शकतो !



मोटो झेड फीचर्स
:

  1. प्रॉसेसर : quad-core Qualcomm Snapdragon 820 2.2GHz
  2. रॅम : 4GB स्टोरेज : 
  3. डिस्प्ले : 5.5-inches quadHD (535 pixels per inch). 
  4. कॅमेरा : मागचा 12 मेगापिक्सेल f/1.8 OIS, पुढचा 5 मेगापिक्सेल 
  5. बॅटरी : 2600mAh  
  6. झेड फोर्स मध्ये झेड सारखीच फीचर्स असून बॅटरी 3500mAh ची आणि कॅमेरा 21 एमपी आहे!
मोटो मोड्सचा यूट्यूब व्हिडिओ :  लिंक 

लेनेवो टँगो फोन : यासोबत लेनेवोने गूगलसोबत टँगो नावाच्या प्रकल्पांतर्गत Phab2 Pro नावाचा फोन सादर केलाय . ह्या फोनमध्ये 3D मॅपींगची ताकद असून औग्मेंटेड रियालिटीचा वापर हा फोन करतो !! हासुद्धा फोनच्या जगात नावच प्रकार असून याद्वारे आपल स्वतःच आभासी जग आणि खर आयुष्य एकत्र करता येतील. आपण यातून ग्रह, सौरमंडळ अनुभवू शकतो! हे तंत्र नक्की काय आहे समजण्यासाठी खालील तीन व्हिडिओ पहावेच लागतील…

  • Turn your world into Playground
  • Tango: See more with a new kind of phone
  • Tango: Re-imagine space around you.

Phab2 Pro फीचर्स :  Qualcomm Snapdragon 652 processor, DSP, ISP आणि integrated sensor hub, Dolby AudioTM Capture 5.1, Triple-array microphones, 16MP rear camera, 6.4-inch ‘intelligent Assertive Display’, 4GB of RAM आणि 64GB स्टोरेज, 4050mAH बॅटरी आणि किंमत $499(~३०,०००रु.)

Lenovo Tango Phab2 Pro

लेनेवोने याच कार्यक्रमात गुंडाळता येणार्‍या फोनचा डेमो दिला. भविष्यात येणार्‍या तंत्रज्ञानाची झलक आताच दिसत असून हा फोन चक्क हातामध्ये गुंडाळून घड्याळ्यासारखा वापरता येतो. सोबतच त्यांनी असा टॅब्लेट दाखवला ज्याची घडी घालता येते. हा टॅब्लेट निम्म्यामध्ये दुमडून फोनसारखा वापरुन लगेच पुन्हा सरळ करून टॅब्लेट सारखा पाहता येतो !!!

Lenovo Bendable Phone and Tablet

इतर घडामोडी :

  • काही दिवसांपूर्वीच फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचं ट्विटर आणि पिनटरेस्ट अकाऊंट हॅक झाल होत! याआधी झालेल्या linkedin च्या पासवर्ड लिक मधून हॅकर्सने पासवर्ड मिळवून मार्कच अकाऊंट चक्क हॅक केल ! आणि आश्चर्य म्हणजे त्याने त्याच्या खात्यांचा पासवर्ड “dadada” हा ठेवला होता !!!!
  • LeEco ने निर्माण केलीय मोठी स्पर्धा LeEco Le 2 आणि LeMax 2 होत आहेत यशस्वी !
  • अमाझोनने केलीये भारतीय साइटवर तब्बल 3 बिलियन डॉलरची गुंतवणूक, भारतासाठी मोठी योजना तयार!

लवकरच येत आहे वनप्लस 3 स्मार्टफोन, लिक्स वरून आहेत ग्राहकांना खूप आशा, यावेळी invite सिस्टम शिवाय विकला जाणार !…
Update : मोटो झेड भारतात उपलब्ध : अॅमॅझोन लिंक : http://amzn.to/2dIFgIZ  


    Tags: AmazonARAGoogleLeEcoLenovoMotorolaOnePlusTango
    ShareTweetSend
    Previous Post

    सोशल मीडियाबद्दल महत्वाची सूचना

    Next Post

    आपले ऑनलाइन अकाऊंट (फेसबुक,जीमेल, ट्वीटर) सुरक्षित कसे ठेवायचे ?

    Sooraj Bagal

    Sooraj Bagal

    Related Posts

    वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

    वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

    February 7, 2023
    गूगलचं ChatGPT ला उत्तर : Bard नावाचा AI चॅटबॉट!

    गूगलचं ChatGPT ला उत्तर : Bard नावाचा AI चॅटबॉट!

    February 7, 2023
    ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

    ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

    January 16, 2023
    CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

    CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

    January 8, 2023
    Next Post
    आपले ऑनलाइन अकाऊंट (फेसबुक,जीमेल, ट्वीटर) सुरक्षित कसे ठेवायचे ?

    आपले ऑनलाइन अकाऊंट (फेसबुक,जीमेल, ट्वीटर) सुरक्षित कसे ठेवायचे ?

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ADVERTISEMENT
    नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

    नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

    March 20, 2023
    जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

    जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

    March 18, 2023
    सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

    सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

    March 17, 2023
    टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

    टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

    March 10, 2023
    एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

    एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

    September 25, 2012
    मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

    मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

    September 10, 2012
    यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

    यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

    November 4, 2016
    ADVERTISEMENT
    MarathiTech – मराठीटेक

    तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

    मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

    नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

    नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

    March 20, 2023
    जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

    जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

    March 18, 2023

    नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

    जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

    सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

    टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

    नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

    • About
    • Advertise
    • Privacy Policy
    • Contact

    © MarathiTech 2022 A Product by BagalTech

    No Result
    View All Result
    • स्मार्टफोन्स
    • ॲप्स
    • टेलिकॉम
    • खास लेख
    • गेमिंग
    • ऑपरेटिंग सिस्टिम्स
    • शॉपिंग ऑफर्स
    • आमच्याबद्दल About Us
    • संपर्क – प्रतिक्रिया

    © MarathiTech 2022 A Product by BagalTech

    error: Content is protected!