MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

गूगल Allo : गूगलचं नवं मेसेजिंग अॅप !

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 21, 2016
in ॲप्स
 

गूगलने व्हॉटसअॅप, iMessage, फेसबुक मेसेंजर, इ. आधीच उपलब्ध असलेल्या मेसेजिंग अॅप्समध्ये आणखी एकाची भर टाकली आहे. त्यांच्या नव्या मेसेजिंग अॅपचं नाव Allo अॅलो असं असून याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गूगलचे स्मार्ट रोबॉट्ससुद्धा काम करतात! ज्यांना त्यांनी गूगल असिस्टेंट असं म्हटलं आहे! हा असिस्टेंटसुद्धा आपल्या संवादांचा भाग असणार आहे.

डाऊनलोड लिंक : Get Google Allo on Google Play

गूगल Allo मधील सुविधा :

ADVERTISEMENT
  • स्मार्ट रीप्लाय : एकही शब्द टाइप न करता मेसेजला रीप्लाय द्या ! हा स्मार्ट रीप्लाय आपल्या आधीच्या मेसेजचा अभ्यास करून त्यानुसार आपोआप मेसेजसाठी शब्द सुचवेल! 
  • इंक : फोटोज पाठवताना त्यावर वेगवेगळ्या रंगांनी चितारण्याची (डूडल काढण्याची सोय) किंवा मजकूर लिहिण्याची सोय !
  • स्टीकर्स : गूगल अॅलोमध्ये जगभरासाठी खास वेगवेगळे स्टीकर्स बनवून दिले असून त्यांचा वापर मेसेज मध्ये करता येतो (ही सुविधा Hike सारख्या अॅप्लिकेशनमध्ये आहे मात्र व्हॉटसअॅपमध्ये नाही) खास भारतीय वापरकर्त्यासाठी २०० स्टीकर्सचा समावेश करण्यात आला आहे! (सध्यातरी इंग्लिश आणि हिन्दीमधूनच 🙁 )
  • पर्सनल गूगल असिस्टेंट : यामुळे आपल्याला मेसेजिंग अॅपमध्येच जवळचे हॉटेल्स/रेस्टोरंट, पाहण्यासाठी व्हिडिओ शेअर करण्याची सोय, प्रश्नांची उत्तरे मिळवा तेसुद्धा मित्रांची चॅट करतानाच ! (थोडक्यात हे सर्व करण्यासाठी ब्राऊजरमध्ये जाऊन परत मेसेजिंग अॅपमध्ये येण्याची गरज नाही !)
    समजा तुम्हाला मित्रांसोबत जवळच्या ठिकाणी चायनीज खाण्यासाठी जायचं आहे “@google chinese food nearby” असा मेसेज पाठवावा लागेल जो लगेच जवळच्या चायनीज रेस्टोरंटची यादी दाखवेल !
    अशाच प्रकारे आपण एरवी गूगलवर जे काही सर्च करतो ते सर्व ह्या अॅपमध्येच करता येईल!
  • Incognito Mode : end-to-end encryption चा वापर करून मेसेज सुरक्षितरीत्या पाठवण्यासाठी हा मोड देण्यात आला आहे. ज्यामुळे पाठवल्यावर नष्ट होणारे मेसेज पाठवता येतील ते किती वेळ अस्तित्वात राहतील हेसुद्धा सेट करता येईल! या मोडचा वापर गुप्तरित्या मेसेज पाठवण्यासाठी करता येईल असं गूगलच म्हणणं आहे !
  • फॉन्ट साइज : सेंड बटन वरखाली सरकवून फॉन्टचा आकार बदलता येतो!
गूगल Allo चा ऑफिशियल व्हिडिओ ↑

गूगल अॅलो कसा वापरावा याबद्दल The Verge यांचा व्हिडिओ पहा : How to use Google Allo on YouTube

पण …. होय ह्या सगळ्यामागे एक मोठा “पण” दडला आहे. गूगलच्या या नव्या अॅपला सायबर तज्ज्ञांकडून विरोध होतोय. एडवर्ड स्नोडेन (हॅकर ज्याने NSA कशाप्रकारे सर्व इंटरनेटवर गुप्तहेरी करत सर्वांच्या गोपनीयतेचा भंग करत आहे ते उघड केलं होतं) त्याच्या म्हणण्यानुसार गूगल ह्या अॅपद्वारे आपण पाठवत असलेले सर्व मेसेज स्वतःकडे रेकॉर्ड करून ठेवेल आणि आपले संभाषण पोलिसांना त्यांच्या मागणीवर देऊन टाकेल. (थोडक्यात प्रत्येक Allo यूजरच्या प्रायवसीचा भंग होईल!)        

What is #Allo? A Google app that records every message you ever send and makes it available to police upon request. https://t.co/EdPRC0G7Py

— Edward Snowden (@Snowden) September 21, 2016

गूगलच्या म्हणण्यानुसार आपला डाटा आपल्यासाठी चांगली सेवा देण्यासाठी उपयुक्त आहे मात्र याचसाठी आपण आपला सर्व डाटा त्यांच्या स्वाधीन करत आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. गूगलने अॅलो बाबतीत आधी केलेली घोषणा आणि आताची घोषणा यामध्ये फरक असून आताची घोषणेनुसार गूगल असिस्टेंटसाठी तर ते आपला डाटा गोळा करतीलच पण Incognito Mode मध्ये सुद्धा १००% प्रायवसी नसणार आहे! आपण जोपर्यंत स्वतः हून चॅट हिस्टरी डिलीट करणार नाही तोपर्यंत ती गूगलकडे साठवली जाणार आहे.

या बड्या कंपन्या जसे की गूगल, याहू, फेसबुक यांच्यावर वारंवार असे आरोप झाले आहेत आणि ते काही वेळा सिद्ध सुद्धा झाले आहेत की ह्या कंपन्या यूजरचा पर्सनल डाटा NSA या अमेरिकी गुप्तहेर संघटनेला पुरवतात! याविरोधात बर्‍याच वेळा आंदोलने करून आवाज उठवला गेला असून Mr Robot या टीव्ही सिरियलमध्ये सुद्धा याबद्दल चित्रण करण्यात आलं आहे !   

व्हॉटसअॅपच्या बाबतीतसुद्धा गेल्या काही महिन्यात प्रायवसी बद्दल अडचणी सुरू आहेत. फेसबुक सोबत आपला डाटा शेअर करावा का याबद्दल विचारणा केली जात असून त्याला स्पष्ट नकार द्या असं मराठीटेकच्या व्हॉटसअॅप करणार तुमचा फोन क्रमांक फेसबुकसोबत शेअर : हे कसे थांबवाल या पोस्ट मध्ये आम्ही सांगितलं आहेच.

काही महिन्यापूर्वी गूगलने व्हिडिओ चॅटसाठीसुद्धा एक अॅप सादर केलं असून त्याचं नाव ड्युओ Duo असं आहे.
गूगलने स्वतःच्याच Hangout अॅपला स्वतःच नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे! या Duo अॅपला सध्यातरी चांगला प्रतिसाद लाभत असून Allo आणि Duo यांच्या जोडीला भविष्यात किती यश मिळेल ते येणारा काळच ठरवेल…कारण गूगलचे यापूर्वीचे बरेच प्रयत्न फसले असून गूगल प्लस, Hangout messenger, Google Wave ही त्याची काही उदाहरणे आहेत … सध्याच्या  व्हॉटसअॅप, iMessage, फेसबुक मेसेंजर, Hangouts, WeChat, इ  अॅप्ससमोर अॅलोचा निभाव लागण्याची शक्यता कमी असली तरी गूगल असिस्टेंट त्यांचा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे!

डाऊनलोड लिंक : Get Google Duo on Google Play

मराठीटेकचं आवाहन : “माझ चॅट काय इतक महत्वाच आहे” / “माझ चॅट पाहून पोलिस काय करणार आहेत” /मला कुठ इतक security आणि प्रायवसी लागणार आहे ?”  अशा अॅटीट्यूड मध्ये राहू नका. तुमचा डाटा सार्वजनिक न होता तुमच्यापुरताच राहायला हवा. तुमच्या गोपनीयतेचा भंग व्हायला नको यासाठी काळजी घ्या यासंबंधी आमचा लेख वाचा :  आपले ऑनलाइन अकाऊंट सुरक्षित कसे ठेवायचे ?

Tags: AlloAppsGoogleMessenger
ShareTweetSend
Previous Post

आयफोन ७, ७ प्लस आणि अॅपल वॉच २ सादर

Next Post

फ्लिपकार्ट,अमॅझॉन,स्नॅपडीलवर ऑनलाइन खरेदीसाठी ऑफर्स!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Instagram 90 Second Reel Stickers

इंस्टाग्रामवर आता ९० सेकंदांच्या रील्स बनवता येणार : सोबत अनेक नव्या सोयी!

June 3, 2022
Instagram New Logo

इंन्स्टाग्रामचा नवा लोगो, नवा फॉन्ट आणि इतर डिझाईनमध्ये काही नव्या गोष्टी!

May 25, 2022
Google Pixel 6a

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध होणार : Google I/O मध्ये जाहीर!

May 14, 2022
Next Post
फ्लिपकार्ट,अमॅझॉन,स्नॅपडीलवर ऑनलाइन खरेदीसाठी ऑफर्स!

फ्लिपकार्ट,अमॅझॉन,स्नॅपडीलवर ऑनलाइन खरेदीसाठी ऑफर्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

July 4, 2022
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

July 4, 2022
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!