MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Windows

मायक्रोसॉफ्टने सादर केलाय स्वतःचा डेस्कटॉप पीसी, सर्फेस बुक i7, डायल, विंडोज १० अपडेट

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 27, 2016
in Windows, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स
मायक्रोसॉफ्ट सर्फेस स्टुडिओ, सर्फेस बुक i7, सर्फेस टॅब्लेट

मायक्रोसॉफ्टने न्यूयॉर्क शहरात विंडोज १० आणि इतर हार्डवेअर प्रोडक्टससाठी कार्यक्रमाच आयोजन केलं होतं. यमध्ये त्यांनी अनेक नव्या गोष्टी सादर केल्या असून ज्याद्वारे प्रामुख्याने अॅपलच्या प्रोडक्टसना चांगलीच स्पर्धा उभी केल्याच दिसत आहे. अनेक वर्षांपासून अॅपलने त्यांचा डेस्कटॉप iMac अपडेट केला नाहीये. आता मायक्रोसॉफ्टने त्यांच्या कार्यक्रमाच्या काही दिवस आधीच सर्फेस स्टुडिओ नावाचा मायक्रोसॉफ्टचा पहिलाच पीसी सादर करून मोठं आव्हान निर्माण केलं आहे! सर्फेस स्टुडिओला जगभरात चांगला प्रतिसाद लाभेल असं सकृतदर्शनी तरी दिसत आहे.
या कार्यक्रमात अनेक महत्वाच्या घोषणादेखील करण्यात आल्या आहेत. विंडोज १० साठी नवं अपडेट उपलब्ध केलं जाणार असून याचं नाव Creators Update असं असणार आहे ज्याद्वारे वापरकर्त्यांना 3D आणि AR यांच्या दृष्टीने अधिक सुविधा असतील.      
तर आजच्या लेखात जाणून घेऊ या मायक्रोसॉफ्टच्या नव्या प्रोडक्टसविषयी …

Microsoft Surface Studio Desktop PC

सर्फेस स्टुडिओ : हा मायक्रोसॉफ्ट कंपनीचा सर्वात पहिला डेस्कटॉप पीसी. ऑल इन वन प्रकारात मोडणारा हा पीसी अॅपलच्या iMac ला टक्कर देण्याच्या दृष्टीने बनवण्यात आला आहे. याच्याकडे पाहताच ह्याची भव्यता लक्षात यावी. तब्बल २८ इंची मोठा टचस्क्रीन डिस्प्ले आणि सोबतच त्यावर सर्फेस पेनने सुद्धा लिहिता येईल. हा पीसी सामान्य वापरकर्त्यांसाठी नसून क्रिएटर यूजर ज्यांचा मुख्य कल चित्रे, फोटो, व्हिडिओवर काम करणे आहे यांच्यासाठी हा पीसी सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. यावर ट्रू स्केल तंत्रामुळे खर्‍या कागदाच्या आकाराचा डॉक्युमेंट आहे अशा आकारातच डिस्प्लेवर दिसेल !
मायक्रोसॉफ्टच्या या नव्या कम्प्युटरचं टेक जगतात सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे याच्या डिजाइनबद्दल आणि हार्डवेअरबद्दल सुद्धा …
Surface Studio Features :

  1. डिस्प्ले : २८ इंच (4500×3000), 192ppi, वाकवता येणारा डिस्प्ले 
  2. प्रॉसेसर : इंटेल i7 आणि ग्राफिक्ससाठी Nvidia GeForce GTX980
  3. रॅम : 32GB, स्टोरेज : 2TB 
  4. पोर्ट : 4 USB3.0, 3.5headphone jack, SD card slot, Ethernet, MiniDisplay.  
  5. किंमत $2999 (रु. २,००,५०० ते २,८०,०००)       

सर्फेस स्टुडिओ व्हिडिओ :  Introducing Microsoft Surface Studio (व्हिडिओ नक्की पहा)

अॅपलने इतक्या वर्षात iMac मध्ये ज्या चुका केल्या त्या सर्व ह्यामध्ये दुरुस्त केल्या असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांमध्ये उमटत आहेत. आता लगेच अॅपलचा इवेंट असल्यामुळे त्यांचं प्रॉडक्ट सर्फेस स्टुडिओ समोर कसं टिकेल हे उद्याच कळू शकेल !

Microsoft Surface Dial

सर्फेस डायल : ही एक ठोकळ्याच्या आकाराची नवी accessory असून ज्याद्वारे क्रिएटर यूजरना रंग निवडताना, मेनू मधून पर्याय निवडताना, तसेच इतर डिजाइन टूल्स साठी उपयोगी पडणार आहे. याविषयीचा व्हिडिओ नक्की पहा भन्नाट टुल आहे हे सर्फेस डायल !  हा डिस्प्ले/स्क्रीनवर ठेवताच त्याच्याभोवती पर्याय दिसू लागतात. इनपुट साठी हा नवा प्रकार मायक्रोसॉफ्टने सादर केला असून ग्राहकांच्या पासतीस उतरेल अशी कंपनीला आशा आहे. सर्फेस डायल व्हिडिओ : Microsoft Surface Studio Dial

ADVERTISEMENT
Microsoft Surface Book i7

सर्फेस बुक i7 : गेल्यावर्षी मायक्रोसॉफ्टने त्यांचा पहिला लॅपटॉप सर्फेसबुक सादर केला होता. हा अद्याप सर्वोत्तम लॅपटॉप्स पैकी एक आहे. यामध्ये वरून दिसणारे काही बदल करण्यात आले नसले तरी अंतर्गत गोष्टी बर्‍याच बदलल्या आहेत जसे की आता इंटेलच्या i7 प्रॉसेसर, Nvidia GeForce GTX965M सोबत ३०% अधिक बॅटरी (तब्बल सोळा तास टिकणारी बॅटरी लाइफ!) या नव्या सुधारित मॉडेलची किंमत रु. १६०५०० पासून रु. २२०६०० इतकी असेल.(स्टोरेजमुळे किंमतींत फरक)  
सर्फेस बुक i7 व्हिडिओ :  Introducing the new Microsoft Surface Book i7

Xbox Windows Built In Broadcast

एक्सबॉक्स Xbox : मायक्रोसॉफ्टच्या ह्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर ब्रॉडकास्टची सोय अंतर्गतरित्या समाविष्ट केली आहे. गेमर्समध्ये ही सोय नक्कीच प्रसिद्ध होणार अशी मायक्रोसॉफ्टला खात्री आहे. विंडोज ओएसमधील ह्या नव्या सुविधेमुळे आपण गेम खेळताना इतर यूजरना आपला खेळ ऑनलाइन पाहता येतो यालाच गेम ब्रॉडकास्ट म्हणतात. यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विंडोज १० मध्ये गेमिंगसाठी एक्सबॉक्सचं अॅप्लिकेशन समाविष्ट आहे. आता गेमिंग साठी विंडोजतर्फे 4K रेजोल्यूशन सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे!    

Windows 10 Creators Update

विंडोज १० क्रिएटर अपडेट : अॅनिव्हर्सरी अपडेट नंतरच मोठ अपडेट म्हणजे क्रिएटर अपडेट जे २०१७ च्या सुरुवातीला सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं जाणार असून यामध्ये प्रामुख्याने 3D तंत्रावर भर देण्यात आला आहे. यासाठी त्यांनी अनेक नव्या टुल्सचा समावेश करण्याची घोषणा केली आहे. विंडोज व्हीआर, 3D या साठी नवे पर्याय उपलब्ध असतील ज्याद्वारे 3D स्कॅनिंग, 3D प्रिंटिंग सोपं होईल. यावेळी मायक्रोसॉफ्टने स्मार्टफोनद्वारे 3D मॉडेल तयार करण्याचसुद्धा प्रात्यक्षिक दाखवलं !

Microsoft Paint 3D 

मायक्रोसॉफ्ट पेंट 3D : विंडोज एक्सपीपासून आपल्या आवडीचं पहिलं अॅप्लिकेशन म्हणजे मायक्रोसॉफ्ट पेंट. अनेक वर्षात यामध्ये काही खास बदल करण्यात आले नव्हते. मात्र आता पेंट नव्या रूपात उपलब्ध होणार असून यामध्ये 3D चित्रे रेखाटता येतील, 3D इमोजी बनवता येतील!  

या पेंट 3D अॅप्लिकेशनमुळे 3D कंटेंट बनवणं सामान्य वापरकर्त्यांसाठीसुद्धा सोपं होणार आहे.
विंडोजमधील 3D बद्दल व्हिडिओ : Introducing 3D in Windows 10
Windows VR Headsets

Mixed Reality : AR आणि VR यांचं मिश्रण म्हणजेच मिक्स्ड रीयालिटी. मायक्रोसॉफ्टचा होलोलेन्स AR विश्वात सर्वोत्तम असला तरी तो सर्वांना परवडेल असा नाहीये. म्हणूनच एचपी, लेनेवो, असुस यांच्या साथीने मायक्रोसॉफ्ट अवघ्या $299 (~रु १८०००) मध्ये VR हेडसेट देणार आहे ज्याद्वारे VR चा पूर्ण अनुभव मिळवता येईल!

मायक्रोसॉफ्टच्या कार्यक्रमाचा सारांश पहा ह्या व्हिडिओमध्ये :  Microsoft Event: 90 Second Recap

याआधीचा लेख : गूगलने सादर केलाय नवा “पिक्सेल” स्मार्टफोन आणि इतर भन्नाट गोष्टी !
       

Tags: DesktopLaptopsMicrosoftPCSurfaceWindows
ShareTweetSend
Previous Post

गूगलने सादर केलाय नवा “पिक्सेल” स्मार्टफोन आणि इतर भन्नाट गोष्टी !

Next Post

प्लॅस्टिक मनी म्हणजे काय

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च आता ChatGPT सोबत : एज ब्राऊजरमध्येही AI !

मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च आता ChatGPT सोबत : एज ब्राऊजरमध्येही AI !

February 8, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
Windows 11 2022 अपडेट आजपासून उपलब्ध : 22H2 मध्ये नव्या सोयी!

Windows 11 2022 अपडेट आजपासून उपलब्ध : 22H2 मध्ये नव्या सोयी!

September 21, 2022
MicrosoftRewardsIndia

मायक्रोसॉफ्ट रिवार्ड्स भारतात उपलब्ध : एज ब्राऊजर वापरा व बक्षिसे मिळवा!

August 22, 2022
Next Post
प्लॅस्टिक मनी म्हणजे काय

प्लॅस्टिक मनी म्हणजे काय

Comments 1

  1. Anonymous says:
    6 years ago

    I loved as much as you'll receive carried out right here.
    The sketch is attractive, your authored material stylish.
    nonetheless, you command get bought an impatience over that
    you wish be delivering the following. unwell unquestionably come further formerly again since exactly the same nearly
    a lot often inside case you shield this hike.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!