MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

यूपीआयची दुसरी आवृत्ती : UPI 2.0 सादर !

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 16, 2018
in ॲप्स

यूपीआय म्हणजे यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेसची दुसरी आवृत्ती आज सादर करण्यात आली. UPI 2.0 मध्ये अनेक नव्या सोयींची जोड देण्यात आली असून याद्वारे पैशांची ऑनलाईन देवाण घेवाण आणखी सोपी होईल!
मुंबईमध्ये काही ठराविक NPCI सदस्यांच्या उपस्थितीत याबद्दल घोषणा करण्यात आली आहे. National Payments Corporation of India (NPCI) ही सरकारी संस्था सर्व पेमेंट करण्याच्या पद्धतींची देखरेख करण्याचं काम करते.  यूपीआय (UPI) प्रथम (11 April 2016) उपलब्ध करून देण्यात आलं तेव्हाच याची उपयुक्तता मोठी होती. कमी रकमेच्या पैशांची देवाण घेवाण यामुळे फारच सहजसोपी झाली आहे. भीम अॅप, गूगल तेझ, फोनपे, विविध बँकांची अॅप्स, आता पेमेंट गेटवेद्वारे सुद्धा यूपीआय मार्फत व्यवहार करता येतात.

UPI 2.0 मधील काही ठळक सोयी :

1. Linking of overdraft account: सध्या सेव्हिंग्स व करंट अकाउंट जोडता येतात मात्र आता ओव्हरड्राफ्ट अकाउंट सुद्धा UPI ला लिंक करता येणार आहे. या जोडलेल्या ओव्हरड्राफ्ट खात्याचा वापर करत  लगेच व्यवहार करता येतील आणि सोबत त्या खात्याच्या सर्व सोयीचा सुद्धा लाभ घेता येईल!

2. One-time mandate: यामुळे आपण एखाद्या दुकानातून खरेदी केली मात्र त्या क्षणी आपल्याकडे खात्यामध्ये पैसे नसतील तर UPI द्वारे अशी आज्ञा (मॅनडेट वापरू) देऊ शकतो आणि दुकानदाराशी एक ज्यामुळे आपल्याला पैसे नंतर देता येतील! थोडक्यात तो व्यवहार  pre-authorise करून दोन्ही बाजूनी मान्य केलेला असेल मात्र पैसे नंतर पाठवले जातील! व्यापारी आणि ग्राहक दोघानांही अडचण येत नाही. ज्या दिवशी खरेदीची तारीख सेट केलेली असेल त्या दिवशी पैसे आपोआप व्यापाऱ्याच्या (किंवा व्यक्तीच्या) खात्यामध्ये पाठवले जातील!

3. Invoice in the inbox : आता ग्राहकांना विक्रेत्यानं पाठवलेली पावती आधी इनबॉक्समध्ये पाठवली जाईल ज्यामुळे ग्राहक नेमकी रक्कम आकारली आहे का व त्याच विक्रेत्याची पेमेंट रिक्वेस्ट आली आहे का ते तपासून पाहू शकतो. इनबॉक्समधील पावतीवर रक्कम तपासून झाली की ग्राहक विक्रेत्याला सहज पैसे पाठवू शकेल!

4. Signed intent and QR: ही सोय ग्राहकांना QR कोड स्कॅन करताना विक्रेत्याची माहिती खरी आहे का हे पाहण्यासाठी उपयोगी पडेल. ही सोय ग्राहकांना त्या विक्रेत्याच्या माहितीची अधिकृत पडताळणी झाली आहे का नाही हे सांगेल! जर तो विक्रेता सुरक्षित नसेल तर तसं नोटिफिकेशन ग्राहकांना दिली जाईल.

सध्याच्या तारखेला  UPI 2.0 च्या सदस्य असलेल्या बॅंक्स पुढील प्रमाणे : State Bank of India (SBI), HDFC Bank, Axis Bank, ICICI Bank, IDBI Bank, RBL Bank, YES Bank, Kotak Mahindra Bank, IndusInd Bank, Federal Bank and HSBC
अधिकृत माहिती : UPI 2.0

थोड्या कालावधीनंतर आणखी बॅंक्स जोडल्या जातील! नोटबंदीनंतर खरेतर पेटीएम ऐवजी BHIM किंवा UPI च्या इतर पद्धती प्रसिद्ध व्हायला हव्या होत्या मात्र आता परिस्थिती अशी आहे कि UPI पेक्षा पेटीएमचे QR कोड दुकानात लावलेले दिसतात. आता पेटीएम पेमेंट्स बँकद्वारेही UPI मार्फत व्यवहार करता येतात! तरीही गेल्या दोन वर्षात UPI ला मिळणार प्रतिसाद पाहता येत्या काळात कमी रकमेचे जास्तीतजास्त व्यवहार यूपीआयद्वारे पार पाडले जातील असं चित्र दिसत आहे !  BHIM UPI द्वारे जुलै २०१८ मध्ये ४५८४५ कोटी रुपयांचे व्यवहार पार पडल्याचं सांगण्यात आलं आहे.

यावेळी श्री. नंदन निलेकणी (इन्फोसिस) , श्री.उर्जित पटेल (आरबीआय गव्हर्नर), श्री.रजनीश कुमार (एसबीआय प्रमुख), श्री.बिस्वमोहन महापात्रा (NPCI अध्यक्ष) उपस्थित होते.

संदर्भ लेख :

  • UPI यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?
  • यूपीआय कसे वापरायचे फोनपे अॅपसोबत याबद्दल मराठीमध्ये व्हीडीओ
  • भीम अॅप कसे वापरायचे ? याबद्दल मराठीमध्ये व्हीडीओ

search terms : upi 2.0 launched by NCPI information in marathi

ADVERTISEMENT
Tags: AppsBankingBHIMMobile BankingPaymentsUPI
ShareTweetSend
Previous Post

डिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार !

Next Post

अॅमेझॉन अलेक्सा असिस्टंटला आता मराठी भाषासुद्धा समजेल!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Instagram 90 Second Reel Stickers

इंस्टाग्रामवर आता ९० सेकंदांच्या रील्स बनवता येणार : सोबत अनेक नव्या सोयी!

June 3, 2022
Instagram New Logo

इंन्स्टाग्रामचा नवा लोगो, नवा फॉन्ट आणि इतर डिझाईनमध्ये काही नव्या गोष्टी!

May 25, 2022
WhatsApp Reactions

व्हॉट्सॲप मेसेजेसला रिॲक्शन्स देण्याची सोय उपलब्ध !

May 5, 2022
Next Post
अॅमेझॉन अलेक्सा असिस्टंटला आता मराठी भाषासुद्धा समजेल!

अॅमेझॉन अलेक्सा असिस्टंटला आता मराठी भाषासुद्धा समजेल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Xbox Games Showcase

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

June 13, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

ॲपल WWDC 2022 : iOS 16, iPadOS 16, macOS Ventura अपडेट्स सादर

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!