MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टेलिकॉम

रिलायन्स जिओ प्राइम जाहीर, ३१ मार्चनंतरच्या जिओबद्दल

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 21, 2017
in टेलिकॉम
Mukesh Ambani Announces Jio Prime Offer  

गेल्या वर्षी ५ सप्टेंबरपासून सुरू असलेली रिलायन्स जिओची सेवा आजतागायत मोफत उपलब्ध होती. या कालावधीत १७० दिवसात जिओच्या नेटवर्कमध्ये तब्बल 100 Million (१० कोटी) ग्राहक जोडले गेले आहेत. या सर्वांना इंटरनेट व वॉइस कॉल पूर्णतः मोफत पुरवण्यात येत होते. मात्र ३१ मार्च २०१७ पासून ह्यामध्ये बदल होऊन ग्राहकांना इंटरनेट डाटासाठी काही रक्कम मोजावी लागणार आहे. रिलायन्स जिओ प्रमुख मुकेश अंबानी यांनी जाहीर केलेल्या नव्या जिओ प्राइम या घोषणेबद्दल जाणून घ्या आजच्या या लेखामध्ये…

जिओच्या सध्याच्या ग्राहकांना व जे ग्राहक ३१ मार्च २०१७ पर्यंत नव्याने जिओ सुरू करतील (नवे ग्राहक). त्यांच्यासाठी ही जिओ प्राइम योजना सादर करण्यात आली आहे. म्हणजेच ३१ मार्च २०१७ पर्यंत जे काही ग्राहक जिओसोबत जोडले गेले असतील त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

ज्यांना सध्याची अनलिमिटेड ऑफर (हॅप्पी न्यू इयर ज्यामध्ये डाटा व कॉल फ्री आहेत) ही सुरू ठेवायची आहे त्यांना यासाठी रु. ९९ मोजावे लागतील, त्यानंतर त्यांना सध्याचीच ऑफर चालू प्लॅननुसार ३१ मार्च २०१८ पर्यंत वापरता येईल!  यासाठी नोंदणी MyJio App/जिओ स्टोअरमधून १ मार्च ते ३१ मार्च दरम्यान करता येईल.
या नोंदणीचे रु. ९९ व दरमहा रु ३०३ देऊन तुम्ही अनलिमिटेड इंटरनेट, वॉइस कॉल व जिओ अॅप्सची (जिओ म्यूजिक, Mags, Xpress, जिओटीव्ही) एक वर्ष पूर्णतः मोफत वापरू शकतील!  दरमहा रु ३०३ देऊन दरमहा 30GB डाटा हायस्पीड मिळेल व उरलेला डाटा कमी स्पीडमध्ये अमर्याद वापरता येईल.

म्हणजेच जिओ प्राइम या योजनेनुसार, तुम्हाला नोंदणीसाठी रु ९९ आणि अधिक प्रत्येक महिन्याला रु ३०३ देऊन इंटरनेट मोफत वापरता येईल. सध्या सुरू असलेल्या दर दिवशी 1GB 4G हायस्पीड डाटाचीच योजना वर्षभर सुरू ठेवण्यासाठी इतके पैसे मोजावे लागतील. दुसर्‍या शब्दात सांगायचं तर सध्याचीच ऑफर सुरू ठेवायला वर्षभर दरदिवशी रु १० मोजावे लागतील!

जिओ प्राइम ऑफर :
• नोंदणीसाठी रु ९९, नोंदणीसाठी मुदत १ मार्च ते ३१ मार्च 
• दरमहा रु ३०३ यामध्ये 30GB हायस्पीड डाटा, कॉल, जिओ अॅप्स मोफत  
• दररोज 1GB हायस्पीड डाटा त्यानंतर कमी वेगात अमर्यादीत डाटा   
• जिओ प्राइम नोंदणीनंतर ३१ मार्च २०१८ पर्यंत उपलब्ध!
• प्राइमसाठी नोंदणी करण्यासाठी ३१ मार्च २०१७ पर्यंत जे जिओच्या नेटवर्कवर आहेत त्यांनाच नोंदणी करता येईल. 

जे ह्या “जिओ प्राइम” योजनेत सहभागी होणार नाहीत त्यांना वॉइस कॉल मोफतच असतील मात्र इंटरनेटसाठी ते ग्राहक जो प्लॅन स्वीकारतील त्या प्लॅननुसार पैसे द्यावे लागतील.
प्लॅन्स साठी लिंक :  www.jio.com/en-in/4g-plans

अंबानी यांनी जाहिर केलेल्या इतर गोष्टी खालीलप्रमाणे :
• २०१७ च्या शेवटपर्यंत संपूर्ण भारतभर (सर्व खेडी, शहरं) जिओची सेवा उपलब्ध असेल!
• जिओ ग्राहकांनी १०० करोड जीबी डाटा दर महिन्याला इतका वापर केला आहे!
• ज्यामुळे भारत मोबाइल डाटा वापरमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर पोचला आहे!
• या योजना संपल्यावरसुद्धा जिओ सध्या इतर ऑपरेटर देत असलेल्या प्लॅनच्या किंमतीत २०% अधिक इंटरनेट डाटा देईल असही त्यांनी जाहीर केलं!

incoming search terms : reliance jio prime mukesh ambani internet data offer 

ADVERTISEMENT
Tags: 4GIndiaJioReliance
ShareTweetSend
Previous Post

CES 2017 मधील घडामोडी

Next Post

नोकिया 3 अँड्रॉइड स्मार्टफोनबद्दल

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Jio Game Controller

जियोचा गेम कंट्रोलर उपलब्ध : अँड्रॉइड फोन्सवर गेम्स खेळण्यासाठी उपयुक्त!

June 2, 2022
VPN India Policy

भारत सरकारचा VPN कंपन्यांना युजर्सचा डेटा साठवून त्याची माहिती देण्याचा आदेश!

May 5, 2022
YouTube India Economy

यूट्यूबर्समुळे भारताच्या GDP मध्ये ६८०० कोटींची भर : २०२० मधील आकडेवारी!

March 4, 2022
New Plans Jio Airtel Vi

एयरटेल, Vi नंतर जिओनेही प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या!

November 28, 2021
Next Post
नोकिया 3 अँड्रॉइड स्मार्टफोनबद्दल

नोकिया 3 अँड्रॉइड स्मार्टफोनबद्दल

Comments 1

  1. Learn Digital Marketing says:
    5 years ago

    Very informative, keep posting such good articles, it really helps to know about things.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

July 4, 2022
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

July 4, 2022
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!