CES २०१८ मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) हा इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान जगातला सर्वात मोठा कार्यक्रम ९ जानेवारीपासून सुरू होत आहे ! या वर्षीचा CES कार्यक्रम लास वेगास मध्ये भरला असून नेहमीप्रमाणे सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये  आपापली उत्पादने सादर करण्यासाठी जोरात स्पर्धा दिसून येत आहे...

यावर्षी ओलेड टीव्ही, वॉइस असिस्टंट नवे लॅपटॉप्स, कार्स, स्मार्ट डिवाइसेस, व्हीआर यांची रेलचेल असणार आहे! अनेक कंपन्या आणि त्यांची यावर्षी व भविष्यातील वाटचाल या कार्यक्रमात दिसून येते... या शो मध्ये सादर होणारी काही खास प्रोडक्टस आणि आपल्या आवडीचे काही खास ब्रॅंड (गूगल, सोनी, एलजी, सॅमसंग, एनव्हीडिया, लेनेवो, एचपी, डेल, पॅनासॉनिक, ZTE, इ.) यावर्षी कोणती उत्पादने घेऊन आले आहेत ते पाहूया ....

यातील कंपन्या आधीच प्रॉडक्ट आधीच जाहीर करून पाहण्यासाठी उपलब्ध करून देतात.

एएमडी (AMD) : या प्रसिद्ध प्रोसेसर कंपनीने त्यांच्या रायझन (Ryzen) प्रोसेसर मालिकेला मिळालेल्या मोठ्या यशानंतर यांच्या २०१८ साठी नव्या आवृत्या सादर केल्या आहेत! CPU, GPU, APU अशा सर्व प्रकारच्या उत्पादनांची घोषणा यावेळी केली. 2nd-gen Threadripper, Ryzen Mobile APUs, Zen+, Zen 2, Zen 3 प्रोसेसर आणि next-generation 7nm (and 7 nm+) Vega GPU
एलजी (LG) : एलजीने टीव्ही संबंधित संशोधनात मोठी आघाडी घेतली असून गेल्यावर्षी सादर केलेला वॉलपेपर टीव्ही चर्चेचा विषय ठरला होता. यावर्षी त्यांनी चक्क ८८ इंची 8K रिजोल्युशन (FullHD च्या आठपट!) असलेला ओलेड टीव्ही सादर केलाय! यासोबत चक्क कागदासारखा गुंडाळता येणारा ६५ इंची OLED टीव्ही सादर केला आहे! कंपनीने सादर केली आहे ओएलईडी LG Canyon! गुंडाळता येणार्‍या डिस्प्ले तंत्रावर आधारित खिंड सीईएसमध्ये उभी केली आहे! गेल्यावर्षीही अशाच प्रकारची भन्नाट गुहा उभी करण्यात आली होती!
Samsung The Wall TV
सॅमसंग (Samsung) :  सॅमसंग बऱ्याच प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन करत असल्याने त्यांच्या विविध प्रकारच्या संशोधनाची पाहणाऱ्यांमध्ये उत्सुकता असते. यावेळी त्यांनी सुरुवातीलाच १४६ इंची The Wall नावाचा टीव्ही सादर केला आहे! हा पहिला microLED टीव्ही असून यामुळे विजेची बचत होते व टीव्हीचा आकारही कमी राहतो! हा अवाढव्य टीव्ही जवळपास भिंत व्यापून टाकतो!
सोनी (Sony) : सोनीसुद्धा दरवर्षी भन्नाट उत्पादने सादर करत असतं. आज त्यांनी सोनी एक्सपिरीया XA2 सादर केला आहे. सर्व कंपन्या कडा नसलेले Bezelless फोन्स सादर करत असताना त्या प्रकारचा सोनीचा अद्याप एकही फोन सादर झालेला नाही! सोबत एक्सपिरीया L2 सुद्धा सादर झाला आहे.

अॅमेझॉन (Amazon) : यांनी त्यांच्या अलेक्सा या वॉइस असिस्टंटला अधिक ठिकाणी उपलब्ध करून देण्याबाबत सांगताना अलेक्सा आता विंडोज १० असलेल्या पीसीवर कोर्टाना सोबत उपलब्ध होईल असं घोषित केलं आहे!

वॅकम (Wacom) : वॅकमने सादर केला आहे सिंटीक प्रो ३२ इंची ग्राफिक्स टॅब्लेट!
ग्राफिक्स तयार करणार्‍या यूजरसाठी मोठ्या स्क्रीनचा उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला असून सोबत २४ इंची मॉडलसुद्धा सादर करण्यात आलं आहे! किंमत ३२ इंची : $3,300 आणि २४ इंची : $2,000

हा लेख सीईएस संपेपर्यंत अपडेट केला जात राहील त्यामुळे आमच्या वेबसाइटला रोज भेट द्यायला विसरू नका. आमच्या फेसबुक पेजला लाइक केलं नसल्यास नक्की करा. 

search terms : ces 2018 marathi tech news technology updates consumer electronics show
CES २०१८ मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा CES २०१८ मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा Reviewed by Sooraj Bagal on January 08, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.