सीईएस २०१८ मधील खास लॅपटॉप्स, टॅब्लेट्स

Lenovo Miix 630
कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) या इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान जगातला सर्वात मोठा कार्यक्रमामध्ये झालेले काही खास लॅपटॉप. लॅपटॉपमध्ये फार काही नावीन्य नसलं तरी ग्राहकांना कमी आकारात अधिकाधिक सोयी देण्याचा प्रयत्न यावेळी दिसून येत आहे.
एसर स्विफ्ट ७ Acer Swift 7 : एसर कंपनीने पुन्हा एकदा जगातला सर्वात पातळ लॅपटॉप सादर केला आहे!
याची जाडी केवळ 8.98mm असून किंमत $1,699 (१,०८,०००) असेल. यामध्ये टचस्क्रिन असलेला एचडी डिस्प्ले, इंटेल Core i7 प्रोसेसर, विंडोज हॅलो, USB 3.1, 512GB SSD,   आणि 4G LTE सुद्धा आहे!
Razer Project Linda 
रेझर लॅपटॉप : रेझर या कंपनीचा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी सादर झाला होता. त्या फोनला असं भन्नाट रूप देत फोनचा लॅपटॉप बनवता येईल! या लॅपटॉपला स्वतः म्हणून काही नसलं तरी यामध्ये USB पोर्ट्स देण्यात आले आहेत बाकी सर्व काही रेझर फोनच्या हार्डवेअरवर चालेल! टचपॅडच्या जागी हा फोन बसवता येईल त्यानंतर फोनचा डिस्प्ले आणि लॅपटॉपचा डिस्प्ले Sync होऊन फोन लॅपटॉप प्रमाणे वापरता येईल!

Dell XPS 15 
Dell XPS 15 : डेलचा हा १५.६ इंची 4K रेजोल्यूशन डिस्प्ले असलेला हा 2 in 1 लॅपटॉप आहे! यावर डेलचा नवा ऍक्टिव्ह पेन स्टायलससुद्धा वापरता येईल. यामध्ये Intel 8th-gen core i5 आणि i7 प्रोसेसर सोबत with Radeon RX Vega M GL (4GB)ग्राफिक्स कार्ड, 16GB RAM आणि 1TB SSD मिळेल. याची किंमत $1,299 (~रु ८२७००).

लेनोवो मिक्स ६३० Lenovo Miix 630 : लेनोवोचा हा नवा टॅबलेट स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर असलेला उत्तम टॅबलेट आहे. Snapdragon 835 हा प्रोसेसर शक्यतो स्मार्टफोन्समध्ये वापरला जातो. मात्र आता बऱ्याच कंपन्या स्नॅपड्रॅगन आधारित प्रोसेसर लॅपटॉप, टॅब्लेट्समध्ये जोडत आहेत!  या टॅबलेटमध्ये 12.3-inch WUXGA+ डिस्प्ले, USB-C पोर्ट , 4/8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे सोबत विंडोज हॅलो सपोर्ट, २० तास चालेल इतकं बॅटरी लाईफ आणि 4G LTE सुद्धा आहे!

CES मध्ये सादर झालेले इतर उत्तम लॅपटॉप Dell XPS 13 9370, HP Envy x2, Lenovo ThinkPad X1 Carbon, Acer Nitro 5 Gaming, MSI GE63 Raider RGB Edition 
सीईएस २०१८ मधील खास लॅपटॉप्स, टॅब्लेट्स सीईएस २०१८ मधील खास लॅपटॉप्स, टॅब्लेट्स Reviewed by Sooraj Bagal on January 12, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.