MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

गिटहब(GitHub) या कोड शेरिंग वेबसाइटचं मायक्रोसॉफ्टकडून अधिग्रहण! :

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 4, 2018
in News

गिटहब बाबत सुरु असलेल्या  गेल्या काही आठवड्यांच्या चर्चेनंतर आज अधिकृतरीत्या  त्यांचं मायक्रोसॉफ्टने अधिग्रहण केल्याचं जाहीर केलं! गिटहब ही git म्हणजे व्हर्जन कंट्रोल सिस्टिम आधारित कोड शेअरिंग वर काम करणारी वेबसाइट आहे. अनेक डेव्हलपर्स त्यांचे प्रोजेक्ट GitHub द्वारे जगासमोर ठेवत असतात. यामध्ये ओपन सोर्स सॉफ्टवेअरची संख्या मोठी आहे. या साईटवर एकमेकांचे कोड पाहत एकाच वेळी अनेकांना एका प्रोजेक्टवर काम करता येतं. यासाठीच हा सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म प्रसिद्ध आहे. या अधिग्रहणाची किंमत मायक्रोसॉफ्टच्या स्टॉक्सद्वारे $7.5 billion (₹ ५०३ अब्ज रुपये!) असून गिटहबच २०१५ मध्ये व्हॅल्यू $2 billion इतक होत.

पूर्वीचे झामारीन (Xamarin) सीईओ नॅट फ्रिडमन (सध्याचे मायक्रोसॉफ्ट वॉइस प्रेसिडेंट) गिटहबचे नवे सीईओ असतील.  गिटहबचे संस्थापक क्रिस वॅनस्ट्राथ मायक्रोसॉफ्ट Technical fellow बनतील.

ADVERTISEMENT

गिटहबवर मार्च २०१८ पर्यंत  २.८ कोटी डेव्हलपर्स आहेत आणि ८.५ कोटी कोड Repository आहेत! यामुळेच ही सोर्स कोड असलेली सर्वात मोठी वेबसाइट आहे मायक्रोसॉफ्टच्या या सहभागामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात डेव्हलपर्स नाराज आहेत. काहींनी तर GitLab सारखे इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. मायक्रोसॉफ्टने यापूर्वी हॉटमेल, माईनक्राफ्ट, स्काईप, लिंक्डइन अशा सेवांचं अधिग्रहण केलं आहे!   

या अधिग्रहणाबद्दल मायक्रोसॉफ्ट प्रमुख सत्या नाडेला यांचं ट्विट :

Microsoft + GitHub = Empowering Developers https://t.co/KqLacgODdk

— Satya Nadella (@satyanadella) June 4, 2018

Tags: AcquisitionCodeGitGitHubMicrosoftProgramming
Share15TweetSend
Previous Post

गूगलचं नवं अॅप नेबरली (Neighbourly) : विविध ठिकाणच्या खास गोष्टींबद्दल लोकांची प्रश्नोत्तरे

Next Post

अॅपल WWDC २०१८ : iOS 12, macOS Mojave अपडेट जाहीर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
Next Post
अॅपल WWDC २०१८ : iOS 12, macOS Mojave अपडेट जाहीर!

अॅपल WWDC २०१८ : iOS 12, macOS Mojave अपडेट जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech