सॅमसंग गॅलक्सी ऑन ८ सादर : मध्यम किंमतीच्या फोन्सला आणखी एक पर्याय!

सॅमसंगच्या Galaxy On मालिकेमध्ये Galaxy On 8 हा नवीन फोन सादर  केला असून तो फ्लिपकार्टवर 6 August पासून उपलब्ध होईल. मध्यम किंमतीच्या फोन्समध्ये चिनी कंपन्यानी घेतलेल्या आघाडीमुळे सॅमसंगला या किंमतीच्या फोन्सच्या बाजारात थांबणं सध्या अवघड होत चाललं आहे. याला ते स्वतः जबाबदार असून इतर ब्रँड्सच्या स्वस्त किंमतीत अधिक सोयी मिळत असताना ग्राहक सॅमसंगकडे केवळ ब्रँडसाठीच वळत आहेत. तसेच फोन विक्रीनंतर सॅमसंगकडून अँड्रॉइड अपडेट्स सुद्धा पुरवले जात नसल्यामुळे ग्राहकांच्या निराशेत वाढ होत आहे. 

Galaxy On 8 Specifications 
डिस्प्ले : 15.36cm (6") (720 x 1480 Pixels) HD+ sAMOLED (18.5:9 Infinity Display)
कॅमेरा : Rear 16MP (F1.7) + 5MP (F1.9)
            Front 16MP (F1.9) LED Flash
प्रोसेसर : Snapdragon 450
रॅम : 4GB  स्टोरेज : 64GB
ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉइड ओरीओ (8.0)
बॅटरी : 3500mAh
इतर : सॅमसंग पे मिनी, My  Galaxy व्हिडिओ
किंमत : ₹१६,९९०
लिंक - Galaxy On 8Samsung Shop On8


तेवढ्याच (खरंतर त्याहून कमीच) किमतीत दर्जेदार प्रोसेसर, अँड्रॉइड अपडेट्स, गरजेचे सेन्सर ग्राहकांना मिळत असताना अशा फोन्स कडे ग्राहकांनी पाठ फिरवल्यास कुतूहल वाटायला नको. सॅमसंग गॅलक्सी ऑन ८ ची टक्कर शायोमीचा MI A2 , Honor 9N सारख्या फोन्स सोबत असेल.

सॅमसंग गॅलक्सी ऑन ८ सादर : मध्यम किंमतीच्या फोन्सला आणखी एक पर्याय! सॅमसंग गॅलक्सी ऑन ८ सादर : मध्यम किंमतीच्या फोन्सला आणखी एक पर्याय! Reviewed by Swapnil Bhoite on August 02, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.