MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

गूगलचं पालकांसाठी नवं फॅमिली लिंक अॅप : मुलांच्या ऑनलाइन वेळेवर लक्ष ठेवणं सोपं!

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
September 21, 2018
in ॲप्स

मागील वर्षी गूगल तर्फे सादर करण्यात आलेले फॅमिली लिंक फॉर पेरेंट्स अॅप आता भारतात उपलब्ध झाले आहे. मुलांना मोबाईल किती वेळ वापरता येईल, कोणते ॲप इन्स्टॉल करता येतील त्याचबरोबर आपल्या पाल्याचा मोबाईल झोपण्याच्या वेळे दरम्यान लॉक करणे, मोबाईल वापरासाठी ठराविक वेळेचे बंधन लावणे यांसारख्या सुविधांचा यामध्ये समावेश आहे. मोबाईलचे लोकेशन तसेच मुलांनी कोणत्या अॅपवर किती वेळ घालवला आहे अशा गोष्टी सुद्धा याद्वारे समजणार आहेत.

प्रथम पुढील लिंक वरून आपणास फॅमिली लिंक फोर पेरेंट्स हे ॲप डाउनलोड करावे लागेल. यानंतर साइन अप करताना जर आपल्या पाल्याचे गूगल अकाउंट नसेल तर ते उघडावे लागेल. अकाउंट उघडण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही स्टेप्स पार पाडाव्या लागतील व यानंतर फॅमिली लिंक आपोआपच पाल्याच्या मोबाईलवर डाऊनलोड केले जाईल. फॅमिली लिंक ॲप वापरण्यासाठी पाल्याच्या मोबाईलमध्ये नुगट व त्यापुढील अँड्रॉइड व्हर्जन असणे आवश्यक आहे. तसेच लॉलीपॉप व मार्शमेलो  व्हर्जनवर वापरण्यासाठी हेल्प सेंटर मधील माहिती पाहू शकता.

ADVERTISEMENT

फॅमिली लिंक ॲपच्या माध्यमातून खालील गोष्टी करता येतील :-

  • स्क्रीन टाईम त्याचबरोबर बेडटाइमची वेळ ठरवणे. 
  • आपल्याकडील ॲपच्या माध्यमातून डिवाइस लॉक करणे. 
  • पाल्याचे लोकेशन जाणून घेणे. 
  • ऍक्टिव्हिटी रिपोर्ट पाहणे यामध्ये आवडत्या अॅपवर किती वेळ गेला आहे हे समजेल. 
  • एखादे ॲप डाऊनलोड करण्यासाठी अनुमती देणे किंवा नको असलेले ब्लॉक करणे.
  • एखादे शैक्षणिक ॲप सुचवणे

टेक्नॉलॉजीचा योग्य वापर पाल्यांकडून व्हावा त्याचबरोबर अतिवापर सुद्धा होऊ नये यासाठी अनेक पालक आग्रही असतात त्यासाठीच आम्ही फॅमिली लिंक हे ॲप सादर केले आहे जेणेकरून मुलांनी टेक्नॉलॉजीचा वापर करताना त्यावर नियंत्रण सुद्धा ठेवता येईल असे गुगल तर्फे सांगण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून पूर्णपणे नियंत्रण ठेवता येत नसले तरीसुद्धा काही कारणास्तव मुलांना द्याव्या लागणाऱ्या मोबाइल वापरावरील नियंत्रणासाठी याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. भारतासोबतच इतर अनेक देशांत सुद्धा हे अॅप उपलब्ध असेल.

फॅमिली लिंक बद्दल आणखी माहितीसाठी – https://families.google.com/familylink/

अधिकृत माहिती : Helping more families set digital ground rules with Family Link
Tags: AppsDigital WellbeingFamilyFamily LinkGoogleParents
Share12TweetSend
Previous Post

आता फ्लिपकार्टची ग्राहकांसाठी कार्डलेस क्रेडिट योजना सादर!

Next Post

जिओ टीव्हीवर पुढील पाच वर्षे भारताचे क्रिकेट सामने मोफत पाहता येणार!

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Google Willow Quantum Chip

गूगलची Willow Quantum चिप : क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये नवा अध्याय!

December 22, 2024
Next Post
जिओ टीव्हीवर पुढील पाच वर्षे भारताचे क्रिकेट सामने मोफत पाहता येणार!

जिओ टीव्हीवर पुढील पाच वर्षे भारताचे क्रिकेट सामने मोफत पाहता येणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech