अडोबी फोटोशॉप लवकरच आयपॅडवर उपलब्ध!


जगात सर्वत्र वापरलं जाणार फोटो एडिटिंग टूल म्हणजे अडोबीचं फोटोशॉप! सध्या फोन, टॅब्लेट सारख्या उपकरणांवर अॅप स्वरूपात उपलब्ध असलेलं फोटोशॉप आता डेस्कटॉप व्हर्जनच्या सोयी असलेलं फोटोशॉप आयपॅडवर उपलब्ध करून देत आहे! २०१९ मध्ये हे सादर होईल.

रिअल फोटोशॉप अशा भाषेत डेस्कटॉप आणि फोनमधील फरक दर्शवला जातो कारण अॅपस्वरूपात असलेल फोटोशॉप डेस्कटॉपच्या मानाने खूपच कमी सोयी असलेलं आहे आणि येत्या काळातसुद्धा पूर्णपणे डेस्कटॉपची ताकद असलेलं फोटोशॉप उपलब्ध होईल अशी शक्यता नाही. सध्या या नव्या आयपॅडसाठीच्या फोटोशॉपची चाचणी (Beta) सुरु असून २०१९ मध्ये हे उपलब्ध होईल!

अडोबीच्या या नव्या फोटोशॉप फॉर आयपॅडमुळे .psd फाईल्स सुद्धा एडिट करता येणार आहेत! अॅपलने अलीकडे आणलेल्या आयपॅडला असलेला अॅपल पेन्सिलचा सपोर्ट एडिटिंगसाठी मोठा फायद्याचा ठरेल. सध्या मायक्रोसॉफ्टच्या सर्फेस टॅब्लेट्समध्ये रिअल फोटोशॉप वापरता येतं.

Image Source : The Verge
आता आयपॅडवर सुद्धा फुल फोटोशॉप उपलब्ध झाल्यावर फक्त अँड्रॉइड असा एकाच प्लॅटफॉर्म असेल ज्यावर फुल फोटोशॉप उपलब्ध नाही! उर्वरित विंडोज, मॅक, iOS (for iPad) अशा सर्व ठिकाणी आता हे भन्नाट इमेज एडिटिंग टूल उपलब्ध होत आहे.  Get Photoshop CC: http://adobe.ly/10ekpOA       


यासोबत त्यांनी डेस्कटॉप फॉटोशॉपमध्येसुद्धा काही नव्या सोयी जोडल्या असून सीमेट्री असलेल्या गोष्टी ड्रॉ करण्यासाठी, मंडल तयार करण्यासाठी Paint Symmetry Options यांचा सहज उपयोग होईल!  

search terms :: adobe photoshop for ipad is releasing soon in 2019, beta launched
अडोबी फोटोशॉप लवकरच आयपॅडवर उपलब्ध! अडोबी फोटोशॉप लवकरच आयपॅडवर उपलब्ध!  Reviewed by Sooraj Bagal on October 15, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.