अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचे दिवाळीनिमित्त परत सेल...!


अॅमेझॉन आणि  फ्लिपकार्टतर्फे काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या सेल नंतर पुन्हा एकदा नवीन सेल दिवाळीच्या मुहूर्तावर चालू झाला आहे. मागील ३० दिवसांमध्ये हा तिसरा सेल या दोन्ही वेबसाईटतर्फे सादर करण्यात आला आहे.  फ्लिपकार्टवर १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत तर अॅमेझॉनवर २ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. फ्लिपकार्टने SBI तर अॅमेझॉनने HDFC Bank ग्राहकांना १०% अतिरिक्त सूट देत असल्याचं जाहीर केलं आहे! याबरोबरच इतर प्रॉडक्ट्सवर सुद्धा अनेक ऑफर्स पाहायला मिळतील, खासकरून मोबाइलवर अधिकचे डिस्काउंट दोन्ही वेबसाईटतर्फे देण्यात आले आहेत.
ग्रेट इंडियन फेस्टिवल ऑफर्स : Amazon Great Indian Festival 
आता प्रमुख ऑफर्सबद्दल पाहूया :

  • HDFC क्रेडिट व डेबिट कार्ड धारकांना या सेलदरम्यान केलेल्या प्रत्येक खरेदीवर मिळालेल्या डिस्काउंट सोबत १०% अतिरिक्त सूट मिळेल. यासाठी HDFC क्रेडिट व डेबिट कार्ड द्वारे खरेदी करणे आवश्यक असेल. 
  • अॅमेझॉन पेच्या रूपात १०% पर्यंत अधिकचा कॅशबॅक! (कमीतकमी ₹५०००ची खरेदी आवश्यक)
  • २ नोव्हेंबर रोजी ५०० पेक्षा अधिक खरेदी केल्यास रिचार्ज, बुक माय शो, स्विगीवर १००% कॅशबॅक मिळेल.. 
  • अॅमेझॉन प्राइम ग्राहकांसाठी प्राईम रिवॉर्ड्स योजना जाहीर करण्यात आली असून अॅमेझॉन पे मध्ये १००० ऑटो बॅलन्स ठेवल्यास अतिरिक्त २% कॅशबॅक मिळेल!

फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल ऑफर्स : Flipkart Big Diwali Sale 2018
आता प्रमुख ऑफर्सबद्दल पाहूया :

  • सर्व SBI कार्ड धारकांना या सेलदरम्यान केलेल्या प्रत्येक खरेदीवर मिळालेल्या डिस्काउंट सोबत १०% अतिरिक्त सूट मिळेल. यासाठी SBI क्रेडिट कार्ड द्वारे खरेदी करणे आवश्यक असेल. 
  • SBI ची खरेदीच्या १०% सूट  (एकूण सूट ₹ ४००० + ₹ ४००० पर्यंतच) 
  • फोनपे या UPI अॅपद्वारे खरेदी केल्यास १०% कॅशबॅक (अधिकतम ₹ १००)
  • एसूसच्या झेनफोन, नोकिया, शायोमी, ओप्पो, मोटोरोला, लेनोवो स्मार्टफोन्सवर सूट! भन्नाट डील्स!
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचे दिवाळीनिमित्त परत सेल...! अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचे दिवाळीनिमित्त परत सेल...!  Reviewed by Swapnil Bhoite on November 01, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.