MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #3

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
November 4, 2018
in ॲप्स

उपयोगी अॅप्स मालिकेतील तिसऱ्या भागामध्ये आपण आणखी काही उपयुक्त अॅप्स पाहणार आहोत. यामध्ये पॉडकास्ट, नोट्स, स्क्रीन शेअर, म्युझिक प्लेअर सारख्या अॅप्सचा समावेश आहे. आम्ही दिलेल्या अॅप्सना तुमच्या विशिष्ट गरजेनुसार आणखी चांगले पर्याय सुद्धा उपलब्ध असू शकतात त्याचा सुद्धा आपण शोध घेऊ शकता. आपल्या प्रतिक्रियांसोबतच जर आपणास कोणते अॅप या लेखामध्ये सुचवायचे असेल तर आम्हाला अवश्य कळवा.

Podcast Apps –  मोकळ्या वेळेमध्ये असो की काही काम करत असताना आपण म्युझिक/रेडिओ ऐकणे, पुस्तके वाचणे अशा गोष्टी करत असतोच. परंतु आपणास याव्यतिरिक्त काही नवीन हवे असल्यास पॉडकास्ट अॅप्स नक्कीच फायद्याचे ठरतात.  पॉडकास्ट अॅप्स म्हणजे विविध कार्यक्रम (ऑडिओ स्वरूपात) जसे की न्युज, मनोरंजक त्याचबरोबर माहितीपर कार्यक्रम उपलब्ध करून देणारे अॅप्स. पॉडकास्ट अॅप्सच्या मदतीने आपण फक्त मनोरंजकच नाही तर माहितीपर, शैक्षणिक प्रकारातील विविध कार्यक्रम ऐकू शकतो. यासाठी अनेक अॅप्स उपलब्ध असून आपणास आवडणारे अॅप घेऊन यूट्यूबवर ज्यापद्धतीने आपण चॅनेल शोधून सबस्क्रायबर्स करतो त्याचप्रमाणे पॉडकास्ट अॅप्स वापरता येतात.पॉडकास्ट अॅप्सवर इंग्रजी कॉन्टेट खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून टेड टॉक, BBC, इकॉनॉमिस्ट पासून अनेक भारतीय चॅनल सुद्धा उपलब्ध आहेत. तर मराठीमध्ये सध्या राहुल देशपांडे, स्टोरीटेल कट्टा इत्यादींचेच चॅनेल आहेत. आपण कोणत्याही पॉडकास्ट अॅपवरुन आपल्या आवडीचे कार्यक्रम ऐकू शकता. खाली आम्ही काही चांगले फ़ी अॅप्स दिले असून पॉकेट कास्ट म्हणून पेड अॅप सुद्धा उत्तम आहे.
डाउनलोड लिंक –  Podcast Player / Google Podcast / Castbox / Pocket Cast 

Microsoft OneNote – मायक्रोसॉफ्टतर्फे उपलब्ध असणारे वन नोट हे अॅप फक्त नोट्स ठेवण्यासाठीच नाही तर आपण विविध प्रोजेक्टवर याद्वारे काम करू शकतो. वन नोट हे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा भाग असून मोबाइल अॅपद्वारे आपण सहजपणे अनेक गोष्टींवर काम करू शकता. लॅपटॉप/डेस्कटॉपवर मायक्रोसॉफ्टतर्फे मोफत उपलब्ध असल्याकारणाने दोन्हीच्या माध्यमातून प्रोडूक्टिव्हिटी वाढण्यास चांगलीच मदत होते. वन नोटद्वारे नवीन नोटबुक/प्रोजेक्ट करणे त्यामध्ये विविध उपप्रकार आणण्यापासून फोटो, ग्राफ, आकृत्या सुद्धा जोडता येतात. आपण सेव्ह केलेल्या डेटामधील माहिती शोधण्याचा पर्यायसुद्धा यामध्ये उपलब्ध आहेच.
डाउनलोड लिंक – Microsoft OneNote Mobile App & Laptop/Desktop

TeamViewer for Remote Control – आपल्या मोबाइलवरून कोणताही लॅपटॉप/डेस्कटॉपवर त्याचबरोबर मोबाइल कंट्रोल करण्यासाठी हे एक उत्तम अॅप आहे. या अॅपच्या मदतीने सहजरित्या कोणत्याही गोष्टीबद्दल आपण सपोर्ट देऊ शकतो. त्याचबरोबर यामध्ये फाईल ट्रान्सफर, चॅट सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. डेस्कटॉपसाठी हे अॅप खूपच प्रसिद्ध असून मोबाइल अॅपच्या माध्यमातूनही अनेक सुविधा आपणासाठी उपलब्ध आहेत. अॅप वापरण्यासाठी आपल्या लॅपटॉप/डेस्कटॉपवर किंवा मोबाइल कंट्रोल करायचा असल्यास तिथे सुद्धा हे अॅप असणे आवश्यक असून एकदा लॉगिन ID व पासवर्ड टाकल्यानंतर आपण सहजपणे इतर डीव्हाइस कंट्रोल करू शकतो.
डाउनलोड लिंक – TeamViewer for Remote Control  / Laptop/Desktop

Retro Music – अनेकांच्या मोबाईलमध्ये ऑफलाईन म्युझिक फाइल्स उपलब्ध असतात त्यासाठीच रेट्रो म्युझिक अॅप  उत्तम पर्याय आहे. हे अॅप मटेरियल डिझाईन मध्ये असून याचा इंटरफेस सुद्धा अतिशय उत्तम आहे. Gapless playback, Sleep Timer, Lockscreen Playback Controls सारख्या विविध सोयी यामध्ये उपलब्ध असून ऑफलाईन मीडिया फाइल्स ऐकण्यासाठी हे अॅप एक उत्तम पर्याय देते.
डाउनलोड लिंक – Retro Music

ADVERTISEMENT
Tags: AppMitraAppsMusic PlayersOneNotePodcastTeamViewer
Share23TweetSend
Previous Post

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचे दिवाळीनिमित्त परत सेल…!

Next Post

व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजला आता प्रायव्हेट रिप्लायची सोय!

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

WhatsApp Edit Message

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

May 25, 2023
WhatsApp Chat Lock

आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

May 16, 2023
ॲपल Final Cut Pro व Logic Pro आता आयपॅडवर!

ॲपल Final Cut Pro व Logic Pro आता आयपॅडवर!

May 10, 2023
एकच व्हॉट्सॲप नंबर आता अनेक फोन्सवर वापरता येणार!

एकच व्हॉट्सॲप नंबर आता अनेक फोन्सवर वापरता येणार!

April 26, 2023
Next Post
व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजला आता प्रायव्हेट रिप्लायची सोय!

व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजला आता प्रायव्हेट रिप्लायची सोय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

May 29, 2023
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023
Moto Edge 40

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

May 25, 2023
WhatsApp Edit Message

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

May 25, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
WhatsApp Chat Lock

आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

May 16, 2023
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

May 29, 2023
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

लावा या भारतीय कंपनीचा AGNI 2 5G स्मार्टफोन सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!