MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

शायोमी रेडमी Note 6 Pro सादर : एकूण चार कॅमेरा असलेला फोन!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 22, 2018
in स्मार्टफोन्स

शायोमीची रेडमी नोट मालिकेमधील फोन्स हे अलीकडे भारतात सर्वात लोकप्रिय फोन्स आहेत. यांनी विक्रीमध्ये गेली तीन चार वर्षे आघाडीवर राहत असून स्वस्त किंमतीत उत्तम सुविधा देऊन नंतर सर्व्हिस बाबतसुद्धा इतरांच्या मानाने चांगलं काम केल्यामुळे त्यांना एव्हढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळत असल्याचं दिसत आहे. आता या प्रसिद्ध नोट मालिकेतल्या Redmi Note 5 Pro ची पुढची आवृत्ती Note 6 Pro आज सादर करण्यात आली आहे! यामध्ये मोठ्या डिस्प्लेसह आणखी सुधारणा करून फोटोग्राफीला समोर ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. कालच शायोमीने देशभरात ५०० ऑफलाईन दुकाने सुरु करत असल्याची घोषणा केली होती.

यामध्ये फ्रंट कॅमेरात मुख्य 20MP कॅमेरा सोबत 2MP डेप्थ कॅमेरा जोडला असून AI च्या साहाय्याने आता आणखी सुंदर (!) सेल्फी काढता येतील! AI Portrait 2.0, Light Trails, Studio Lighting, Adjustable bokeh अशा सॉफ्टवेअर सुविधा जोडण्यात आल्या असून इतरांच्या मानाने  Note 6 Pro अधिक चांगल्या प्रकारे फोटो काढेल असा दावा शायोमीने केला आहे. हा फोन ड्युअल सिम ड्युअल VoLTE असल्यामुळे दोन्ही सिममध्ये 4G कॉलिंगची सुविधा वापरता येईल. इतर कंपन्या नॉच लहान करण्याच्या प्रयत्नात असताना यांनी एव्हढा मोठा नॉच मात्र आहे तसाच ठेवला आहे. सोबत Type C ऐवजी जुनाच Micro USB पोर्ट दिला आहे. हेडफोन जॅक मात्र अजूनही आहे! प्रोसेसरसुद्धा Snapdragon 636 जुनाच पुन्हा जोडण्यात आल्यामुळे काही प्रमाणात यूजर्सना नाराज करणार आहे. हा फोन २३ नोव्हेंबरपासून उपलब्ध होत आहे.

ADVERTISEMENT

Redmi Note 6 Pro Specs :
डिस्प्ले : 6.26 inch 19:9 Full Screen 2280×1080 FHD+, 403 PPI
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 636 with Adreno 509 GPU
रॅम : 3GB/4GB
स्टोरेज : 32GB/64GB
बॅटरी : 4000mAh with Quick Charge 3.0
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 10
कॅमेरा : 12MP + 5MP AI dual camera, f/1.9+f/2.2, EIS, Dynamic Bokeh, AI Portrait 2.0, Light Trails, Studio Lighting, Adjustable bokeh
फ्रंट कॅमेरा : 20MP + 2MP front camera,  f/2.0+f/2.2, AI portrait selfie, Beautify 4.0
रंग : Blue, Black, Red, Rose Gold
सेन्सर : Rear fingerprint sensor, IR blaster, Gyroscope, Accelerometer, Distance sensor, Ambient light sensor, Electronic compass, Hall effect sensor
इतर : Bluetooth 5.0, 5G WiFi       
बॉक्समध्ये : Redmi Note 6 Pro / Power adapter / USB 2.0 cable / Warranty card / User guide / Clear soft case / SIM Insertion tool

किंमत : हा फोन फ्लिपकार्ट व Mi.com वर २३ नोव्हेंबर दुपारी १२ पासून उपलब्ध होईल. 
3GB+32GB ₹१३९९९
4GB+64GB ₹१५९९९

Tags: RedmiSmartphonesXiaomi
Share22TweetSend
Previous Post

स्विगी करणार २००० महिला ड्रायव्हर्सची नियुक्ती!

Next Post

एसुसचे TUF मालिकेतील नवे गेमिंग लॅपटॉप्स भारतात सादर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

October 6, 2022
Next Post
एसुसचे TUF मालिकेतील नवे गेमिंग लॅपटॉप्स भारतात सादर!

एसुसचे TUF मालिकेतील नवे गेमिंग लॅपटॉप्स भारतात सादर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!