MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टीव्ही

ट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम

चॅनल्स किंमती आणि ३१ जानेवारीनंतर काय?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 5, 2019
in टीव्ही

ट्राय या सरकारी संस्थेने डीटीएच व केबल ऑपरेटर्ससाठी नवे नियम लागू केले असून यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात महत्वाच्या असणार्‍या टीव्ही वाहिन्या पाहण्यात कोणते बदल होतील याविषयी थोडक्यात माहिती…

ट्रायच्या नव्या फ्रेमवर्कद्वारे ग्राहकांना निवडीच स्वातंत्र्य मिळेल आणि कोणत्या वाहिन्या पहायच्या, दरमहा किती पैसे द्यायचे यावर थेट नियंत्रण मिळेल! यामुळे डीटीएच (उदा. एयरटेल,व्हिडिओकॉन d2H, डिश टीव्ही), केबल टीव्ही (सिटी, डेन, हॅथवे, इ.) सेवांच्या ग्राहकांना विशिष्ट चॅनल्सची निवड करावी लागणार आहे.

ADVERTISEMENT

ट्रायच्या नव्या नियमांनुसार ग्राहकांना एक बेस पॅक दिला जाईल ज्यामध्ये १०० वाहिन्या असतील आणि त्यासाठी १३० रु + टॅक्स असे एकूण जवळपास १५० रुपये द्यावे लागतील. या १०० वाहिन्यात २६ वाहिन्या दूरदर्शनच्या असतील! ५०० वाहिन्या निवडीसाठी उपलब्ध असतील. बेस पॅकमध्ये येणार्‍या ७४ चॅनल्सची निवड करणं बंधनकारक करण्यात आलं असून या फ्री टू एयरपैकी कोणतेही चॅनल्स आपण निवडू शकता. या निवडीसाठी ३१ जानेवारी २०१९ ची मुदत सध्यातरी देण्यात आली आहे. मात्र या मुदतीनंतर काय होईल याबद्दल कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. शक्यतो ही मुदत वाढवण्यात येईलच कारण या बदलाबद्दल ग्राहकांना माहिती नाहीय किंवा याबद्दल ते पूर्णतः अनभिज्ञ आहेत.

काही वाहिन्याचे नेटवर्क्स (उदा. स्टार, झी, सोनी) जाहिरातींद्वारे त्यांचे पॅक घेण्याबद्दल आवाहन करत आहेत जे बेस पॅकच्या वर जोडावे लागतील. समजा तुम्हाला बेस पॅकवर झी नेटवर्कच्या वाहिन्या (उदा. झी मराठी, झी टीव्ही, झी युवा) घ्यायच्या असतील तर बेस पॅक + झी नेटवर्क पॅक/बुकेचे ₹३० असे ₹१३० + ₹३० + GST असे पैसे द्यावे लागतील.

  1. बेस पॅक : याची किंमत ₹ १३० + टॅक्स अशी असेल हा पॅक घेणं सर्वांना अनिवार्य असेल. यामध्ये २६ फ्री टू एयर चॅनल्स ( उदा. दूरदर्शन, सह्याद्री) आणि ७४ इतर चॅनल्सचा समावेश असेल. हे ७४ चॅनल्स आपल्याला आवडीनुसार निवडायचे आहेत. लिस्टमध्ये उपलब्ध वाहिन्यांचा समावेश असू शकेल.
  2. बेस पॅकची ही एकूण २६+७४=१०० चॅनल्सची मर्यादा वाढवायची असेल तर २० चॅनल्ससाठी ₹ २५ रुपये द्यावे लागतील.
  3. बेस पॅकवर अधिक चॅनल्स हवे असतील तर प्रत्येक चॅनलचे स्वतंत्र पैसे द्यावे लागतील किंवा नेटवर्क्सनी जाहीर केलेले खास पॅक/बुके घ्यावे लागतील (उदा स्टार मराठी पॅक ४९ रुपये) याला BOUQUET (बुके) म्हटलं जाईल (काही डीटीएच कंपन्या याला a-la-carte सुद्धा म्हणतात)
  4. विविध कंपन्या त्यांचे स्वतःचे BOUQUET (बुके) जाहीर करत आहेत. उदा. झी, स्टार इंडिया, डिज्नी, टाइम्स नेटवर्क, सोनी, एबीपी, टीव्ही टूडे, इ.) या BOUQUET
    (बुके)ची यादी इथे पहा
  5. उदा. तुम्हाला झी नेटवर्कच्या सर्व मराठी वाहिन्या पहायच्या आहेत तर तुम्हाला बेस पॅक +
    Zee Family Pack Marathi SD बुके
    घ्यावा लागेल. ज्याची किंमत बुके यादी मध्ये ₹६० दिलेली आहे. त्यानुसार १३०+६०+GST असे पैसे द्यावे लागतील.
  6. तुमच्या आवडीची वाहिनी कोणत्याच बुकेमध्ये नसेल तर त्या वाहिनीसाठी स्वतंत्र पैसे द्यावे लागतील. यासाठी प्रत्येक चॅनलची किंमत येथे उपलब्ध (बुकेशिवाय स्वतंत्र वाहिनी हवी असेल तरी हाच पर्याय लागू होईल)

अधिकृत माहितीसाठी लिंक
Tariff Information Framework on Broadcasting & Cable Service

याबाबत माहितीसाठी तुम्हाला तुमच्या केबल ऑपरेटर किंवा डीटीएच प्रोव्हायडरशी संपर्क साधावा लागेल. डीटीएच बाबत तुम्ही तुमच्या प्रोव्हायडरच्या वेबसाइटवर माहिती पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही चॅनल निवडीची माहिती त्यांना देऊन त्यानुसार बदल करून घेऊ शकता…

  • Airtel : Airtel Digital TV Packs
  • Videocon : Videocon d2H Plans
  • DishTV : DishTV Plans TV Channels

काही डीटीएच कंपन्या कॉम्बो पॅक सादर करत आहेत जसे की स्पोर्ट्स पॅक, मराठी वाहिन्या पॅक ज्यामध्ये ठराविक चॅनल्स जोडलेले असतील आणि त्यांचेच पैसे देऊन आपण आवडत्या वाहिन्या पाहू शकाल…

३१ जानेवारी नंतरही चॅनल्स निवडले नाहीत तर टीव्ही बंद पडणार नाहीये. मात्र ट्रायने लवकरात लवकर चॅनल्सच्या निवडी पूर्ण कराव्यात असं आवाहन केलं आहे.

स्टार इंडिया मराठी बुके खालील प्रमाणे : (उदा. स्टार प्रवाह)
▸Marathi Value SD / Value HD
▸Marathi Premium SD / Premium HD
TV 18 इंडिया मराठी बुके खालील प्रमाणे : (उदा. कलर्स मराठी)
▸Maharashtra budget SD / HD
▸Maharashtra value SD / HD
▸Maharashtra Family SD / HD
Sony Networks India मराठी बुके खालील प्रमाणे : (उदा. सोनी मराठी)
▸Happy India
झी नेटवर्क मराठी बुके खालील प्रमाणे : (उदा. झी मराठी)
▸Zee Family Pack Marathi SD / HD
▸Zee All-in-1 Pack Marathi SD / HD
ABP News मराठी बुके खालील प्रमाणे : (उदा. एबीपी माझा)
▸ANN-1

Tags: Cable TVDTHTRAI
Share76TweetSend
Previous Post

अॅपल आयफोन्सची विक्री घटतेय…!

Next Post

अॅमेझॉन अलेक्सा उपकरणांची विक्री १० कोटींवर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

TRAI Channel Selector

ट्राय चॅनल सिलेक्टर : डीटीएच व केबल ग्राहकांसाठी ॲप !

June 28, 2020
एयरटेलच्या ग्राहकांमध्ये १.२ कोटींनी वाढ : सुधारित 4G नेटवर्कचा परिणाम!

एयरटेलच्या ग्राहकांमध्ये १.२ कोटींनी वाढ : सुधारित 4G नेटवर्कचा परिणाम!

December 24, 2019
Reliance Jio Fiber

रिलायन्स जिओ फायबर सेवा सादर : 1Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड!

August 13, 2019
सर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे!

सर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे!

July 20, 2019
Next Post
अॅमेझॉन अलेक्सा उपकरणांची विक्री १० कोटींवर!

अॅमेझॉन अलेक्सा उपकरणांची विक्री १० कोटींवर!

Comments 1

  1. ravi says:
    4 years ago

    Very good write-up. I certainly love this website. Thanks!

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!