MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

कोविड लसीचा स्लॉट आता व्हॉट्सॲपवरसुद्धा बुक करता येणार!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 26, 2021
in News
Covid Vaccine Book WhatsApp

आजवर Cowin पोर्ट्ल सह आरोग्य सेतु, Paytm सारख्या ठिकाणी लसीसाठी स्लॉट बुक करण्याचा पर्याय होता. आता थेट आपल्या फोनमार्फत व्हॉट्सॲपवरच हे बुकिंग करता येईल. नव्या पर्यायानुसार व्हॉट्सॲपवर केवळ स्लॉट बुक करता येणार असून त्या आधी करावी लागणारी नोंदणी/रजिस्ट्रेशन cowin.gov.in वेबसाइटवरच करावी लागेल. सर्व सदस्यांची नोंदणी झाल्यावर लसीकरण केंद्रामधील वेळेचा स्लॉट बुक करण्यासाठी व्हॉट्सॲपचा वापर करू शकता.

व्हॉट्सॲपने यासाठी चॅटबॉटचा वापर केला असून यामार्फत Cowin प्रमाणेच स्लॉट बुक करता येईल. मात्र इतर उपलब्ध स्लॉट्स, लसीकरण केंद्रे यांची माहिती इथे सहज दिसणार नाही.

ADVERTISEMENT
  1. प्रथम My Gov Corona Helpdesk चा +919013151515 हा क्रमांक सेव्ह करून घ्या किंवा या लिंकवर जा
  2. आता Book Slot असा मेसेज पाठवा
  3. त्यानंतर तुम्ही Cowin वर रजिस्टर केलेल्या नंबरवर मेसेजमार्फत OTP येईल
  4. आलेला OTP टाइप करून सेंड करा
  5. आता तुम्ही Cowin वर नोंदणी केलेल्या सदस्यांची नावे दिसतील
  6. कुणासाठी लस घ्यायची आहे त्या त्या नावासमोरील अंक टाइप करून सेंड करा
  7. आता Search By Pincode वर क्लिक करा
  8. आता फ्री किंवा Paid असे दोन पर्याय येतील. तुमच्या गरजेनुसार निवडा
  9. आता उपलब्ध लसीकरण केंद्रांची नावे दिसतील त्यासमोर अंक दिलेला असेल
  10. जे केंद्र निवडायचे आहे त्यासमोरील अंक टाइप करून सेंड करा
  11. आता तुमचा स्लॉट बुक झाल्याचा मेसेज येईल. हा मेसेज घेऊन तुम्ही लसीकरण केंद्रात दिलेल्या वेळी जाऊ शकता.

काही दिवसांपूर्वीच याच क्रमांका मार्फत लसीचं प्रमाणपत्र/सर्टिफिकेट डाउनलोड करण्याचीही सोय देण्यात आली होती.

Now you can book your COVID vaccination slot through MyGovIndia Corona Helpdesk on @WhatsApp! Just follow these simple steps! Visit: https://t.co/97Wqddbz7k #IndiaFightsCorona @MoHFW_India @PMOIndia @PIB_India @MIB_India pic.twitter.com/Xt2zJzWcKZ

— MyGovIndia (@mygovindia) August 25, 2021

Search Terms : How to to Book Vaccination Slots on WhatsApp MyGov Corona Helpdesk

Tags: CovidCoWINHealthWhatsApp
ShareTweetSend
Previous Post

रियलमीचे realme GT 5G, GT Master Edition फोन्स भारतात सादर!

Next Post

gamescom 2021 कार्यक्रम : Saints Row, Marvel Midnight Suns जाहीर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

What Is WhatsApp Community Marathi

व्हॉट्सॲप कम्युनिटी उपलब्ध : कम्युनिटी आणि ग्रुपमध्ये फरक काय ?

November 12, 2022
WhatsApp Reactions

व्हॉट्सॲपवरही आता स्टेटस रिॲक्शन्स उपलब्ध : सोबत इतरही नवे फीचर्स!

October 18, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
WhatsApp Reactions

व्हॉट्सॲप मेसेजेसला रिॲक्शन्स देण्याची सोय उपलब्ध !

May 5, 2022
Next Post
gamescom 2021

gamescom 2021 कार्यक्रम : Saints Row, Marvel Midnight Suns जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

March 29, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023
भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

March 27, 2023
इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

March 25, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

March 29, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!