MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

ॲपल बनली आहे 3 ट्रिलियन डॉलर्स भागभांडवल असलेली जगातली पहिली कंपनी!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 4, 2022
in News
Apple 3 Trillion Dollars

ॲपल आज जगातली पहिली ३ ट्रिलियन डॉलर्स मार्केट कॅपिटल असलेली कंपनी बनली आहे. रुपयांमध्ये सांगायचं तर तब्बल ~ २२२ लाख कोटी रुपये भागभांडवल! ॲपलची यावेळी मायक्रोसॉफ्टसोबत स्पर्धा होती! मात्र शेवटी ॲपलने पुन्हा एकदा बाजी मारत हा बहुमान पटकावला आहे!

ऑगस्ट २०१८ मध्ये पहिली १ ट्रिलियन डॉलर्स मार्केट कॅपिटल असलेली कंपनी बनली होती. त्यानंतर दोन वर्षांनी २ ट्रिलियन डॉलर्स आणि आता जानेवारी २०२२ मध्ये 3 ट्रिलियन डॉलर्स भागभांडवल असलेली कंपनी बनली आहे! अर्थात मार्केट स्थितीनुसार त्या शेयरचीही किंमत काही वेळातच खाली आली आणि त्यांचं सध्याचं मार्केट कॅप 2.9 ट्रिलियन डॉलर्सवर आहे.
९ जानेवारीला ॲपलच्या स्टीव्ह जॉब्स यांनी आयफोनचं अनावरण करून १५ वर्षे पूर्ण होणार आहेत.

ADVERTISEMENT

मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या आयफोन्स, मॅकबुक्स, आयमॅक, वॉच, आयपॅड अशा उपकरणांसोबत ॲपल टीव्ही, ॲपल म्युझिक अशा सेवांमुळे त्यांचं उत्पन्न अनेक पटींनी वाढलं आहे! चीन या जगातल्या सर्वात मोठ्या स्मार्टफोन मार्केटमध्येही ॲपल पहिल्या स्थानी आहे. ॲपलला एकूण उत्पन्नापैकी जवळपास ५२ टक्के उत्पन्न केवळ आयफोन्सच्या विक्रीमधून प्राप्त होत आहे!

अनेकांनी यावर ॲपल उपकरणे पुसण्याचं कापड आणून त्याची किंमत फक्त १,९०० रुपये ठेवून त्यांचं हे कॅपिटल मोठं करत आहे अशा आशयाने त्यांच्या उपकरणांच्या वाढलेल्या किंमतीवर भाष्य केलं आहे! येत्या काळात ॲपल स्वतःची इलेक्ट्रिक कारसुद्धा सादर करणार असल्याची चर्चा नेहमी सुरू असते. शिवाय लवकरच VR हेडसेटसुद्धा आणणार असल्याची शक्यता आहे.

जगात सर्वात जास्त मार्केट कॅप असलेल्या कंपन्या

  1. ॲपल : 2.9 ट्रिलियन डॉलर्स
  2. मायक्रोसॉफ्ट : 2.5 ट्रिलियन डॉलर्स
  3. अल्फाबेट (गूगल) : 1.9 ट्रिलियन डॉलर्स
  4. ॲमेझॉन : 1.6 ट्रिलियन डॉलर्स
  5. टेस्ला : 1 ट्रिलियन डॉलर्स

स्थापनेनंतर ४२ वर्षात ॲपलने १ ट्रिलियनचा टप्पा गाठला होता आणि त्यानंतर ४ वर्षात हा नवा टप्पा गाठला असून याआधी तब्बल ११७ वर्षांपूर्वी १९०१ मध्ये यूएस स्टीलने 1 बिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला होता. पेट्रो चायनानेसुद्धा एका दिवसासाठी 1 ट्रिलियनचा टप्पा ओलांडला होता. तसेच जर आधीच्या ऑइल कंपन्यांचे सध्याच्या चलनामध्ये रूपांतर केल्यास या जुन्या कंपन्या कित्येक पटीने पुढे असतील मात्र या कंपन्या आता शक्यतो विभाजित झालेल्या आहेत.

ॲपलची मार्केटमधील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी लिंक : Apple (AAPL) Current Share Stats

search terms : Apple first company to cross $3 trillion market cap US nasdaq

Tags: AppleMarketMarket CapitalNASDAQShare MarketShares
ShareTweetSend
Previous Post

James Webb टेलिस्कोपचं प्रक्षेपण : सर्वात मोठा व शक्तिशाली स्पेस टेलिस्कोप

Next Post

सोनीची इलेक्ट्रिक कार येणार : नव्या कार कंपनीची घोषणा!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Macbook Pro Mac Mini M2 Pro

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

January 24, 2023
iPhone Marathi Typing

आयफोनवर मराठी टायपिंग करणं आता सोपं झालंय!

November 10, 2022
ॲपलचा नवा आयपॅड व iPad Pro सादर : प्रो मॉडेल आता M2 प्रोसेसरसह!

ॲपलचा नवा आयपॅड व iPad Pro सादर : प्रो मॉडेल आता M2 प्रोसेसरसह!

October 19, 2022
ॲपलचे नवे आयफोन १४, ॲपल वॉच अल्ट्रा आणि एयरपॉड्स प्रो सादर!

ॲपलचे नवे आयफोन १४, ॲपल वॉच अल्ट्रा आणि एयरपॉड्स प्रो सादर!

September 8, 2022
Next Post
Sony Vision S Electric Car

सोनीची इलेक्ट्रिक कार येणार : नव्या कार कंपनीची घोषणा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
AI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल!

AI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल!

February 1, 2023
Macbook Pro Mac Mini M2 Pro

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

January 24, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
AI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल!

AI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल!

February 1, 2023

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

AI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल!

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना गूगलची डूडलद्वारे मानवंदना!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech