MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टॅब्लेट्स

सॅमसंगचा Galaxy Tab S8 भारतात सादर : Tab S8, S8+ आणि S8 Ultra

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 22, 2022
in टॅब्लेट्स

सॅमसंगने काही दिवसांपूर्वी सादर केलेल्या Galaxy S22 सोबत त्यांची टॅब्लेट Tab S मालिकेत नवे तीन टॅब्लेट जाहीर करण्यात आले होते. ते काल भारतात सादर करण्यात आले असून त्यांची भारतीय किंमत व त्यावरील ऑफर्सची माहिती देण्यात आली आहे.

या टॅब्लेट्समध्ये सुधारित डिस्प्ले, नवीन अल्ट्रा वाईड फ्रंट कॅमेरा, ऑटो फ्रेमिंग तंत्रज्ञान, Quick Share अशा सुविधा दिलेल्या आहेत. सोबत S Pen चा सपोर्ट आहेच. तिन्ही टॅब्लेट 5G पर्यायासह उपलब्ध होतील. तिन्ही टॅब्लेट Android 12 OneUI 4 वर चालतात.

ADVERTISEMENT

Galaxy Tab S8 Ultra मध्ये 14.6-inch Super AMOLED 120Hz डिस्प्ले, Tab S8+ मध्ये 12.4 inch AMOLED 120Hz डिस्प्ले तर Tab S8 मध्ये 11 inch डिस्प्ले देण्यात आला आहे. तिन्ही टॅब्लेटमध्ये मागे 13MP+6MP कॅमेरा आहे. Tab S8 Ultra मध्ये 12MP+12MP असे दोन फ्रंट कॅमेरा आहेत तर उर्वरित दोन टॅब्लेट्समध्ये 12MP चा एक फ्रंट कॅमेरा आहे.

Galaxy Tab S8 Ultra मध्ये 11,200mAh, Tab S8+ मध्ये 10,090mAh आणि Tab S8 मध्ये 8,000mAh बॅटरी मिळते. तिन्ही टॅब्लेट 45W चार्जिंग सपोर्ट करतात मात्र त्यासाठी चार्जर बॉक्समध्ये देण्यात आलेला नाही.

यावेळी प्रथमच तुमचा सॅमसंग फोन ड्रॉ करताना रंग निवडण्यासाठी पॅलेट म्हणून वापरता येईल अशी सोय दिली आहे. शिवाय Apple मध्ये व्हिडिओ एडिटिंगसाठी प्रसिद्ध असलेलं LumaFusion ॲप आता अँड्रॉइडवर Tab S8 वर प्रथम उपलब्ध होत आहे.

या टॅब्लेट्सची प्रिबुकिंग २२ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. प्रिबुकिंग करणाऱ्या ग्राहकांना २२९९९ किंमतीचं किबोर्ड कव्हर फ्री मिळेल. शिवाय HDFC बँक कार्डद्वारे प्रिबुकिंग केल्यास १०,००० चा कॅशबॅक मिळेल.

Galaxy Tab S8 Ultra : ₹1,08,999 WiFi (12GB+256GB)
Galaxy Tab S8 Ultra : ₹1,22,999 5G (12GB+256GB)

Galaxy Tab S8+ : ₹74,999 WiFi (8GB+128GB)
Galaxy Tab S8+ : ₹87,999 5G (8GB+128GB)

Galaxy Tab S8 : ₹58,999 WiFi (8GB+128GB)
Galaxy Tab S8 : ₹70,999 5G (8GB+128GB)

Tags: Galaxy TabSamsungTablets
ShareTweetSend
Previous Post

वनप्लसचा Nord CE 2 5G भारतात सादर : 64MP कॅमेरा, 65W फास्ट चार्जिंगसह!

Next Post

व्हॉट्सॲप Safety in India : यूजर्सच्या ऑनलाइन सुरक्षा आणि जागृतीसाठी मदतकेंद्र

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

January 8, 2023
ॲपलचा नवा आयपॅड व iPad Pro सादर : प्रो मॉडेल आता M2 प्रोसेसरसह!

ॲपलचा नवा आयपॅड व iPad Pro सादर : प्रो मॉडेल आता M2 प्रोसेसरसह!

October 19, 2022
Next Post
WhatsApp Resource Hub

व्हॉट्सॲप Safety in India : यूजर्सच्या ऑनलाइन सुरक्षा आणि जागृतीसाठी मदतकेंद्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!