OpenAI ने काल त्यांचं नवं Sora मॉडेल जाहीर केलं असून यामुळे फक्त काही शब्दांच्या टेक्स्ट प्रॉम्प्ट देऊन काही क्षणात एका मिनिटांचा व्हिडीओ तयार करता येतो! हे लवकरच वापरण्यासाठी उपलब्ध होईल…
ChatGPT तयार करणाऱ्या OpenAI कंपनीनेच हे नवं AI मॉडेल आणलं आहे! यामध्ये आपण फक्त टेक्स्ट इनपुटद्वारे आपल्याला कसा व्हिडिओ हवा आहे ते सांगायचं… काही क्षणात Sora आपल्याला १ मिनिटांचा व्हिडिओ तयार करून देईल!
openai.com/sora वर आणखी उदाहरणे पाहू शकता! OpenAI सीईओ सॅम आल्टमनने ट्विटर (एक्स) वर युजर्सना प्रॉम्प्ट विचारून त्याचं आउटपुटसुद्धा शेयर केलं आहे!
हे तंत्रज्ञान इतक्या वेगानं विकसित होत आहे की पुन्हा एकदा AI मुळे अनेक प्रकारच्या नोकऱ्या कालबाह्य होतील असं म्हटलं जात आहे. आता त्याचं प्रमाण आणि परिणाम काय असतील ते येत्या काळात समजेलच…