MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 25, 2026
in News, कॉम्प्युटर्स

ॲपलने आज त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का देत MacBook आणि iPad आणि इतर प्रॉडक्टच्या किंमतींमध्ये मोठी वाढ जाहीर केली आहे. कंपनीच्या अधिकृत भारतातील वेबसाइटवर नवीन किंमती लागू करण्यात आल्या असून, काही प्रीमियम मॉडेल्सच्या किंमतींमध्ये तब्बल १ लाख रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ केवळ भारतापुरती मर्यादित नसून जागतिक स्तरावरही ॲपलने Mac आणि iPad उत्पादनांच्या किंमती वाढवल्या आहेत.

किंमती का वाढल्या?

ADVERTISEMENT

ॲपलचे म्हणणे आहे की जागतिक स्तरावर मेमरी (DRAM) आणि स्टोरेज (NAND) चिप्सच्या किंमतींमध्ये झालेली मोठी वाढ, तसेच AI डेटा सेंटर्समुळे निर्माण झालेली प्रचंड मागणी यामुळे उत्पादन खर्च लक्षणीय वाढला आहे. याच वाढलेल्या खर्चाचा परिणाम आता ग्राहकांवर दिसत आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी काही दिवसांपूर्वीच अशा किंमतवाढीची शक्यता व्यक्त केली होती.

किंमतीमधील बदल खालील प्रमाणे… तूर्तास आयफोनच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

आयपॅड
iPad – ₹49,990 (पूर्वी ₹34,990)
iPad Mini – ₹69,900(पूर्वी ₹49,900)
iPad Air – ₹89,900(पूर्वी ₹64,900)
iPad Pro – ₹1,39,900 (पूर्वी ₹99,990)

मॅक
Mac Mini M4 – ₹94,900 (पूर्वी ₹59,900)
Mac Studio M4 Max – ₹2,79,900 (पूर्वी ₹2,14,900)
Mac Studio M3 Ultra- ₹5,99,900 (पूर्वी ₹4,29,900)
iMac M4 – ₹1,74,900 (पूर्वी ₹1,34,900)

मॅकबुक
MacBook Air M5 – ₹1,49,900 (पूर्वी ₹1,19,900)
MacBook Pro M5 – ₹2,39,900 (पूर्वी ₹1,69,900)
MacBook Pro M5 Max – ₹4,99,900 (पूर्वी ₹3,99,900) (सर्वाधिक १ लाख रुपयांची वाढ!)
MacBook Neo – ₹79,900 (पूर्वी ₹69,900)

ॲपलचे स्मार्ट होम प्रॉडक्ट्स
HomePod – ₹44,900 (पूर्वी ₹32,900)
HomePod Mini – ₹15,900 (पूर्वी ₹10,900)
Apple TV 4K 64GB – ₹25,900 (पूर्वी ₹14,900)
Apple TV 4K 128GB + Ethernet – ₹31,900 (पूर्वी ₹16,900)

कोणावर होणार सर्वाधिक परिणाम?

या किंमतवाढीचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, कंटेंट क्रिएटर्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, व्हिडिओ एडिटर्स आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना बसण्याची शक्यता आहे. विशेषतः नवीन MacBook किंवा iPad खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे अनेक ग्राहक जुनी मॉडेल्स, रिफर्बिश्ड डिव्हाइसेस किंवा इतर ब्रँडकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही वाढ ॲपलच्या वेबसाइटवर आत्ताच लागू झाली असून तुम्हाला अजूनही जुन्या किंमतीत खरेदी करायची असेल तर ऑनलाइन वेबसाइट्स (Amazon/Flipkart) किंवा ऑफलाइन दुकाने इथे आणखी काही दिवस तरी जुन्या किंमतीत खरेदी करू शकता.

सध्या ॲपलने iPhone, Apple Watch किंवा AirPods च्या किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र उत्पादन खर्चातील वाढ कायम राहिल्यास भविष्यात इतर उत्पादनांच्या किंमतीतही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी हा लेख लिहीत असतानाच एक्सबॉक्सची सुद्धा किंमत 100 डॉलर्सने वाढवण्यात आली आहे!

AI तंत्रज्ञानामुळे मेमरी आणि स्टोरेज चिप्सची जागतिक मागणी वाढल्याने इलेक्ट्रॉनिक्स उद्योगावर खर्चाचा मोठा ताण निर्माण झाला आहे. ॲपलने हा वाढलेला खर्च ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला असून, भारतातील MacBook आणि iPad खरेदी आता पूर्वीपेक्षा अधिक महाग झाली आहे. अमेरिकेतील वाढलेल्या किंमतीच्या तुलनेत भारतातील किंमती खूपच जास्त प्रमाणात वाढल्या आहेत. आगामी काळात इतर तंत्रज्ञान कंपन्याही अशाच प्रकारे किंमती वाढवण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Tags: AppleiMaciPadLaptopsMacBook
ShareTweetSend
Previous Post

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech