MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॅमेरा

जस्ट गो फॉर ‘गोप्रो एचडी हिरो २’

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 22, 2012
in कॅमेरा
हल्ली बाहेर फिरायला जायचं म्हटलं की सर्वप्रथम विचारणा होते कॅमेरा घेतला का? एका दिवसाचं आऊटिंग असो वा महिन्याभराचा परदेश प्रवास, बॅगेत सर्वप्रथम प्राधान्य असते ते कॅमेऱ्याला. नुसतंच फिरायला बाहेर पडल्यावर हातात कॅमेरा घेऊन क्लिक क्लिक करायला सर्वांनाच आवडतं आणि ते सोप्पही असतं, पण जे साहसी गोष्टी करायला बाहेर पडतात त्यांचं कायं? उदारणार्थ ट्रेकिंग, सायकलिंग, राफ्टिंग किंवा वॉटरस्पोर्ट्स. आपण कुठे फिरायला गेलो, काय काय पाहिलं याचे फोटो आणि व्हिडीओ इतरांना दाखवायला आवडत असेल तर मग आपण काय साहस केलं याचे फोटो किंवा व्हिडीओ इतरांना का दाखवावेसे वाटणार नाहीत? खरंतर प्रगत तंत्रज्ञानाने हे गेल्या काही वर्षांमध्ये शक्य झालं आहे. पण सामान्यातल्या सामान्य माणसाला वापरता येणारं तंत्रज्ञान जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत एखाद्या गोष्टीला मान्यता आणि प्रसिध्दी मिळत नाही. सर्वात छोटा आणि ट्रॅव्हेलिंग कॅमेरा बनवणाऱ्या गोप्रो कंपनीने नवीन ‘गोप्रो एचडी हिरो २’ काही महिन्यांपूर्वीच बाजारात दाखल केला आहे. आधीच्या गोप्रो हिरोपेक्षा नवीन एचडी ‘हिरो २’ अधिक शार्प आणि स्मार्ट काम करतो. तो फोटो काढतो आणि एचडी रेकॉर्डिंगही करतो.      
पूर्ण एचडी रेकॉर्डिंगसह ११ मेगापिक्सल ‘हिरो २’ एचडी कॅमेरा दुप्पट पॉवरफुल आहे. 
२ एक्स जलद इमेज प्रोसेसर, लांब १७० अंश, मध्यम १२७ अंश, अरुंद ९० अंश एफओवी १०८०पी आणि ७२०पी व्हिडीओ मोड्स, प्रत्येक सेकंदाला ११ मेगापिक्सेलचे दहा फोटो काढण्याची क्षमता, ३.५ एमएम एक्सटर्नल स्टिरिओ मायक्रोफोन, रिमोट वायफाय कंट्रोल, एचडीएमआय पोर्ट, कंपोसिट आऊटपूट, एसडी कार्ड, अधिक अंतरापर्यंत वापरता येऊ शकणारा रिमोट कंट्रोल आणि युजर फेंडली इंटरफेस ही याची काही खास वैशिष्ट्ये म्हणता येतील. 
यामध्ये १६:९ या कॅनव्हासमध्ये १०८०पी एचडी व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येणं शक्य असल्याने लाईव्ह स्ट्रीमिंगसाठीही त्याचा सहज वापर करता येऊ शकतो. यामध्ये रेझोल्युशनची वेगवेगळी सेटिंग्ज असून एफओव्ही म्हणजेच फिल्ड ऑफ व्ह्यूचे वेगवेगळे पर्याय आहेत. ज्यामुळे आधीच्या कॅमऱ्यापेक्षा अधिक व्यावसायिक पद्धतीने प्रतिमा मिळतात. ‘हिरो २’ मध्ये आधीच्या कॅमेऱ्यापेक्षा कलर बॅलन्स खूपच चांगला असून अंधूक प्रकाशातही स्क्रीनवरील गोष्टी स्पष्ट वाचता येतात. कारण यामध्ये आकाराला लहान पण एलईडी स्क्रीन आहे,  ज्यामध्ये व्हिडीओे किंवा फोटो पाहता येत नसले तरी मेनू पाहता येतो. तसेच गोप्रो हिरोपेक्षा हिरो २ चा इंटरफेस खूपच युजर फ्रें डली आहे. 
आजपर्यंत गोप्रो कॅमेरा हा फक्त हेल्मेट कॅमेरा म्हणून ओळखला जायचा, पण नवीन गोप्रो एचडी  ‘हिरो २’ हा अधिक अ‍ॅडव्हान्स आहे. ट्रेकिंग, सायकलिंग, राफ्टिंग, वॉटरस्पोर्ट्स आणि इतर खेळांच्याही लाइव्ह शूटिंगसाठी त्याचा सहज वापर करता येणं शक्य आहे. बाजारात नवीन आलेल्या लहान आकारांच्या स्प्रिंग मोल्डींग स्टॅन्डमुळे हा सपाट पृष्ठभागावर उभा करता येतोच पण तुमच्या सायकल, बाईकच्या पुढच्या हॅन्डलवरही सहज बसवता येतो. 
नवीन ‘हिरो २’ कॅमेऱ्याच्या बॉक्समध्ये तुम्हाला हेड माऊंट, हेलमेंट माऊंट, तीन वेगवेगळ्या पध्दतीने वापरता येतील असा आर्म हॅंडल, वॉटरप्रूफ आवरण, उच्च प्रतिच्या आवाजासाठी नॉन-वॉटरप्रूफ आवरण आणि बॅटरीही आहे. हिरो २ मध्ये व्हिडीओे काढणं अधिक सोपं झालं आहे. मूव्ही मोड सिलेक्ट करून फक्त गो प्रेस केलात की तुम्ही शूटिंग करायला मोकळे. जेव्हा तुम्ही शूटिंग करत असता तेव्हा कॅमेरा बीप करत राहतो आणि समोरच्या बाजूला असलेला एलईडी आणि वरचा फ्लॅश तुम्हाला चित्रीकरण चालू असल्याचे संकेत देत राहतो. गोप्रो हिरोमध्ये बीप हा प्रकार नव्हता, पण हिरो २ मध्ये ते असल्याने आपण करत असलेल्या अ‍ॅडव्हेंचरवर लक्ष केंद्रित करता येतं. हे सर्व असलं तरी तुम्ही घरी गेल्याशिवाय कॉम्प्युटरवर अपलोड केल्याशिवाय किंवा सोबत लॅपटॉप बाळगल्याशिवाय काय शूट केलंय हे पाहू शकत नाही. पण जर तुमच्याकडे आयपॅड असेल तर उत्तम आणि बाजारातील इतर कंपनीच्या टॅबलेटलाही हा व्यविस्थत जोडला जातो असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये १,१०० एमएएच बॅटरी आहे, जी सलग अडीच तासांहून जास्त काळ चालते.  ह्याची किंमत बाजारात पंधरा हजारांच्या आसपास आहे, जी थोडी जास्त असली तरी व्यावसायिक वापरासाठी आणि याचा एकंदरीत उपयोग पाहता ती कमीच म्हणायला हवी.

ADVERTISEMENT
Tags: Action CamerasCamerasCyclingFull HDHDHeroPhotographyRaftingTravelTrekkingWater SportsWaterproof
ShareTweetSend
Previous Post

नवीन अॅक्रोबॅट आणखी सुलभ : मॅक आणि विंडोजसाठी अॅक्रोबॅट ११ बाजारात

Next Post

तीन महिन्यात ५ लाख टॅबलेटची विक्री : मायक्रोमॅक्स सर्वाधिक

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

RED सिनेमा कॅमेरा कंपनी निकॉनने विकत घेतली!

RED सिनेमा कॅमेरा कंपनी निकॉनने विकत घेतली!

March 10, 2024
आता सोनी कंपनीचाही ड्रोन : Sony Airpeak S1 जाहीर!

आता सोनी कंपनीचाही ड्रोन : Sony Airpeak S1 जाहीर!

June 11, 2021
DJI Air 2S

DJI चा नवा ड्रोन Air 2S : आता 1″ सेन्सर आणि 5.6K व्हिडिओसह!

April 16, 2021
DJI चा FPV ड्रोन सादर : आता मोशन कंट्रोलर, नव्या गॉगल्ससह!

DJI चा FPV ड्रोन सादर : आता मोशन कंट्रोलर, नव्या गॉगल्ससह!

March 6, 2021
Next Post

तीन महिन्यात ५ लाख टॅबलेटची विक्री : मायक्रोमॅक्स सर्वाधिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech