इन्स्टाग्रामवर व्हिडीओ
हॅशटॅगनंतर व्हिडीओ हे फीचर उपलब्ध करून देत फेसबुकने ट्विटरला मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. त्यामुळे इतके दिवस फोटोसाठी पसंतीचे असलेल्या...
हॅशटॅगनंतर व्हिडीओ हे फीचर उपलब्ध करून देत फेसबुकने ट्विटरला मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. त्यामुळे इतके दिवस फोटोसाठी पसंतीचे असलेल्या...
फेसबुक हे व्यक्त होण्याचं साधन झालं आहे. वैयक्तिक आणि आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर इथे मत दिलं जातं. त्या मतांमध्ये जाणवतो तारतम्याचा...
ऑनलाइन शॉपिंग करायची असल्यास एका क्लिकवर तुम्ही एखाद्या चांगल्या साईटवर जाता आणि जे हवे असेल त्याची ऑर्डर प्लेस करता. मात्र...
अॅपल कंपनीने २००७ मध्ये आयफोन लाँच करून स्मार्टफोनची नवी परिभाषा लिहिली होती. कंपनीने २००७ नंतर प्रथमच आयओएस या ऑपरेटिंग सिस्टिमचे...
जंगलामध्ये रस्ता हरवला, तर मदतीसाठी पूर्वी आरडाओरडा केला जायचा. माहितगार व्यक्ती होकायंत्राने दिशा शोधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायच्या . इंटरनेट क्रांतीनंतर मॅपचा आधार घेऊन दिशा शोधल्या जाऊ लागल्या . आपण नेमकेकोठे आहोत आणि कुठे जायचे आहे , याचे मार्ग मोबाईलवर दिसू लागले आणि अवघड वाटणारा प्रवास सोपा झाला . या सर्व तंत्रज्ञानाचे जनक म्हणजे गुगल , अॅपल , फेसबुकयांसारख्या कंपन्यांनी पुरवलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर अक्षरशः कोट्यवधी लोक करतात.' गुगल ' ने या मॅपसंदर्भात नुकतेच एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे . त्यामुळे मॅपिंगच्या क्षेत्रातील चेहरामोहराच बदलला जाईल . मूळचे इस्रायलचे असणारे ' वेझ ' तंत्रज्ञान खरेदी करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे . १ . ३ अब्जडॉलरचा करार गुगलने यासाठी केला आहे . गुगलच्या यूजर्सची जगभरातील संख्या पाहिली , तर ' वेझ ' हीगुगलसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच ठरण्याची शक्यता आहे . यापूर्वी अब्जावधी डॉलरचा करार गुगलने तिघांबाबततच केला आहे . त्यात यू - ट्यूबचाही समावेश आहे . इस्रायलमधील भरघोस यशानंतर वेझ हे तंत्रज्ञान चार वर्षांपूर्वीच अमेरिकेत आले आहे . मोटारींना ट्रॅफिकमधून मार्ग दाखवणे , स्पीडलेन सांगणे , शॉटकट कुठेआहेत , अपघात कुठल्या रस्त्यावर झाले आहेत , धोक्याचे रस्ते कुठले आहेत , या सर्वांची कल्पना ड्रायव्हरलादेण्याचे काम ' वेझ ' करते . मोठे करार १५ वर्षांच्या इतिहासात गुगलने आतापर्यंत केलेल्या सर्वांत मोठ्या किमतीच्या २४० करारांपैकी ' वेझ ' चा क्रमांकचौथा लागतो . मोटोरोला मोबिलिटी - १२ . ४ अब्ज डॉलर , डबल क्लिक - ३ . २ अब्ज डॉलर आणि यू - ट्यूब- १ . ७६ अब्ज डॉलर हे तीन करार यापूर्वी केले आहेत . यू - ट्यूबसारख्या साइटचे भारतातील यश पाहता आगामी काळात वेझ तंत्रज्ञानही येथे झपाट्याने वापरले जाईल , याची खात्री वाटते . वेझचा १९० देशांमध्ये वापर ' वेझ ' ने सांगितले आहे , की मॅपिंग तंत्रज्ञान १९० देशांमध्ये वापरले जाते . ट्रॅफिक जॅम , जॉब आणि इतरठिकाणी जाण्यासाठी सर्वांत जलद उपलब्ध रस्ता शोधण्यासाठी याचा वापर केला जातो . कंपनीचे ७० हजारसदस्य नकाशांचे संपादन करण्यावर काम करतात . नकाशांखेरीज विविध टिप्सही यामध्ये दिल्या जातात . वेझच्या आगमनाने गुगलचीही दोन वर्षांपूर्वीची ' प्लस ' नावाची सोशल नेटवर्किंग सर्व्हिस अपडेट होण्याची शक्यता आहे .' गुगल ' चे भारतातील यूजर पाहता मॅपिंगच्या सुविधेचा येथेही मोठ्या प्रमाणावर केला जाईल . आपल्या देशातील वाहतुकीची समस्या पाहता ' वेझ ' मुळे ती दूर होईल , असे वाटत नाही ; पण दूरच्या प्रवासासाठी ,महामार्ग ठिकाणी या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर झाला , तरी नव्याने फिरणाऱ्यांच्या अनेक समस्या सुटण्यास हातभार लागेल , असे वाटते .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech