Tag: Google

गुगल हंगामा: जबरदस्‍त फीचर्सचा राजेशाही नेक्‍सस मिळणार कमी किंमतीत

गुगल हंगामा: जबरदस्‍त फीचर्सचा राजेशाही नेक्‍सस मिळणार कमी किंमतीत

गुगलचा महत्‍वकांक्षी टॅब्‍लेट अखेर लॉंच झाला. या स्‍मार्टफोनने आधीपासूनच बाजारात धूम केली होती. आता हा नवा टॅब्‍लेट आल्‍याने टक्‍कर आणखी ...

फुकट अॅप्सची किंमत भारी

कुठलीही गोष्ट मोफत मिळत असेल , तर सर्वांचा पहिला ओढा त्याकडे असतो . पण या मोफत गोष्टींसाठी आपल्याला केवढी मोठी किंमत मोजायला लागते हे बहुतांश लोकांच्या लक्षात येत नाही . गुगल , याहू मोफत इमेल सेवा पुरवतात .पण त्याबदल्यात ते यूजर्सवर जाहिरातींचा मारा करतात .आता तर या कंपन्यांनी यूजर्सचे मेल , सर्फिंग केलेल्या साइट्सच्या आधारे त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन जाहिराती देणे सुरू केले आहे . अशाच पद्धतीने फ्री अॅप्सही यूजर्सकडून काही छुपी किंमत वसूल करत आहेत .  अॅप्स तयार करणाऱ्या प्रत्येक कंपनीला मोफत अॅप पुरविणे शक्य नसते. काही कंपन्या यूजर बेस वाढविण्यासाठी , अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी मोफत अॅप पुरवतात. छोट्या कंपन्यांना मात्र त्यातून उत्पन्न मिळणे गरजेचे असते . या कंपन्या त्यासाठी जाहिरातींची मदत घेतात . या जाहिराती सुरुवातीला त्रासदायक वाटत नसल्यातरी त्या तुमच्या इंटरनेटचे पॅकेज घटवत असतात. यामाध्यमातून तुमच्यावर मालवेअरचा हल्ला होऊ शकतो . गुगल प्लेवरील ७४ टक्के अॅप्सच्या माध्यमातून मालवेअरचा हल्ला होतो , असे मकॅफीचा अहवाल सांगतो . मालवेअरच्या हल्ल्याचा धोका  बहुतांश अॅप्स इन्स्टॉल करताना अनेक परमिशन्स विचारल्या जातात . कोणत्या परमिशन्स विचारल्या जात आहेत याकडे न पाहता आपण डोळे मिटून ओके करतो . त्यात अनेकवेळा पर्सनल माहिती , कॉल रेकॉर्ड , डिव्हाइसमधील डेटा अॅक्सेस करण्याची परवानगी विचारली जाते . अगदी गेम किंवा बातम्यांचे अॅप्सही तुमच्याकडे पर्सनल इन्फॉर्मेशन  अॅक्सेस करण्याची परवानगी विचारतात . यामुळे संबंधित अॅप तयार करणाऱ्या कंपन्या हा डेटा जाहिरातदारांना  पुरवतात . मग तुमच्या आवडीनिवडींचा विचार करून तुमच्या मोबाइलवर जाहिराती पाठविल्या जातात किंवा  तुमच्या मोबाइलवर विविध ऑफर्स , लॉटरीचे एसएमएस पाठवले जातात . त्यानंतर तुमच्या नावे तुमच्या  फ्रेंडलिस्टमधल्यांना किंवा कॉन्टक्टलिस्टमध्ये असलेल्या व्यक्तींना काही चुकीचे मेल , मेसेज पाठविले जातात . यासाठी काहीवेळा तुमच्या मोबाइलमधील बॅलन्सचाही उपयोग केला जाऊ शकतो .  ' गुगल प्ले ' चा वापर सुरक्षित  त्यातल्या त्यात सुरक्षेची बाब म्हणजे , गुगल प्लेसारख्या प्लॅटफॉर्मवरून मिळणारे अॅप तुलनेने सुरक्षित असतात .कारण या कंपन्यांकडून अॅप्स उपलब्ध करून देण्याआधी काही सुरक्षा चाचण्या केल्या जातात . या चाचण्यांवर ते पात्र ठरले नाहीत , तर गुगल ते नाकारते . मग हे अॅप्स इतर वेबसाइटवर उपलब्ध होतात . त्यामुळे अनेक अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये गुगल प्ले व्यतिरिक्त इतर प्लॅटफॉर्मवरून अॅप्स इन्स्टॉल करायचे किंवा नाही यासाठी विशेष सेटिंग्ज करावी लागते .  शक्यतो गुगल प्ले व्यतिरिक्त इतर पर्यायांमधून अॅप्स इन्स्टॉल न करणे हा खबरदारीचा पहिलामार्ग आहे . 

मेसेंजर आपला आपला

स्मार्ट फोनमुळे मेसेंजरपासून ते जीटॉकपर्यंत सर्व काही आपल्या हातात आले आहे. बरेच पर्याय उपलब्ध असल्यामुळे नेमके काय आणि कशा प्रकारे ...

गुगलची ‘वेझ’क्रांती

जंगलामध्ये रस्ता हरवला, तर मदतीसाठी पूर्वी आरडाओरडा केला जायचा. माहितगार व्यक्ती होकायंत्राने दिशा शोधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायच्या . इंटरनेट क्रांतीनंतर मॅपचा आधार घेऊन दिशा शोधल्या जाऊ लागल्या . आपण नेमकेकोठे आहोत आणि कुठे जायचे आहे , याचे मार्ग मोबाईलवर दिसू लागले आणि अवघड वाटणारा प्रवास सोपा झाला . या सर्व तंत्रज्ञानाचे जनक म्हणजे गुगल , अॅपल , फेसबुकयांसारख्या कंपन्यांनी पुरवलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर अक्षरशः कोट्यवधी लोक करतात.' गुगल ' ने या मॅपसंदर्भात नुकतेच एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे . त्यामुळे मॅपिंगच्या क्षेत्रातील चेहरामोहराच बदलला जाईल . मूळचे इस्रायलचे असणारे ' वेझ ' तंत्रज्ञान खरेदी करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे . १ . ३ अब्जडॉलरचा करार गुगलने यासाठी केला आहे . गुगलच्या यूजर्सची जगभरातील संख्या पाहिली , तर ' वेझ ' हीगुगलसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच ठरण्याची शक्यता आहे . यापूर्वी अब्जावधी डॉलरचा करार गुगलने तिघांबाबततच केला आहे . त्यात यू - ट्यूबचाही समावेश आहे . इस्रायलमधील भरघोस यशानंतर वेझ हे तंत्रज्ञान चार वर्षांपूर्वीच अमेरिकेत आले आहे . मोटारींना ट्रॅफिकमधून मार्ग दाखवणे , स्पीडलेन सांगणे , शॉटकट कुठेआहेत , अपघात कुठल्या रस्त्यावर झाले आहेत , धोक्याचे रस्ते कुठले आहेत , या सर्वांची कल्पना ड्रायव्हरलादेण्याचे काम ' वेझ ' करते . मोठे करार १५ वर्षांच्या इतिहासात गुगलने आतापर्यंत केलेल्या सर्वांत मोठ्या किमतीच्या २४० करारांपैकी ' वेझ ' चा क्रमांकचौथा लागतो . मोटोरोला मोबिलिटी - १२ . ४ अब्ज डॉलर , डबल क्लिक - ३ . २ अब्ज डॉलर आणि यू - ट्यूब- १ . ७६ अब्ज डॉलर हे तीन करार यापूर्वी केले आहेत . यू - ट्यूबसारख्या साइटचे भारतातील यश पाहता आगामी काळात वेझ तंत्रज्ञानही येथे झपाट्याने वापरले जाईल , याची खात्री वाटते . वेझचा १९० देशांमध्ये वापर ' वेझ ' ने सांगितले आहे , की मॅपिंग तंत्रज्ञान १९० देशांमध्ये वापरले जाते . ट्रॅफिक जॅम , जॉब आणि इतरठिकाणी जाण्यासाठी सर्वांत जलद उपलब्ध रस्ता शोधण्यासाठी याचा वापर केला जातो . कंपनीचे ७० हजारसदस्य नकाशांचे संपादन करण्यावर काम करतात . नकाशांखेरीज विविध टिप्सही यामध्ये दिल्या जातात . वेझच्या आगमनाने गुगलचीही दोन वर्षांपूर्वीची ' प्लस ' नावाची सोशल नेटवर्किंग सर्व्हिस अपडेट होण्याची शक्यता आहे .' गुगल ' चे भारतातील यूजर पाहता मॅपिंगच्या सुविधेचा येथेही मोठ्या प्रमाणावर केला जाईल . आपल्या देशातील वाहतुकीची समस्या पाहता ' वेझ ' मुळे ती दूर होईल , असे वाटत नाही ; पण दूरच्या प्रवासासाठी ,महामार्ग ठिकाणी या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर झाला , तरी नव्याने फिरणाऱ्यांच्या अनेक समस्या सुटण्यास हातभार लागेल , असे वाटते .

Page 31 of 38 1 30 31 32 38
ADVERTISEMENT
error: Content is protected!