Tag: Google

टॅबलेटसाठी भारत मोठी बाजारपेठ ||  —  स्‍वस्‍त टॅबलेटची विक्री सर्वात जास्‍त

टॅबलेटसाठी भारत मोठी बाजारपेठ || — स्‍वस्‍त टॅबलेटची विक्री सर्वात जास्‍त

टॅबलेटसाठी भारत आता मोठी बाजारपेठ बनला आहे. अ‍ॅपलच्‍या हायएंड टॅबपासून भारतीय कंपन्‍यांच्‍या कमी किंमतीचे टॅबलेटस बाजारपेठेत मोठयाप्रमाणात विकले जात आहेत. ...

काही वर्षांत गुगलची सद्दी संपेल ??

गेल्या काही दिवसांत गुगलच्या शेअरमध्ये १० टक्क्यांहूनअधिक घसरण झाली आहे . त्यामुळे कंपनीच्या मालमत्तेत २४ अब्ज डॉलरने घट झाली आहे . ही घट अशीच सुरू राहिली , तर येत्या काही वर्षांत गुगलची सद्दी संपेल , अशी शक्यता विश्लेषक व्यक्त करू लागले आहेत .  गेल्या तिमाहीमध्ये गुगलच्या महसूलात केवळ १७ टक्क्यांची वाढ दिसून आली . २००९ नंतर पहिल्यांदाच कंपनीच्या महसूलात २० टक्क्यांपेक्षा कमी वाढ दिसून आली आहे .एकेकाळी सर्च इंजिन क्षेत्रात याहूची आघाडी होती . पण हळुहळू या स्पर्धेतून याहू बाद झाले . येत्या ५ - ८ वर्षांत गुगलवरही तीच वेळ येऊ शकते , असे आयर्न कॅपिटल या हेज फंडाचे संस्थापक एरिक जॅक्सन यांनी म्हटले आहे . युजरने जाहिरातींवर क्लिक केल्यास गुगलला महसूल मिळतो . गेल्या तीन महिन्यांत त्यात १५ टक्के घट झाली आहे . त्यामुळे भविष्यात गुगलचा नफा आणखी कमी होईल , अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे . अधिकाधिक ग्राहक मोबाइल अॅप्लिकेशन्सना प्राधान्य देत असल्याने जाहिरातदारही इंटरनेटवर आधारित जाहिरातींसाठी पैसे मोजण्यास तयार नाहीत .  त्यातच जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये बायडूला प्राधान्य दिले जाते . मायक्रोसॉफ्टनेही काही महिन्यांपूर्वीच बिंगची नवीन आवृत्ती सादर केली होती . त्याचवेळी गुगलची रशियातील स्पर्धक यान्डेक्सने विकसनशील मार्केटमध्ये गुगलला आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे . स्वतःकडील तज्ज्ञांचा वापर करून गुगलला आव्हान देण्याचे कंपनीने ठरविले आहे . त्यासाठी कंपनीने तुर्कस्तानपासून सुरुवात केली आहे . गेल्याच महिन्यात कंपनीने गुगलच्या क्रोमला आव्हान देण्यासाठी नवा ब्राऊझर लॉँच केला . त्यामुळे ऑपेरा तयार करणाऱ्या नॉर्वेजियन कंपनीने यान्डेक्ससोबत ब्राऊझर तंत्रज्ञान शेअर करण्यासाठी करार केला आहे . या ब्राऊझरवर कामकरण्यासाठी यान्डेक्स विविध अॅप्लिकेशन्स तयार करत असून सर्चच्या माध्यमातून अधिकाधिक महसूल गोळा करण्याचा त्यांचा मानस आहे .  एकेकाळी सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रात ऑर्कुटचेच साम्राज्य होते . पण फेसबुकच्या उदयाबरोबरच ऑर्कूटचे साम्राज्य कमी झाले . आता ते जवळपास दिसेनासे झाले आहे . फेसबुकलाही आता ट्विटर , लिंक्डइनचा धोका जाणवतोआहे . फेसबुकच्या शेअरमध्ये होत असलेली घसरण थांबलेली नाही . त्यामुळे इतके दिवस टिकून असलेली गुगलचीसद्दी जाऊन गुगलला पर्याय निर्माण होईल आणि गुगल इतिहासजमा होईल , अशी विश्लेषक वर्तवत असलेली शक्यता पूर्णपणे खोटी ठरवता येणार नाही . शेवटी हे तंत्रज्ञानाचे जग आहे . त्यात दररोज नवीन काही येणारच ... 

क्रोमबुक : दी कॉम्पुटर फॉर एवरी वन

क्रोमबुक : दी कॉम्पुटर फॉर एवरी वन

सॅन्फ्रांसिस्‍को- मायक्रोसॉफ्टला टक्‍कर देण्यासाठी गुगल आणि सॅमसंग दोन कंपनी एकत्र आल्या आहेत. गुगल आणि सॅमसंगने नुकताच एक हलक्या वजनाचा अत्याधुनिक ...

शर्यत ही आपुली! : अॅपल आणि गुगल तुंबळ युद्ध

शर्यत ही आपुली! : अॅपल आणि गुगल तुंबळ युद्ध

गेम्स , अॅप्स , या गोष्टी बघून पूर्वी स्मार्ट फोनची निवड व्हायची. मात्र आता हीच निवड ' ऑपरेटिंग सिस्टिम ' वरून केली जाऊ लागलीय. यामुळे सध्या स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये ...

Page 35 of 37 1 34 35 36 37
ADVERTISEMENT
error: Content is protected!